मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

आर्टिकल 15

nishapari ·
आर्टिकल 15 चा प्लॉट 2014 साली उत्तरप्रदेशातल्या एका गावात झालेल्या तीन मुलींच्या गॅंग रेपवर आधारित आहे. डेली लेबरवर काम करणाऱ्या तीन 15 वर्षांच्या मुली मालकाकडे तीन रुपये वाढवून मागतात आणि त्याने नकार दिल्यावरही अडून बसतात. गँगरेप करून ´त्यांच्या´ समाजाला धडा मिळावा म्हणून त्या मुलींपैकी दोन मुलींचा बलात्कार करून त्यांना जीवे मारून झाडाला लटकावलं जातं , तिसरी निसटण्यात यशस्वी होते . केस बंद करण्यासाठी त्या मुलींच्या वडिलांनाच त्यात गोवण्याचा प्रयत्न सुरू असतो .

एका साइड व्हिलनची कैफियत

फारएन्ड ·
काय डोक्याला ताप राव! असले झंपट टीशर्ट आणि प्यांट घालून फाईट करायला लावतात. तो मेन व्हिलन राहतो बाजूला पिक्चर भर नुसत्या धमक्या देत आणि हीरो आला की फाईटला आम्ही. तरी बरं ष्टोरीत लौकर मेलो तर लगेच दुसरा पिक्चर शोधून तिथली फाईट करायला जाता येतं. नाहीतर उगाच चार महिने शूटिंग ला रोज वेळेवर तयार राहावं लागतं. त्यात अर्ध्या वेळा शूटिंग कॅन्सल. आता बच्चनकडून, धरमपाजींकडून मार खायला काय वाटायचं नाही. पहिलं म्हणजे ते खरंच मारतायत असं वाटायचं. दुसरं म्हणजे सीन टायमावर शूट होउन बच्चन मोकळा व आपण मोकळे दुसर्‍या स्टुडिओत जायला. नाहीतर एकेकाचे नखरे. "आज मूड नही है".

सहजच..

प्रमोद पानसे ·
कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं. मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं . एखादा चेहरा रोज आठवत असतो .कधीकाळी रोज तो बघण्याची ओढ असणारा ,आणी ठराविक वेळी रोज बघायला मिळणारा .पण त्या वेळेची

लक्षात राहिलेले प्रसंग...

चिनार ·
आपल्या इथे गाजलेल्या हिंदी-मराठी सिनेमांची संख्या कमी नाही. गुरुदत्त पासून ते अनुराग कश्यपपर्यंत अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे सिनेमे गाजले. सिनेमे येतात...गाजतात....आणि जातात. मागे उरते ती त्यांची चर्चा. त्या सिनेमातल्या चांगल्या गाण्यांची, प्रसंगांची आणि कलाकारांच्या अभिनयाची चर्चा पुढे वर्षानुवर्षे सुरु असते. उदाहरणार्थ...शोले म्हटल्यावर पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे गब्बरसिंग आणि त्याच्या एंट्रीचा सीन....कितने आदमी थे???? गब्बरसिंगची एंट्री ह्याहून जबरदस्त होऊच शकली नसती. मान्य....एकदम मान्य!! पण मुद्दा जरा वेगळा आहे.

द सियालकोट सागा

महासंग्राम ·
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

सेक्रेड गेम्स २

किसन शिंदे ·
लहानपणी आजीच्या कुशीत शिरून गोष्टी एेकताना, त्यात पुढे काय होईल याची उत्सुकता आपल्याला शांत बसू देत नाही. हि उत्सुकता ती गोष्ट/कथा उत्कृष्ट असण्याचं द्योतक म्हणता येईल आणि त्या गोष्टीशी आपण एकरूप झाल्याचं लक्षण म्हणता येईल. या उत्सुकतेपोटीच 'गेम आॅफ थ्रोन्स'च्या आठही सिझन्सना जगभरातल्या तमाम प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. या सर्वांग सुंदर सिरीजचा २०११ ला सुरू झालेला प्रवास नऊ वर्षांनी २०१९ ला संपला, कारण या मालिकेची कथा उत्कृष्ट होती आणि तिने प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचे काम अतिशय चोख केले. 'कट्टप्पाने बाहुबलीला का मारले'?

तू मेरे रुबरु है

महासंग्राम ·
आजही विदर्भ मराठवाड्यात बुंग फिरणारी कालिपिली जिप असो की फाट्यावरची पानटपरी तिथे मोठ्या आवजात धडकन मधलं 'दुल्हे का चेहरा सुहाना लागता है' वाजतंच वाजतं. नुसरत ची पहिली वहिली ओळख हिच. धडकन पाहताना पहिल्यांदा तार स्वरात वाटणारं हे गाणं नंतर खूप आवडायला लागलं सोबत नुसरत ही. मग तो थेट भेटला ते 2015-16 मध्ये, आतशः नेट ची स्पीड पण वाढली होती आणि गाणी शोधणं फार फार सोप्पं झालं होतं, तू नळी वर तो पुन्हा भेटला 'साँसों की माला सिमरू' च्या रूपाने. त्यानंतर आजतागायत त्याने साथ सोडली नाही.

रॉबिन विलियम्स

महासंग्राम ·
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

आनंदाचे डोहीं आनंद तरंग।

टर्मीनेटर ·
स्वतः आनंदी, हसतमुख राहणे आणि आसपासच्या सर्व व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद, हास्य पाहणे कोणाला नाही आवडत? पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही.

स्ट्रेंजर थिंग्ज

nishapari ·
स्ट्रेंजर थिंग्ज - लेखक आशुतोष जरंडीकर स्ट्रेंजर थिंग्ज या मालिकेबद्दल लिहावं असं खूप दिवस वाटत होतं पण त्याला न्याय देणं आपल्या लेखणीला झेपेल असं वाटत नव्हतं . आशुतोष जरंडीकर हे या प्रकारचं उत्तम समीक्षण लिहिणारे समीक्षक आहेत .. त्यांचा स्ट्रेंजर थिंग्जचं रसग्रहण करणारा हा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे ... त्यांची परवानगी घेऊन इथे शेअर करत आहे . विज्ञान-फॅन्टसी यांचा सुरेख मिलाफ... लेखक - आशुतोष निरंजन जरंडीकर ... मैत्री आणि प्रेम हा समान गाभा असलेल्या हॅरी पॉटरने एक दशक गाजवलं होतं. पॉटर सोबत एक पिढी मोठी झाली होती.