कधीतरी असं वाटतं ना की एखादं आपलं आवडत गाणं ऐकाव .आठवतं अचानक आणी ऐकायची इच्छा होते.मग लगेच एखाद्या म्युझिक ॲप मधुन ते शोधुन ऐकतोही आपण.पण तेवढी मजा नाही येत.एक फक्त इच्छा झालीये आणी ती पुर्ण करणं लगेच शक्य आहे म्हणून असेल कदाचित् पण नाही येत मजा .आणी मन कोरडंच रहातं.
मानसिक अस्वास्थ्य असेल ,विमनस्क अवस्थेत बाहेर पडतो एखाद्या चहाच्या टपरीवर सिगरेट पेटवतोय समोर चाच्याने चहा आणून ठेवलाय.आणी अचानक fm वर तेच गाणं लागलं तर ..मुड झकास होउन जातो.हे छोट्या आयुष्यातलं छोटसं सरप्राइज असतं .
एखादा चेहरा रोज आठवत असतो .कधीकाळी रोज तो बघण्याची ओढ असणारा ,आणी ठराविक वेळी रोज बघायला मिळणारा .पण त्या वेळेची