म टा, "म", "मा", "मि" आणि "उ" - काही सैल विचार
मटाच्या (त्यांच्या दाव्यानुसार) पहिल्या ऑनलाइन दिवाळी अंकावरून जवळपास सर्वच मराठी संकेतस्थळांवर जोरदार चर्चा सुरू आहेत. या निमित्ताने मटाच्या बदललेल्या स्वरूपाविषयी आणि त्यांच्या अतिरंजीत दाव्याविषयी मनात आलेले काही सैल विचार (stray thoughts).
बदललेले स्वरूप
आमच्या घरी मटा येत असे. मटा वाचण्याची सवय बालपणापासूनच. त्यामुळे आजदेखील जालावर मटा वाचला जातोच पण तो केवळ एक सवय म्हणून. त्यात पूर्वीची मजा नाही. त्यावेळच्या छापील मटाचे स्वरूप आणि भाषा एखाद्या घरंदाज स्त्रीसारखी असे.
मिसळपाव