पॅन कार्ड, आधार कार्ड...कशासाठी?
मला एक प्रश्न फार वर्षांपासून पडलेला आहे. कदाचित मिसळपाववरील जाणकार मंडळी त्यावर प्रकाश टाकू शकतील.
(उदाहरणार्थ) गेल्या आठवड्यात मी पंजाब नॅशनल बँकेत गेलो. मला अकाउंटवरचा माझा पत्ता बदलायचा होता. त्या बाई म्हणाल्या, एक अर्ज आणि त्यासोबत तुमच्या नवीन वास्तव्याचा पुरावा द्या. मी विचारलं, माझ्या पासपोर्टची प्रत देतो ती चालेल ना? बाई म्हणाल्या, चालेल, सोबत पासपोर्टही आणा, आणि हो, तुमच्या पॅन कार्ड व आधार कार्डची एकेक प्रतही लागेल.
पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत ह्या requirement बद्दल मला कायमच अचंबा वाटत आला आहे.