Skip to main content

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 17/11/2021 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही.

एक घर बनाउन्गा ??

लेखक शेर भाई यांनी शनिवार, 16/10/2021 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला फुकट वस्तूंचे आकर्षण का असते?? हा प्रश्न आजकाल सारखा माझ्या समोर टपकायला लागला आहे. त्याला कारण आहे आमच्या इमारतीचा पुर्नविकास. आधी अस्मादिक स्वयंविकास या शब्दाने खूप भारलेले होते. पण नंतर अभिहस्तांतरण प्रक्रिया हा एक खूप चिवट प्राणी आडवा आला. त्यात आमच्या इमारतीची हस्तांतरण प्रक्रिया करणे आमच्या पूर्वज कार्यकारिणीने जाणीवपूर्वक टाळले होते. कारण कोणी म्हणे म्हाडा नामक बागुल बुवा आहे आणि तो नुसता खातो. त्यामुळेच का होईना, कार्यारिणीतील इतर सगळ्यांच्या मते आम्ही बिल्डर नामक जमातीला सामोरे जायचे ठरवले. आणि तसेही बिल्डर नामक जमात म्हाडा नामक बागुल बुवाची मालक असते म्हणे.

वेगे वेगे धावू किती ??

लेखक शेर भाई यांनी सोमवार, 11/10/2021 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी म्हणजे ज्या काळात इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता त्या काळात आपले पोलिसमामा सिग्नल तोडणाऱ्या चालकांना बाजूला घेऊन दंड वसूली (तोड-पाणी) करत असत. आता काळ बदलला त्याप्रमाणे आपले पोलीस-दल एकदम जागरूक झाले आहे, एक अनुभव: झाल अस कि नवीन चुनाभट्टी – बी. के. सी. उड्डाणपुलावरून बी. के. सी. ला जात असताना आमच्या गाडीला पोलीस-मामाने बाजूला घेतले. आणि दारावर टकटक केली, काच खाली करण्यापूर्वी मी माझा मास्क लावला, आणि विचारले काय झालायं? तर म्हणे तुम्ही मास्क लावला नव्हता. इथे एक गोष्ट मान्य आहे कि त्या वेळेस गाडीत एकटाच असल्याने मी मास्क लावला नव्हता.

K-drama सुचवा

लेखक राघवेंद्र यांनी सोमवार, 11/10/2021 08:18 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा - अमरेंद्र बाहुबलीचा धागा ) सध्या प्रचंड हाणामारीची squid games ही TV मालिका खूप लोकप्रिय आहे. यात विशेष म्हणजे एक भारतीय कलाकार आहे जो कोरिया मध्ये acting स्कूल मध्ये आहे. कोरियन मालिका मध्ये खाण्याच्या प्रचंड विविधता दाखवतात आणि वेगवेगळे विषय छान हाताळतात. hometown cha cha cha ही एका समुद्र किनाऱ्यावरील गावातील प्रेम कहाणी आहे. तुम्ही पाहिलेलं अजून Kdrama सुचवा.

गणपतीचे रहस्य

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 08/09/2021 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सव दोन दिवसा वर आला आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या गणपतीचे रहस्य या शीर्षकाखाली प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने एक लेख प्रसिद्ध होत आहे. यावर कोणी प्रकाशझोत टाकू शकेल का ?

हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान

लेखक श्रीनिवास टिळक यांनी बुधवार, 25/08/2021 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
"हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान" या छोट्या पुस्तकात नवाकाळचे माजी संपादक श्री. नीलकंठ खाडिलकर यांचे हिंदुत्वावर ३३ मुद्द्यात विवेचन आहे. या प्रत्येक मुद्द्याचा एक ओळीत सारांश येथे कोणी करून दिल्यास माझे आभार मिळतील. माझ्याकडे हे पुस्तक होते पण कोणीतरी वाचायला नेले ते परत आले नाही. चौकशी करता पुस्तकाची नवीन प्रत सध्या उपलब्ध नाही. वास्तव्य परदेशात असल्यामुळे कोणाकडून आणायची शक्यता पण नाही म्हणून हि विनंती. धन्यवाद.

Investment म्हणून दुकान गाळा

लेखक Nishantbhau यांनी शनिवार, 14/08/2021 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी Investment म्हणून दुकान गाळा घेणं कितपत योग्य आहे. फ्लॅट पेक्षा दुकान गाळा ला रेंट जास्त मिळतो म्हणून दुकान गाळा घ्यावा असा काही लोक म्हणतात. पण प्रत्यक्षात अशा investment मधे कोणत्या अडचणी येतात. या विषयी मार्गदर्शन हव आहे. ज्यांनी अशी investment केली आहे त्यांचे मत काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

माझी शाळा, निसर्ग शाळा

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 15/07/2021 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
तोरणा विद्यालय वेल्हे माझं माध्यमिक शिक्षण तोरणा विद्यालय, वेल्हे येथे झालं. टेकड्यांच्या कुशीत वसलेली.. माझी शाळा. दोन सुंदर इमारती, आंब्याची बाग, काजू-फणसाची झाडं, सर्वांनी मिळून तयार केलेले अंतर्गत रस्ते, पायऱ्या. पाठीशी खंबीरपणे उभा असलेला तोरणा किल्ला. सगळं स्वप्नवत.

सरकार व्यवस्थेची कोव्हिड हाताळणी तोलण्याचे निकष काय असावेत ?

लेखक कॉमी यांनी गुरुवार, 10/06/2021 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी वरुन नवीन धागा. इथे भागवतजी म्हणतात त्याप्रकारे सांख्यिकी चर्चा झाली तरी हरकत नाही. आणि सगळे आकडे बकवास आहेत म्हणुन पट उधळुन लावणार्‍यांचे इथे काम नाही. तर, राज्य/इतर व्यवस्थापन प्रदेशांच्या कामगिरीचे निकष काय असू शकतात- १. केस संख्या, मृत्यु संख्या तसेच त्यांचे बाधितांसोबत्/लोकसंख्येसोबत गुणोत्तर- ह्या निकषात थेट आकड्यांची तुलना तर चुकीची आहे हे स्पष्ट आहे. बाधितांच्या संख्येची एकूण लोकसंखेशी तुलना केल्यास त्या प्रदेशात संसर्ग किती पसरला हे समजेल. सरकारी व्यवस्थेच्या हातात खालीलप्रमाणे हत्यार असतात, संसर्ग रोखण्यासाठी- १. टाळेबंदी, संचारबंदी, सो.डी. इत्यादी इतर नियम. २.

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 02/06/2021 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्याच्या चालू घडामोडींचा पहिला धागा काढतोय. गिधाडी_पत्रकारिता की गिधाडी_रुग्णसेवा जिथे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करू दिला जात नाही, प्रवेश मिळालाच तर मोबाइल बाहेर ठेवावे लागतात, तिथे माइक, कॅमेरे, लाइट्स इ घेऊन ही बाई मोकाट फिरते.