मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

देवगिरी किल्ला : दौलतींचे शहर (दौलतबाद)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
मिसळपाववर लेणी स्थापत्याबद्दल काही लेखन टाकावे या उद्देशाने एक दिवस वेरूळ लेण्यावर जावे आणि ती माहिती मिसळपाववर, उपक्रमवर किंवा माझे शब्द वर टाकावी म्हणून आम्ही एका मंगळवारी वेरुळला पोहचलो. पण, तिथे हा फलक पाहिला. जरासा नाराज झालो.

दारू एके दारू... :)

विसोबा खेचर ·
दारुचा पाढा! दारू एके दारू, बैठक झाली सुरू दारू दुणे ग्लास, मजा येई खास! दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन! दारू चोक बियर, टाका पुढचा गियर! दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला! :) एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे. आपला, (ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.

बम भोले बम

आजानुकर्ण ·
मोठमोठ्या चित्रपट कलाकारांशी (म्हणजे अमिताभ व शाहरुख) आमच्या फार ओळखी. दुपारचे जेवण करून पान खाण्यासाठी पानाच्या गादीवर आलो तर तिथे शाहरूख. आश्चर्याने आम्ही तोंडातच बोट घातले. म्हणजे शाहरूख दिसला त्याबद्दल नाही तर त्याने शर्ट घातला होता त्याचे आश्चर्य वाटले. आय हाय "दर्द ए डिस्को" काय डान्स केलाय. मान गये. आम्हीही शर्टाची दोन बटणे काढून त्याला नाचण्याची हुक्की आली तर साथ देण्यासाठी तयार राहिलो. गोल्डफ्लेक पेटवून शाहरूखने १ रुच्या दोन मेंटॉस घेतल्या. आम्ही पटकन तोंडातले बोट काढून मेंटॉस घेण्यासाठी हात (पुसून) तयार ठेवला. पण त्याने मेंटॉस (स्वत:च्या) खिशात टाकल्या.

माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

विसोबा खेचर ·
राम राम मंडळी, तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की!

कन्नडा हाडु

आजानुकर्ण ·
दुर्दैवाने काही लोकांच्या मते जगातील सर्वोत्कृष्ट साहित्य उजवीकडून डावीकडे लिहिण्यात येणार्‍या एका भाषेत निर्माण झाले आहे. मात्र आपल्याच इतर भारतीय भाषाभगिनींमधील अनेक साहित्यकृतींकडे सामान्य जनतेचे दुर्लक्षच झाले आहे. हाय! उदा. कन्नड भाषेतील खालील लोकप्रिय गाणे पहा. (बहुतेकांना नुसतेच पहावे लागेल, वाचता येणार नाही. पुन्हा एकदा हाय!) आम्हाला संपूर्ण कल्पना आहे की कन्नड भाषेतील उच्चारांचा गोडवा देवनागरीमध्ये उतरणे शक्य नाही. उदा पत्नी आपल्या पतिला "री" अशी जी गोड लाडिक हाक मारते त्याची री मराठीत ओढता किंवा लिहिता येणे सर्वस्वी कठीण. पण व्याभिचारी आस्वादाला आमचा पाठिंबा आहे.

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

मनिष ·
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.