पण नेहमीच आनंदी, हसतमुख राहणे इतके सोपे नाही. कधीकधी आपण वैयक्तिक समस्यांमुळे काळजीत असतो तर कधी आपल्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींचे मक्ख-चिंताग्रस्त चेहरे, त्रासिक मुद्रा, परिचयातल्या कोणाच्या आजारपण,अपघात, मृत्यूची वा एखादी वाईट बातमी अशा गोष्टी, त्यांचा थेट आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नसूनही, नकळतपणे एक प्रकारच्या खिन्नतेचे जळमट आपल्या मनावर पसरवत असतात.
मनुष्यप्राणी हा भावनाप्रधान असल्याने अशाप्रसंगी भावूक होणे स्वाभाविक असले तरी अशा खिन्न अवस्थेत फारकाळ राहणे त्याला श्रेयस्कर नसते.
अशी खिन्नता दूर करण्याचे प्रत्येकाचे आपापले मार्ग असतात. कोणी चित्रपट बघून वा संगीत ऐकून आपला मूड ठीक करत असतील तर कोणी अन्य कुठल्या मार्गाने.
माझ्यासाठी गेल्या काही वर्षांपासून औदासिन्य झटकून टाकण्यासाठी हुकमी ठरलेला मार्ग म्हणजे युट्यूब वर आनंद आणि उर्जा ठासून भरलेल्या गाण्यांचे व्हीडीओ बघणे!
त्यातले संगीत, नृत्य आणि कलाकारांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहणारा आनंद बघताना तुकोबांच्या 'आनंदाचे डोहीं आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।।' या अभंगातल्या ओळींच्या 'मी आनंदाचा, ब्रह्मानंदाचा डोह झालो आहे, म्हणून त्याच्यामध्ये आनंदाच्याच लाटा येतात' ह्या भावार्थाची प्रचीती येते आणि खिन्नता दूर होऊन मूड एकदम फ्रेश होतो.
वेगवेगळ्या भाषांतील अशा गाण्यांच्या व्हीडीओंची माझी प्ले-लिस्ट तशी बरीच मोठी आहे. त्यातली काही निवडक गाणी खालील प्रमाणे आहेत.
१
Khaled - C'est La Vie
नव्वदच्या दशकात भारतात आंतरराष्ट्रीय पॉप संगीताचे पर्व सुरु झाले तेव्हा 'दि दि' ह्या लोकप्रिय गाण्याने आपल्या परिचयाचा झालेला नायजेरियन गायक खालीद् ह्याचे फ्रेंच आणि अरबी भाषेतील हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असून गाण्यातली उर्जा थक्क करणारी आहे.
२
Shakira - Waka Waka
खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या फुटबॉल सारख्या खेळाच्या २०१० सालच्या फिफा वर्ल्डकपचे अधिकृत गीत म्हणून मान्यता मिळालेले आणि उत्तमरित्या चित्रीत केलेले कोलंबियन गायिका आणि नृत्यांगना शकीराचे हे गाणे.
3
सेनोरीटा
हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देवल ह्या तिघांनी गायलेले आणि त्यांच्यावरच चित्रित केलेले, 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ह्या चित्रपटातील स्पॅनिश आणि हिंदी भाषेतील हे गाणे ऐकायला आणि बघायला फार छान वाटते.
4
मल्हारी - बाजीराव मस्तानी
बाजीराव मस्तानी चित्रपटातील, रणवीर सिंग ह्या अभिनेत्यावर चित्रित केलेल्या ह्या गाण्यातला, नाचताना त्याने दाखवलेला जोश वाखाणण्याजोगा आहे.
५
झिंगाट - सैराट
अबालवृद्धांना आपल्या तालावर थिरकायला लावणारं सैराट चित्रपटातील हे गाणं माहित नसेल अशी व्यक्ती महाराष्ट्रात विरळाच असेल. मला हा चित्रपट आवडला नसला तरी हे गाणं मात्र आवडतं.
६
तुफान आलयां - पाणी फाउंडेशन
'पाण्याचे दुर्भिक्ष' अशा गंभीर विषयावर आधारित असूनही, अजय-अतुल ह्यांचे संगीत, गुरु ठाकूर ह्यांचे शब्द, किरण राव आणि अजय गोगावले ह्यांचा आवाज, नागराज मंजुळे ह्यांचे दिग्दर्शन लाभल्याने आणि नामवंत कलाकारांचा सहभाग असल्याने हा व्हिडिओ मनाला चांगलाच भावतो.
7
गुन गुन गुना रे - अग्निपथ
पुनर्निर्मित 'अग्निपथ' ह्या चित्रपटातील हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा ह्यांचा सहभाग असलेले हे गाणं आधी नुसते ऐकले होते तेव्हा आवडले नव्हते, पण चित्रपटात बघितल्यावर मात्र फार आवडले.
८
गल्लां गुडीयां - दिल धडकने दो
दिल धडकने दो ह्या चित्रपटातील, अनिल कपूर, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, फरहान अख्तर अशा दिग्गज कलाकारांवर चित्रित केलेले आणि सुखविंदर सिंग व शंकर महादेवन ह्यांच्या दमदार आवाजातील हे गाणं बघताना पाय आपोआपच ठेका धरतात.
९
झल्ला वल्लाह - इशकजादे
इशकजादे चित्रपटातील ह्या गाण्यात गौहर खान आणि परिणीती चोप्रा या दोन्ही अभिनेत्रींनी आपल्या नृत्याने आणि हावभावांनी बहार आणली आहे. हे गाणंही चित्रपट पाहिल्यानंतर आवडायला लागलं.
१०
रूबरू - रंग दे बसंती
रंग दे बसंती चित्रपटातील आमिरखान, अतुल कुलकर्णी, शर्मन जोशी, माधवन, सिद्धार्थ, कुणाल कपूर, सोहा अली खान असे सहभागी कलाकार आणि त्याला ए.आर.रेहमानच्या संगीताची जोड लाभलेले, मैत्री आणि अवखळ तरुणाईचे दर्शन घडवणारं असं हे सुदर गाणं.
११
मच गया शोर - खुद्दार
ऐशीच्या दशकातील खुद्दार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी वर चित्रित केलेले हे सदाबहार गाणे केवळ दहीहंडीच्या दिवशीच नाही तर कधीही ऐकायला/बघायला मजा येते.(युट्युब वर ह्या गाण्याचा चांगल्या प्रतीचा व्हीडीओ उपलब्ध नाहीये.)
१२
PSY - GANGNAM STYLE
१५ जुलै २०१२ रोजी युट्युब वर प्रदर्शित झालेल्या, साय (PSY) नावाच्या दक्षिण कोरियन नर्तक-गायकाच्या ह्या धमाल व्हीडीओने, डिसेंबर २०१२ मध्ये युट्युबच्या इतिहासात सर्वप्रथम १०० कोटी व्ह्यूज मिळवण्याचा विक्रम नोंदवला आहे.
मिसळपाव
प्रतिक्रिया
गाण्यांवर डान्स ही केला तर
गाण्यांवर डान्स ही केला तर खूपच रिलॅक्स वाटते. मी तर बंद खोलीत दादा कोंडके पासून हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या तालावर मस्त नाचून घेतो. मला जास्त मजा दलेर मेहंदी च्या तुनूक तुनूक तारारा गाण्यावर नाचताना येते. मस्त फुल आवाज करुन द्यायचा.
लेखाला धन्यवाद द्यायचे राहून
लेखाला धन्यवाद द्यायचे राहून गेले. टर्मीनेटर भाऊ लेख आवडला.
छान संग्रह
त्यातील काही माझ्याही आवडीची आहेत. बाकीची आता ऐकेन.
सर्वप्रथम माफी मागतो सर्व मिपाकरांची!
एक वेगळा प्रयोग करण्याच्या नादात अर्धवट लेख प्रकाशित झाल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागतो सर्व मिपाकरांची!
एक एक व्हिडिओ बद्दल लिहिल्या नंतर प्रत्येकवेळी पूर्वपरीक्षण वर क्लिक करत होतो, अजून काही व्हिडिओज टाकायचे होते पण १२ व्या व्हिडिओ नंतर पूर्वपरीक्षण ऐवजी 'प्रकाशित करा' वर क्लिक झाली आणि अर्धवट लेख प्रकाशित झाला.
धन्यवाद तमराज किल्विष आणि कुमार१ साहेब.
धन्यवाद तमराज किल्विष आणि कुमार१ साहेब.
@तमराज किल्विष - लिव्ह लाईफ किंग साईझ. मस्त गाणी ऐका, नाचा, ज्यातून आनंद मिळेल ते ते सर्व करा!
चांगलं कलेक्शन, विशेषतः क्रमांक दोन
२
धन्यवाद चामुंडराय. क्रमांक १ बघितल्या नंतरचे आपले मत
In reply to चांगलं कलेक्शन, विशेषतः क्रमांक दोन by चामुंडराय
धन्यवाद चामुंडराय. क्रमांक १ बघितल्या नंतरचे आपले मत वाचायला जास्त आवडेल!
टर्मिनेटर भाऊ तो १ नंबरचा व्हीडिओ टर्मिनेट झाला कि हो.
In reply to धन्यवाद चामुंडराय. क्रमांक १ बघितल्या नंतरचे आपले मत by टर्मीनेटर
.
@ चामुंडराय
In reply to टर्मिनेटर भाऊ तो १ नंबरचा व्हीडिओ टर्मिनेट झाला कि हो. by चामुंडराय
चामुंडराय साहेब, दिसतोय कि तो व्हिडिओ, टर्मिनेट नाही झालाय :)
फक्त क्रमांक ४ चा व्हिडिओ Eros Now वाल्यांनी एम्बेड करण्यास प्रतिबंधित केल्याने तो धाग्यात न दिसत युट्युब वरच बघता येतोय.
बॉब डिलनच BLOWIN IN THE WIND
बॉब डिलनच BLOWIN IN THE WIND ऐका एकदा
अप्रतिम कॉलेकशन. मलाही आवडतात
अप्रतिम कॉलेकशन. मलाही आवडतात गाणी ऐकायला आणि त्यावर एकटीनेच बेफाम नाचते देखील.मजा आली वाचून
अप्रतिम कॉलेकशन. मलाही आवडतात
अप्रतिम कॉलेकशन. मलाही आवडतात गाणी ऐकायला आणि त्यावर एकटीनेच बेफाम नाचते देखील.मजा आली वाचून
मै तुजसे मिलने आजाऊ क्या और बोल मै हलगी बजाऊ क्या
आपलं लय फेवरीट. तसच ते लॉलीपॉप गाणं आणि नागीण डांन्स गाणी मन एकदम फ्रेश करतात. फक्त सोबत चकना, माल, सिगारेट, एक्षेविस तीनशे अथवा फुलचंद असेल तर धमाल होते माझी
खूप मस्तं लेख आणि संग्रह. 3,4
खूप मस्तं लेख आणि संग्रह. 3,4, 6,7 8, 9,10 माझे पण फेव्हरेट्स.
गल्लां गुडिया - दिल धडकने दो.
गल्लां गुडिया - दिल धडकने दो..
या गाण्याचे चित्रण नुसतं बघायला देखील मजा येते.. नीट पाह्यलं तर लक्षात येईल, हे संपूर्ण गाणं एका शॉट मधे शूट झालंय!
संग्रह आवडला.
संग्रह आवडला.
लेखाचा फॉन्ट कसा बदलला?
सर्व प्रतीसादकांचे मनःपूर्वक आभार!
@ महासंग्राम: बॉब डिलनच BLOWIN IN THE WIND ऐकतो, सुचवणी साठी धन्यवाद.
@ ज्योति अळवणी आणि पद्मावतिजी धन्यवाद.
@ जॉनविक्क: तुम्ही सांगितलेलं गाणं हळदी समारंभात DJ वर ऐकलय, पण त्याचा व्हिडिओ नाही पाहण्यात आलाय अजून. बाकी सोबतीला असलेल्या वस्तूंची यादी भारी आहे, पानाचा फुलचंद हा प्रकार अजून मी ट्राय नाही केलाय :)
@ राघव:
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला, ह्या आधी कित्येकदा पाहूनही ही गोष्ट लक्षात नव्हती आली. चित्रीकरणातील हा बारकावा निदर्शनास आणल्याबद्दल आपले विशेष आभार.
@ यशोधरा: ह्या लेखात Custom CSS चा वापर केल्याने फॉन्ट वेगळा दिसतोय.
बदला है बहुत कुछ यहां
In reply to सर्व प्रतीसादकांचे मनःपूर्वक आभार! by टर्मीनेटर
नुसता फॉन्टच वेगळा नाही तर प्रतिसादकाचे नावाचा रंग, साईडपॅनलमधल्या नॅव्हेगेशन लिंक्स आदींचे रंग ह्या गोष्टीही बदलल्या गेल्या आहेत. ;)
पण एकंदरीत रचना देखणी केली आहे लेखाची. खूप आवडली.
मान गये आपकी पारखी नजर को!
In reply to बदला है बहुत कुछ यहां by अभ्या..
मान गये आपकी पारखी नजर को! धन्यवाद अभ्या..
:) CSS च बदलली असल्याने आख्खे पेजच बदलले.
In reply to बदला है बहुत कुछ यहां by अभ्या..
फक्त लेखातील मजकूराची सजावटही बदलता आली असती परंतू लेखकाला बहुतेक आख्खा धागाच मिपावर एकदम हटके अन वेगळाच असावा असं मनापासून वाटत असल्याने बहुदा याबाबत त्यांनी मनापासून मेहनत घेतली आहे असे वाटत आहे:)
आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला
खरं का काय ? हम्म मग हे गाणे सुद्धा बघून घ्या नक्की आवडेल
https://m.youtube.com/watch?v=bg8p6wsxry4
हा घ्या हलगी गाण्याचा व्हिडीओ
https://m.youtube.com/watch?v=XfivqjQzu8Y
फुलचंद पान हा एक प्रसिद्ध प्रकार आहेच फक्त 120-300 टाईप मज्या हवी असेल तर कडक रिमझिम टाका असे सांगावे लागेल ;)
नाचायला धमाल येते.
चले जैसे हवाए...
In reply to आत्ता हा व्हिडिओ पुन्हा पहिला by जॉनविक्क
चले जैसे हवाए... आवडला! पण हलगी वाला मात्र लो बजेट, पार्श्वभूमी, कलाकारांची निवड आणि सुमार नृत्य दिग्दर्शनाच्या एकंदरीत परिणामाने फारच चीप वाटला :)
आनंदाचे डोहीं आनंद तरंग निर्माण होणे म्हत्वाचे
In reply to चले जैसे हवाए... by टर्मीनेटर
मग ती व्हॅट69 असो की पव्वा . बरोबर ना ?
लॉलीपॉप गाणेही सुचवले होते पण आता तेही भोजपुरी असल्याने चिपच वाटेल की हो :(
बाकी अफलातून डान्स स्टेप्स साठी सलमान काजोलचे हे गाणे स्टार्ट टू फिनिश बघणे मस्टच. ऑफिस मधला सर्व ताण हलका करायचे पोटेनशील ह्यात आहे
https://m.youtube.com/watch?v=AYxpSOZ_zsk
हे पण आपलं ऑल टाईम फेवरीट, डांस ला तोड़च नाही
https://m.youtube.com/watch?v=mmYoBNtWEqI
@जॉनविक्क
In reply to आनंदाचे डोहीं आनंद तरंग निर्माण होणे म्हत्वाचे by जॉनविक्क
@जॉनविक्क
सहमत! स्कॉच ते पौव्वा ठीक आहे, पण खोपडी मात्र नकोच... :) :)
लॉलीपॉप बघतो आज, भाषा भोजपुरी असो कि मगधी, मैथिली त्याचे वावडे नाही. एकाही शब्दाचा अर्थ समजत नसला तरी जगातल्या कुठल्याही भाषेतले संगीत मी ऐकतो, पण जिथे बघण्याचा विषय येतो तिथे मात्र काही किमान अपेक्षा असतात :)
आपण सांगितलेले 'ओढली चुनरिया' व 'चिक बुक राईले' हे आणि प्रभूदेवाची अनेक गाणी आवडतात.
धन्यवाद.
मस्त धागा आणि मस्त कलेक्शन !
मस्त धागा आणि मस्त कलेक्शन ! फक्त मल्हारी गाणे सोडून. भन्साळ्याने बाजीरावांना नाचायला लावल्याने या गाण्याचा तिटकारा आहे. खर तर एक प्रियांका सोडली तर पुर्ण चित्रपट माझ्या डोक्यात गेला. सावळी, लंबुटांग पिडीका पादुकोठे कोणत्या अँगलने मस्तानी वाटते ते एका नरसाळ्याच ठाउक. असो.
बर्याच जुन्या गाण्यांची उजळणी करुन दिल्याबध्द्ल धन्यवाद.
@ दुर्गविहारी
In reply to मस्त धागा आणि मस्त कलेक्शन ! by दुर्गविहारी
@ दुर्गविहारी - धन्यवाद.
मी बाजीराव मस्तानी अजून बघितला नाहीये, पण त्यातली मल्हारी आणि पिंगा (अर्थात प्रियांका मुळे) ही दोन गाणी ऐकायला आणि बघायला आवडतात.
वाहवा टर्मीनेटरजी काय लिहिलं आहेत
आणि काय कलेक्शन आहे. :)
माझा पण युट्युब हा एक सहारा असतो नकारात्मकतेतून बाहेरून यायला. माझ्या कलेक्शन मध्ये ९०च्या दशकातील प्रसिद्ध इंडीपॉप असते (कॉलॉनिअल कझीन्स, हरिहरन सेपरेट, लकी अली, शान, शुभा मुद्गल, अलिशा चिनॉय वगैरे सगळी मंडळी, अगदी आचरट रॅप पण असतात देवांग पटेलची). त्यासोबत हल्लीच एक नवा शौक लागलाय रेस्टोरेशन व्हिडीओज पाहायचा. त्यातही टॉय रेस्टोरेशन. टोंका कंपनीची ऑल मेटल खेळणी (डंप ट्रक, क्रेन्स, जीप,विमाने इत्यादी) ती पार गंजलेली असतात मग कोणीतरी पेशन्सनं ती सगळी सुटी करतो, त्याला उत्तम सँड ब्लास्टिंग करतो, प्रायमर वगैरे मारून झक्क नवं रूप देतो, एकंदरीत ते "पुनःसर्जन" पाहून नकारात्मकता त्या मेटल वरील गंजा प्रमाणेच सँडब्लास्ट केल्यासारखी निघून जाते
हा व्हिडिओ पहा मस्त आहे
@ जेम्स वांड
In reply to वाहवा टर्मीनेटरजी काय लिहिलं आहेत by जेम्स वांड
@ जेम्स वांड - धन्यवाद.
९०च्या दशकातील इंडीपॉप बद्दल प्रचंड सहमत! तेव्हाचे बॉम्बे वायकिंगचे क्या सुरत है.. क्या सुरत है , रूप तेरा मस्ताना-रिमिक्स , Q FUNK , दिल बोले बूम बूम ही गाणी विशेष आवडती.
अचरट गाण्यांच्या बाबतीत बोलायचे तर गोविंदाची कितीतरी गाणी धमाल आहेत, त्यातले हे एक आनन फानन :) :)
1980 Mighty Tonka Dump Truck Restoration हा तुम्ही सुचवलेला व्हिडिओ बघितला, मस्त आहे. क्रिएटीव्ह व्हिडीओज मला पण बघायला खूप आवडतात. सध्या एका चीनी आजोबांचे (Grandpa Amu) व्हिडीओज बघण्याचा नाद लागला आहे. आपल्या छोट्या नातवासाठी लाकूड, बांबू वगैरे वापरून खेळणी, वस्तू बनवणारे आजोबा आणि त्यांचा नातू खूप क्युट आहेत, कसले कुशल कारागीर आहेत ते, तुम्ही पण बघा नक्की आवडतील!