Skip to main content

डॉ सौ. आणि डॉ. श्री.

लेखक dadabhau यांनी शुक्रवार, 29/03/2024 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या वार्डात चौकाचौकातील फ्लेक्सवर अचानकच बऱ्याच माननीयांनी श्री. ऐवजी "डॉ . श्री ." व माननीयांच्या सौ. नी सौ. ऐवजी "डॉ. सौ," लावायला सुरुवात केलीये. यातील बरेचसे माननीय " ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट" (GoI ) वाले आहेत. रोज रोज हे फ्लेक्स बघून काही प्रश्न पडलेत , जाणकार मिपाकर मदत करतील व करियर घडायला आणि भविष्याची चिंता मिटायला मदत होईल ह्या उद्देशाने हा धागा काढलाय , कृपया ज्यांना अधिक माहिती व मदत करायची इच्छा असेल त्यांनी खालील पैकी एका वा अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत तर फार उपयोग होईल. १) नावापुढे "डॉ" लावण्यासाठी P.Hd. मिळवायला साधारणतः किती खर्च येतो ?

चित्रपट - स्वातंत्र्यवीर सावरकर

लेखक निनाद यांनी गुरुवार, 28/03/2024 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर: चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा क्रांतिकारी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याचा योग आला. रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारली आहे. प्लेगची साथ त्यात ब्रिटिश शिपायांची क्रूरता दाखवत चित्रपट सुरुवातीलाच पकड घेतो. चित्रपट सावरकरांच्या बालपणापासून ते अंदमानच्या सेल्युलर जेलमधील क्रूर कैदेपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण यात आहे. सावरकरांच्या क्रांतिकारी कारवाया, साहित्यिक योगदान, सामाजिक सुधारणा आणि हिंदुत्वाचा विचार यांचा समावेश आहे. सुटके नंतर रत्नागिरीमध्ये राहून त्यांनी दलितांसाठी कार्य दाखवले आहे.

रझाकार: हैदराबादचा नि:शब्द नरसंहार - सिनेमा समीक्षण

लेखक जावा फुल स्टॅक यांनी मंगळवार, 26/03/2024 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
Razakar : The Silent Genocide Of Hyderabad हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. हैद्राबाद संस्थानातील हिंदू प्रजेवर तेथील राजाने रझाकारांद्वारे केलेले अन्वनित अत्याचार आणि त्यानंतर भारत सरकारने ऑपेरेशन पोलो राबवून हैद्राबादचे केलेले विलीनीकरण यांचे यथार्थ चित्रण करतो. तेलंगणा, मराठवाडा व कर्नाटकाचा काही भाग हे हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली असतो.

शैतान सिनेमा आणि १०८ कन्यादान

लेखक जावा फुल स्टॅक यांनी बुधवार, 20/03/2024 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले थिएटरात गेलो नव्हतो, काल अजय देवगणचा शैतान पाहून आलो. कथा, सादरीकरण, चित्रीकरण वगैरे ठीकठाक आहे; पैसे खर्च करून मुद्दाम जाऊन बघण्यासारखा काही नाही. OTT वर पाहिला तर ठीक आहे. हिंदी सिनेमांतून सातत्याने केली जाणारी हिंदू धर्म, श्रद्धा, परंपरा, उपासनापद्धती यांची हेटाळणी हिंदूंना इतकी अंगवळणी पडली आहे कि आजकाल त्यात फारसे कुणाला काही वावगे वाटत नाही. इतर असंख्य हिंदी सिनेमांप्रमाणे हा सिनेमा देखील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतो. चित्रपटात वनराज नावाचा खलनायक आणि कबीर व त्याचे कुटुंब अशी पात्रे आहेत. कबीरच्या तरुण मुलीला वनराज वशीकरणाद्वारे कह्यात घेतो.

फुफ्फुस प्रत्यारोपण

लेखक चौकस२१२ यांनी गुरुवार, 14/03/2024 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःच्या व्यसनाने / चुकांनी गेलेले अनेक कलाकार आपल्याला माहिती आहेत पण तसे काही नसलेले ३ कलाकार काही वर्षात कठीण आजारातून गेले आहेत सुदैवाने ते त्यातून बाहेर आले .... यातील एक म्हणजे विद्यधार जोशी https://www.youtube.com/watch?v=XRbprwgjEpI अतुल परचुरे https://www.youtube.com/watch?v=jEAnldW47bI&t=84s आणि शरद पोंक्षे https://www.youtube.com/watch?v=tOwilU-vKHY&t=2093s

रेल्वेचे युटीएस UTS app वापरून तिकीट.

लेखक कंजूस यांनी रविवार, 14/01/2024 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
युटीएस UTS app वापरून तिकीट. रेल्वेच्या युटीएस UTS appचा वापर करून online unreserved तिकीट. याबद्दल ऐकून होतो की चालत्या गाडीतून तिकीट काढता येत नाही. पण काल हा प्रयोग केला. यशस्वी. . . या app चा बरेच प्रवासी वापर करून रेल्वेचं अनारक्षित तिकीट काढतात. रेल्वे तिकीट खिडकीपासून सहा मीटरस दूर असतानाच तिकीट निघू शकते. म्हणजे स्टेशनच्या बाहेरूनच. याचा अर्थ रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर जाण्याअगोदर तुमच्याकडे रेल्वे तिकीट हवे. . . काल (२०२४_०१_१३) पुण्याकडून इंटरसिटी ट्रेनने(१२१२८) ठाण्याला उतरुन परत कल्याणला (उलट) जायचे होते.

22 जानेवारीचा ऐतिहासिक दिवस: राम मंदिर प्राण प्रतिष्ठा

लेखक वेडा बेडूक यांनी मंगळवार, 02/01/2024 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 चा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील भव्य राम मंदिरात निवास करतील. अयोध्येत आता श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहे. वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जल समाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जयिनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्री रामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं.

वैवाहिक सहजीवन

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 30/12/2023 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वी एकदा विवाहेच्छुक तरुण तरुणींच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला श्रोता म्हणुन गेलो होतो. एका समुपदेशिकेने उत्तम मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात तिने सांगितले कि लग्न जमवताना या सर्व गोष्टींचा विचार तर कराच पण घटस्फोट झाला तर काय? या गोष्टीचाही आत्ताच विचार करुन ठेवा. इथे आपण लग्न जमवायला आलो आहोत की घटस्फोटाचा विचार करायला आलो आहोत असा प्रश्न काही लोकांना पडेल. पण विवाह संस्थेच्या वेगाने ढासाळत्या परिस्थितीचा विचार केला तर या प्रश्नाचा विचार आत्ताच करावा लागेल.

पुन्हा भटकी कुत्री.....

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 23/10/2023 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज हे वृत्त वाचले. https://www.livemint.com/companies/people/parag-desai-wagh-bakris-ed-pa… भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येतो. यांच्यामुळे लोकांचा जीव जातो किंवा लोक जखमी होतात. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर पुरेशा क्षमतेने काम होत नाही. दरवेळी पेटावाले किंवा प्राणीमित्र भटक्या कुत्र्यांच्या बाजूने बोलत राहतात. मुक्या प्राण्यांना समजून घ्या. भटकी कुत्री का पिसाळतात , रात्रीबेरात्री का भुंकतात हे समजून घ्या वगैरे टेपा लावतात.

जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते?

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 04/10/2023 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
जरा विचार करा, शिक्षक आणि शिक्षण कंत्राटी कसे असू शकते? आजच्या लोकसत्ता मधे आलेल्या लेखाचा दूवा वरीलप्रमाणे आहे. डॉ. डी. एन. मोरे अलीकडच्या काळात शासनाने सर्वच क्षेत्राचे कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. वीज, रेल्वे, विमान, बँका, विमा, सैन्य इत्यादीसह अनेक सरकारी आणि सहकारी संस्था खासगी कंपन्यांना चालविण्यासाठी दिल्या जात आहेत.