Skip to main content

ताज्या घडामोडी - जानेवारी २०२५

लेखक वेडा बेडूक यांनी गुरुवार, 02/01/2025 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा. आ़जची ठ्ळक घडामोडः अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-kil… लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते

अदानी,उर्जा आणि अमेरिका

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शुक्रवार, 22/11/2024 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेत गौतम अदानी ह्यांच्याविरोधात वॉरंट निघाले आणि भारतात एकच खळबळ माजली. दोषारोपात(INDICTMENT) गौतम अदानी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतातील चार राज्यांत २००० कोटींची लाच दिली होती. अदानी एनर्जीची सौर उर्जा ह्या राज्यांनी विकत घ्यावी म्हणून ही लाच २०१९ ते २०२४ ह्या काळात दिली गेली. अर्थात हे आरोप आहेत पण त्याचे पुरावे देखील देण्यात आले आहेत असे समजते.https://www.justice.gov/usao-edny/media/1377806/dl?inline लगेच राहुल गांधी ह्यांनी अदानीना अटक करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

भारताबाहेरील समाजकार्य

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 14/09/2024 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
भारताबाहेरील हिंदू धर्मासाठी अधिकृत रित्या काम करणाऱ्या दोन मराठी व्यक्तींची ओळख - यात समाजाला जरुरी असेलली मर्तिका च्या सेवेपासून पासून स्थानिक सरकारला स्वस्तिक चा अर्थ समजवून देणे, "हिंदू चॅपलनसी "म्हणजे काय असे अनेक त्यांचे अनुभव आहेत https://www.youtube.com/watch?v=hPYTkev-xz4&t=679s

व्हिस्की मौलाना !!!!

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 10/09/2024 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
"मित्र म्हणे" या यु ट्यूब माध्यमावर सौमित्र पोटे विविध क्षेत्रातील रोचक काम केलेलया लोकांन बरोबर . त्यातील भारतीय गुप्तहेर श्री जयंत उमराणीकर यांची हि मुलाखत आवर्जून पहा ....

बंगाली (बेगानी) शादीमे "खुर्शीद" दिवाना

लेखक चौकस२१२ यांनी रविवार, 11/08/2024 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
बांगलादेशातील "बंधूनी" बांगला बंधू चा पुतळा पडून जो उन्माद चालवला आहे , देशाचं पंतप्रधानांच्या घरात घुसून त्यांचे ( ते सुद्धा स्त्री चे) अंत्वस्त्र फडकवणे ( बंगाल संस्कृतीचे हे घृणास्पद दृश्य ) असे "चाळे " केले ते बघून काही महा महिमानां "मोदींचे हि हेच होईल " "भारतात हेच होऊ शकते" अशी विधाने करावीशी वाटली ..

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

लेखक वेडा बेडूक यांनी सोमवार, 15/07/2024 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत आघाडीवर असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्रचारादरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते बालंबाल वाचले. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने महासत्ता अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली. हल्लेखोराला सुरक्षारक्षकांनी ठार केले.

भारतातील विधानसभा निवडणूका २०२४

लेखक वामन देशमुख यांनी रविवार, 02/06/2024 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या भारतीय प्रजासत्ताकाच्या १८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाचे वारे वाहत आहेत. कालच्या एक्झिट पोल निकालांची सर्वत्र चर्चा सुरु आहे. "मोदींची 'अब की बार चार सौ पार' घोषणा सार्थ ठरली" असा आनंद रालोआ गट व्यक्त करणार की "मोदींची ती घोषणा व्यर्थ ठरली" असा आनंद इंडी गट व्यक्त करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल. लोकसभेच्या निवडणुकांशिवाय काही राज्यांत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही होत आहेत. त्याशिवाय काही ठिकाणी विधानसभेच्या रिक्त जागांवरदेखील निवडणुका होत आहेत. त्यांची चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे. विषयानुरुप, अभिनिवेशरहित, न-अप्रस्तुत प्रतिसादांसाठी आधीच धन्यवाद.

शहजाद पुनावाला मुलाखत

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 14/05/2024 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
शहजाद पुनावाला एक हुशार / उत्तम व्यक्ता त्याने मांडलेले काही महत्वाचे मुद्दे https://www.youtube.com/watch?v=bZWb4zrYJAo - मी काँग्रेस काही अशीच सोडलि नाही अंतर्गत मुद्दे उठवटण्याचा प्रयत्न केला आधी - मी भाजपात गेलो हे काही लगेच पद मिळवण्यासाठी नाही , मी माझ्य विचारांनी गेलो वेळ घेऊन विचार करून गेलो - भाजप "परफॉर्म " करावे लागते काम करा नाही तर हकालपट्टी ( जावडेकर उत्तम उदाहरण ) - मी प्रियानकला स्पष्ट सांगतले जर २०१४ सालि १०० निवडून आणायचं तर राहुल आणि रॉबर्ट ला बाजूला केले पाहिजे , एका कुटुंब पेक्षा पक्ष मोठा आहे - राहुल आणि

गुंतवणूकीचा गुंता ( डी एस के )

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 24/04/2024 07:07 या दिवशी प्रकाशित केले.
डी एस के बांधकाम व्यावसायिकावर ६ वर्षांपूर्वी लोकनचे पैसे बुडवल्याचे आरोप केले गेले आणि त्यावेळी बरीच चर्चा झाली हे आठवत असेल त्याचे मालक , त्यांची पत्नी वैगरे गेली ६ वर्षे तुरंगात होते आणि नुकतेच ते जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे माध्यमातून यावर चर्चा चालू आहे ... जे काय झाले ते अजून गुंतागुंतीचे होत आहे त्यात त्यांचे ग्राहक आणि ठेवीदार बरेच सर्वसाधारण मध्यम वर्गीय असल्यामुळे त्यांचे हाल चालूच आहेत , मुळात ढिसाळ कायदे , त्यांची ढिसाळ अंमलबाजवणी वैगरे आहेच शोधपत्रकारिता आणि विशीष्ट आर्थिक घोटाळ्यात या विषयात ज्यांना रस असले त्यांचा साठी हि घटना फार रोचक आहे ..

जागतिक इडली दिन । ३० मार्च २०२४ । वाफाळता खाद्योत्सव!

लेखक कांदा लिंबू यांनी शनिवार, 30/03/2024 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार खाद्यप्रेमी मिपाकर्स! तुम्हाला जर चुकून माहित नसलं तर सांगतो, आज जागतिक इडली दिन आहे हं. दरवर्षी ३० मार्च रोजी जागतिक इडली दिन साजरा केला जातो. २०१५ साली चेन्नईमधील एनियावन नावाच्या एका बल्लवाचार्याने १३२८ प्रकारच्या इडल्या बनवल्या आणि त्याचबरोबर ४३ किलोची एकाच इडली बनवली. तेंव्हापासून इडली दिनाची सुरुवात झाली आणि मग पांढरी, वाफाळती, हलकी, फुसफुशीत अशी असलेल्या इडलीला हा दिवस समर्पित झाला. तांदूळ आणि उडीदडाळ यांची इडली पचायला हलकी असते. इडलीसोबत शेंगदाणे, दाळवं यांची चटणी ही तेलंगणात लोकप्रिय आहे. आंध्रातही तेच. तामिळनाडूत मात्र इडलीसोबत खोबऱ्याची चटणी हवी.