रसिकहो,
थंडीचा सुखद मोसम सुरू आहे. नववर्षाच्या पार्ट्यांना वेग आलेला आहे. वातावरण कधी नाही इतकं सुखद आहे. जीवनातील दु:खे क्षणभर का होईना विसरून एखादी चक्कर मधुशाळेत टाकावी असे वाटले तर त्यात गैर तर नाही?
आमचे आदरणीय कविवर्य श्री. हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला अशा वेळेस आमचं सर्व विश्व व्यापून टाकते आणि त्या रूबाईया आमच्या भोवती गुंजारव करीत राहतात. त्यातले हे काही मधुकण.
प्रियतम !