प्रासंगिक
!! तुळशीचे लग्न !!
दिवाळीत राहिलेले फटाके कधी वाजवायचे तर तुळशीच्या लग्नात. प्रत्येक वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशीचे लग्न भारतात पारंपारिक पद्धतीने लावल्या जाते. तुळस या रोपट्याच्या फांदीला बांगड्या, साडीचा आहेर, आणि काय काय असते. भटजी असतो, मंगलाष्टके असतात आणि फटाके असतात. कुठे तरी बँड असेल आणि कुठे कुठे काय असेल.........! या संबधीची एक ऐकीव कथा जी पद्मपुराणात आहे, असे म्हणतात. ती अशी की, जालंधर नावाचा एक महाप्रतापी व असाधारण योद्धा होऊन गेला. त्याने देवलोकांना बेजार करुन सोडले होते. आणि त्याच्या भाऊबंदास दैत्यास सुखी केले होते. त्याची वृंदा नावाची पत्नी महापतिव्रता होती. आणि तिच्याच पुण्याईमुळे जालंधर त्रिभुवनांत अजिंक्य ठरला होता. त्याचा पराभव कसा करावा म्हणून देवलोकांच्या बैठकी होत होत्या आणि इकडे जालंधराने इंद्रपुरीवर चाल करायची आणि इंद्राची खोड मोडायची अशी तयारी चालविली होती. पुढे देवांचे आणि दैत्यांचे तुंबळ युद्ध झाले. आणि त्याच्यात नेहमीप्रमाणे देवांना जराशी माघार घ्यावी लागली. तेव्हा श्रीविष्णुने जालंधरास युक्तीने ( कपटाने ) पराभुत करायचे ठरवले. जालंधरची पत्नी जिच्या पतिव्रत्यामुळे त्यास जे सामर्थ्य मिळाले होते ते नष्ट करायचा विडा श्रीविष्णूने उचलला. त्याने जालंधर युद्धात धारार्थी पडला असा निरोप दिला आणि दोन वानरांकडून विष्णूने त्याचे शिर व धड जालंधरप्रमाणे दिसेल असे करुन वृंदेच्या समोर आणून टाकले. तेव्हा ती दु:खाने व्याकुळ होऊन शोक करु लागली. इतक्यात एका कपटी साधूने येऊन संजीवनी मंत्राने या कपटवेषधारी जालंधरास उठविण्याचा उपक्रम केला. धड व शिर याच्या जागी जालंधराचा वेष घातलेला विष्णू उभा राहिला. तेव्हा आनंदाच्या भरात आपला मृत पती सजीव झाला असे मानून त्या जालंधररुपी विष्णूस कवटाळले. पुढे विष्णू तिच्याच घरी राहू लागला. वृंदेच्या अज्ञानामुळे का होईना तीचे पतीव्रत ढळले. त्यामुळे तिकडे ओरीजनल जालंधर बलहीन झाला आणि युद्धात पराभुत झाला. नंतर खरा प्रकार वृंदेस कळला. त्यामुळे संतापाच्या त्या साध्वीने विष्णुला शाप दिला की तुला पत्नीचा वियोग घडून दोन वानरांचे साह्य घेण्याची पाळी तुझ्यावर येईल त्या प्रमाणे पुढे रामवतारी ते घडलेच आहे. असो, त्या नंतर वृंदेने चिता रचून तीत प्रवेश केला. आपण कपटाने महासाध्वीचा नाहक नाश केला हे पाहून विष्णुस वाईट वाटले. इतकेच नव्हे तर तो तिच्या रक्षेजवळ वेड्यासारखा कितीतरी दिवस बसून राहिला. आता हे वेड घालविण्यासाठी काय करावे म्हणून पार्वतीने त्या राखेत तुलसी, आंवळा, व मालती यांचे बी पेरुन तीन झाडे उत्पन्न केली. त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. पुढे वृंदा ही रुक्मिणीच्या रुपाने अवतरुन विष्णूचा अवतार जो कृष्ण त्यास तिने कार्तिक शु. द्वादशीस वरीले. हाच तो रुक्मिणीकृष्णविवाह जो दरवर्षी धुमधडाक्याने साजरा करतात. या निमित्ताने आपणास माहित असलेल्या काही कथा किंवा काही माहिती जर आली तर तिचे इथे स्वागत आहे.
वाचने
6931
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मस्त!
लिहिणार पण,
In reply to लिहिणार पण, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर विचार
तिसरे लग्न- तुलशी महात्म्य
In reply to तिसरे लग्न- तुलशी महात्म्य by प्रकाश घाटपांडे
सही !!!
माहिती
हल्ली डबल बॅरल थंड पडलेली
तुळशीच्या लग्नाच्या काही आठवणी !
माहितिपुर्ण लेखन ! आभारी
नाना, बस करा राव हे उद्योग :(
In reply to नाना, बस करा राव हे उद्योग :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
का? का?