Skip to main content

आस्वाद

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 22/01/2008 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन. सिच्युएशन अशी.. जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन, `...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत. वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर... मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले.
Taxonomy upgrade extras

सॄष्टीची युक्ती

लेखक मीनल गद्रे. यांनी मंगळवार, 22/01/2008 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 21/01/2008 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, कोल्हापूरी मिसळ हा आमचा फार `जिव्हा'ळ्याचा विषय. म्हणूनच आमचे परममित्र मा. धोंडोपंत यानी मिसळपाव या स्थळाची वाट दाखवताच आम्हाला विलक्षण आनंद झाला. कोल्हापूरातील विविध मिसळस्थळे आमच्या उत्तम परिचयाची. `येथे उत्तम मिसळ मिळेल' असा फलक असलेल्या हाटेलात मिसळ कधीच चांगली नसते... पण ज्या हाटेलावर नावाचा फलकसुद्धा नसतो, अशी उत्तम मिसळस्थळे केवळ वासावरून आम्ही हुडकत असतो.. परवा कधीतरी `राधा ही बावरी हरीची' हे गाणे मनात घोळत असताना आम्ही मिसळ चापत होतो... या दोन्हीची कधीतरी सरमिसळ झाली... आणि हे विडंबन जन्माला आले...
Taxonomy upgrade extras

भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल

लेखक पुष्कर यांनी शनिवार, 19/01/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या 'दोस्त हो' ह्या गझलसंग्रहातल्या काही चारोळ्या वेचून ठेवतो आहे. हे काही रसग्रहण नाही. त्यांची भाषा इतकी सोपी आहे की नुसती चारोळी वाचली की झालं रसग्रहण. शिवाय आजकाल रसग्रहणाच्या नावाखाली कवितांच्या ओळींचं जे डिसेक्शन करतात लोकं, ते वाचून ते रसग्रहण हे 'सूर्यग्रहणा'सारखं 'ग्रहण' वाटतं. कवितेच्या मूळ ओळींमध्ये जो रस आहे, तो त्या कवितेच्या पंचनाम्यामागे झाकून टाकतात. मराठी कवितांवरचं हे अश्या प्रकारचं रस-ग्रहण केव्हा सुटेल तो सुदिन. तूर्तास (खरं म्हणजे इथे 'सध्या' हा शब्दही चालला असता, पण ग्रहणकाळात आम्हाला 'तूर्तास, अदमासे, साद्यंत, अभ्युत्थान' असले शब्द आठवतात.
Taxonomy upgrade extras

एक लोभसवाणा, देखणा ब्लॉग!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 16/01/2008 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आमचे मित्रवर्य धोंडोपंत यांच्या या ब्लॉगविषयी, न राहवून आज आम्ही इथे दोन शब्द लिहीत आहोत! मंडळी, अंतरजालावर आजमितीस अक्षरश: शेकड्याने ब्लॉग उपलब्ध आहेत, त्यापैकीच धोंडोपंतांचाही एक ब्लॉग, तेव्हा त्यात विशेष काहीच नाही. अनेकांप्रमाणेच पंतही त्यांच्या ब्लॉगात लेखन करीत असतात, त्यांचे विचार मांडत असतात, तेव्हा त्यातही काही विशेष नाही.

पुन्हा गंध आला...(गझल)

लेखक बहुरंगी यांनी शुक्रवार, 11/01/2008 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सकाळी सकाळी एक छान गझल वाचली ती तुम्हा सर्वांसाठी देत आहे .... या पूर्वी कुणी मिपा-कराने संपादित केली असल्यास कृपया पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा, हि विनंति. ==================================== पुन्हा गंध आला...(गझल) पुन्हा गंध आला तुझ्या मोगर्‍याला, पुन्हा जाग आली इथे चांदण्याला... अशी रात्र जागी झाली पुन्हा की, पुन्हा जोर आला तुझ्या मागण्याला... न कळे कसा तोल गेलाच माझा, पुन्हा धुंदी आली तुझ्या वागण्याला... जरी संपलेली रात्र वादळांची, पुन्हा कोण आला तुझ्या आसर्‍याला... फूले ही पसरली शेजेवरी मी, पुन्हा अर्थ आला तुझ्या माळण्याला... मला जाणले तू असे छान राणी, पुन्ह
Taxonomy upgrade extras

आयसीसी चे नवे नियम :

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 09/01/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.