Skip to main content

रूपक कथा: भव्य देवालय आणि भक्त

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/04/2019 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा. आता अवतारी देवता म्हणाल तर, त्या देवतेची पत्नी, पोरे-पोरी, सासू- सुना इत्यादी मंडळी हि येतीलच. मुख्य देवते सोबत मंदिराच्या आवारात त्यांची हि स्थापना केलेली होती. मुख्य देवेतेप्रमाणे याही देवता शक्तिशाली होत्या. भारी-भरकम दक्षिणा मोजल्यावरच देवतेची अनुकंपा भक्तांवर व्हायची.

टिंग्डि टिडिडिडि

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिडिडिडि टिंग्डि टिंग्डिटिंग. . 1994 सालची गोष्ट आहे. अर्थात हे सर्व समजण्याचं वयही नव्हतं तेव्हा. फारतर चवथ्या इयत्तेत असेन. आमची आवड त्याकाळी 'हम आपके है कौन' टाइप सिनेमा पुरती मर्यादित होती. आणि आवडते गाणे माइ नी माइ. (किंबहुना तेच दाखवले जात असल्यामुळे आमचा व्यासंगही इतका विस्तृत नसेल.

हॅरी पॉटर - भाग सहा

लेखक nishapari यांनी शुक्रवार, 22/02/2019 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स आणि लिलीची हत्या झाली तेव्हा पीटरने विश्वासघात केला ही गोष्ट सिरियसच्या लक्षात आली . जेम्सवर त्याचं भावापेक्षाही अधिक प्रेम होतं . तो संतप्त अवस्थेत पीटरला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यामागे गेला . त्यांची गाठ अनेक मगल लोक असलेल्या रस्त्यावर पडली . मात्र सिरियसपेक्षा पीटर चपळ ठरला . " तू लिली आणि जेम्सचा विश्वासघात केलास " असं मोठ्याने ओरडून पीटरने एक मोठा जादुई स्फोट घडवून आणला , या स्फोटात 12 मगल लोक मृत्युमुखी पडले . याचवेळी आपलं एक बोट पीटरने कापलं आणि क्षणार्धात उंदराच्या रुपात परिवर्तीत होऊन तिथून पळून गेला .

सिम्पल इज ब्यूटिफुल !!! - बंडू गोरे भोजनालय, वाई

लेखक सरनौबत यांनी शुक्रवार, 15/02/2019 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
महाबळेश्वरला २-३ दिवस ग्रील्ड सँडविच, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि पंजाबी जेवणावर यथेच्छ ताव मारल्यावर कधी एकदा पुण्याला घरी जाऊन वरण -भात खातोय असं होतं. असंच एकदा ट्रीप संपवून सकाळी उशिरा पुण्याला परत जायला निघालो. संकष्टी चतुर्थी होती म्हणून वाटेत वाईला महागणपतीच्या दर्शनाला थांबलो. १ वाजून गेला होता आणि एव्हाना पोटात कावळे चांगलेच कोकलत होते. चौकशी केल्यावर 'बंडू गोरे खानावळीत' घरगुती जेवण मिळतं असं समजलं. मंदिरापासून अगदी जवळ आहे म्हणून तिकडे मोर्चा वळवला. ‘खानावळ’ ह्या नावाला अजिबात न शोभणारी स्वछता आणि टापटीप दिसत होती.

दिवस तुझे ते ऐकायचे....

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 13/02/2019 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! आज १३ फेब्रुवारी. आज एक विशेष ‘जागतिक दिन’ आहे. काय चमकलात ना? किंवा तुम्हाला असेही वाटले असेल, की हा माणूस लिहिताना एका दिवसाची चूक करतोय. कारण उद्याचा, म्हणजेच १४ फेब्रुवारीचा ‘प्रेमदिन’ बहुतेकांच्या परिचयाचा असतो. पण वाचकहो, मी चुकलेलो नाही. मी तुम्हाला आजच्या काहीशा अपरिचित दिनाचीच ओळख करून देत आहे.

‘एक शून्य मी’ : शून्याचा अर्थपूर्ण अनुभव

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 04/02/2019 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा पुलंचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधी बरेच लेखन प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे जुन्या आठवणीना उजाळा मिळतो आहे. अशातच मिपावर ‘ प्युअरसोतम - ला – देस्पांद’ हा धागा वाचनात आला. त्यात पुलंच्या आपल्याला आवडलेल्या वाक्यांची नोंद वाचकांनी केलेली आहे. त्यातून मला हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. एकंदरीत पुलंसंबंधित लेखन वाचताना मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे बरीचशी चर्चा ही पुलंच्या हयातीत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकांबद्दल असते. त्यातही त्यांचे विनोदी लेखन, व्यक्तीचित्रण आणि शाब्दिक कोट्या हे बहुचर्चित विषय आहेत.

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 30/01/2019 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत. १. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल. २.

काही नाजूक स्वप्नं...

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 30/01/2019 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
परवा सहज टीव्ही चाळता चाळता एका चॅनलवर 'कुछ कुछ होता हैं' दिसला. बास्केटबॉल कोर्टवर राहुल आणि अंजलीची बालिश अशी भांडणे सुरु होती. थोडा वेळ बघत बसलो. हा चित्रपट १९९८ मध्ये आला होता आणि तुफान चालला होता. गाणी सगळी हिट्ट झाली होती. मनात विचार आला. हा चित्रपट जर आता आला असता तर चालला असता का? सध्याच्या तरुण प्रेक्षकांची आवड आमुलाग्र बदलली आहे. आमच्यासाठी मात्र हा चित्रपट एक स्वप्न होते. त्या साली मी कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसर्‍या वर्षात शिकत होतो. 'कुछ कुछ...' मध्ये स्वपनवत वाटू नये असे काहीच नव्हते.

लाजणे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 27/01/2019 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
. प्रेमातला लाजणे हा सर्वात सुंदर भाग आहे, नजर खाली झुकवणे, गाल आरक्त होणे, चेहरा ओंजळीत लपवणे, डोळे झाकून घेणे, ओढणीने चेहरा लपवणे किंवा तोंड वळवून पाठमोरे बसणे .. एक ना अनेक प्रकार प्रेमातला तो लज्जा भाव खूप रोमँटिक असतो हे सगळं नसतं तर प्रेम अगदी शुष्क व नीरस झालं असतं .. कवीने म्हटलंच आहे जणू रात्र काळी तिचे केस अन् पुरा चंद्र होता तिचा चेहरा... तिचे हासणे चांदण्याचा चुरा,तिचे लाजणे अमृताचा झरा! भावना व्यक्त तर कराव्याश्या वाटतात पण लज्जेने डोळ्यास ड