Skip to main content

"Honey, it's not about money"

लेखक मारवा यांनी शनिवार, 13/09/2025 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात सलग ३ वेळा ३ वेगवेगळ्या लोकांकडुन तोच जुना डायलॉग ऐकला म्हणजे मला नाही ऐकवला कोणी. इन जनरल बोलण्याच्या ओघात मारला. "पैशासाठी वेडी झालेली आहेत लोक हल्ली, "पैशासाठी काहीही करतात , काय वाट्टेल ते," "पैसा जणु देवच झालाय आता, " थोड्याफार फरकाने उन्नीस बीस इधर उधर पैशा संदर्भात तेच ते तेच ते मनात विचारचक्र सुरु होण्यास इतकं trigger पुरे होतं. खरचं ? लोक "पैशामागे" वेडी होतात ? पैशाने वेडी होतात ? या सर्व मांडणीमध्ये काहीतरी गल्लत गफलत झालेली आहे असे मला वाटतेय. म्हणजे आपण सर्व मानवी समाज पैशाने संचालित होतोय असे म्हणणे थोडे चुकीचे खरे म्हणजे वरवरचे विधान आहे.

आर्थिक खिचडी

लेखक चिखलू यांनी मंगळवार, 26/08/2025 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेच्या स्थानिक रोजगार धोरणामुळे किंवा दक्षिण आशियाई कामगारांची संख्या कमी करण्याच्या धोरणामुळे मी लवकरच नोकरीवरून बाहेर पडणार आहे. वय ४८. २ मुले, बायको खाजगी शालेत शिक्षिका, पगार जास्त नाही. मोठा मुलगा PICT मध्ये Open Category मध्ये CS ला दुसर्या Year ला. जबाबदाऱ्या (Liabilities) 1. होम लोन १ (कोविड नंतर भावनेतून बांधलेलं मनासारखे घर नासिक मध्ये.

लोकतंत्र वाचविण्यासाठी "SIRची" आवश्यकता

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 06/08/2025 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
मतदाता यादीचे विशेष गहन पुनरीक्षण करणे म्हणजे SIR. नुकतेच बिहार राज्यात निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया राबवून मतदार यादीतील नावांची सत्यता तपासली. निवडणूक आयोगाने मृत, स्थलांतरित किंवा एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत मतदारांची नावे मतदाता यादीतून हटवली.

पहलगामचा हल्ला आणि इस्लाम

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 23/04/2025 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_ याच विषयावर हा धागा आहे. बरेचसे उजव्या बाजूचे विचारवंत हे इस्लाम हे एक जागतिक संकट आहे असे सतत सांगत असतात. जग सोडून द्या पण भारतासाठी तरी आपण त्याचा विचार करायला हवा. म्हणजे खरंच इस्लाम हे भारतासाठी एक संकट आहे का केवळ उजव्या बाजूचे लोक असे म्हणत आहेत म्हणून आपण ते मान्य करायचं का?

[स्वैर] वाळवी वि० बुरशी

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 19/04/2025 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
उजव्या डाव्यांचा वर्णपट खुप मोठा आहे पण त्यातील उजवेपण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे कदाचीत अपवाद असतील, नियम नसावेत. ज्यांना पोलादी पडद्यात आणि इतरांच्या शोषणात आनंद मिळतो ते सहसा डावीकडे झुकलेले असतात. इतरांचे स्वातंत्र्य हे त्यांना आपल्या सत्तेला आव्हान वाटते. त्यांना समाजातील व्यक्तींच्या जीवनावर जास्तीत जास्त ताबा ठेवायचा असतो. मग शोषक उतरंडीला महत्त्व येते. उतरंडीमधली सर्वात डोक्यावरची व्यक्ती खालच्या व्यक्तीचे शोषण करते आणि ती तिच्या खालच्या व्यक्तीचे.

लॉकडाऊन: १८५०वा दिवस (भाग २)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 16/04/2025 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वर्षांपूर्वीचा (भाग १): लॉकडाऊन: तेविसावा दिवस ती: परवा आमच्या थोरलीचा १८ वा वाढदिवस झाला. आम्ही तिला कारची चावी वाढदिवसाची भेट म्हणून दिली. मिळालेल्या surprise ने तिच्या चेहऱ्यावर जे भाव उमलले ते पाहून तिचा पाच वर्षांपूर्वीचा वाढदिवस झर्र्कन डोळ्यासमोरून तरळून गेला. तेंव्हा लॉक डाउन सुरु होते आणि घरी बनविलेल्या केकवर वाढदिवस साजरा झाला होता. पण आता काळ बदललाय. काळाबरोबर खूप काही बदललंय. एकेकाळी तिला दोन वेण्या पाडून द्यायला मी लागायची, आज ती मला हेअर स्टाइल सुचवते.

सिप (SIP) चे मजेदार विज्ञापन

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 07/04/2025 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
(विज्ञापन आणि माझ्या मनातील विचार) काल टीव्ही वर आयपीएलचा सामना पाहत होतो. मध्येच एक विज्ञापन आले. एक दुकान दिसत होते. दुकानाच्या साईन बोर्ड वर झगमग लाईटिंग दिसत होती. दुकानासमोर उभे राहून एक तरुण मुलगी गोड आवाजात म्हणाली, मी नियमित सिप मध्ये गुंतवणूक करते.त्या गुंतवणूकीतून मी वडिलांसाठी .... मी: वडिलांना दुकान टाकून दिले... ती: नाही हो, मी: मग दुकानात लाखोंचा माल भरून दिला असेल. ती: नाही हो, हा जो दुकानावर लागलेला झगमग करणारा साईन बोर्ड आहे, तो मी वडिलांना दुकानावर लावण्यासाठी विकत घेऊन दिला. माझी सिप मधली गुंतवणूक सार्थकी लागली.

ताज्या घडामोडी । एप्रिल २०२५ । चैत्र १९४७

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/04/2025 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शनिवार, 01/03/2025 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला. जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या. जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता..

ताज्या घडामोडी - फेब्रुवारी २०२५

लेखक माईसाहेब कुरसूंदीकर यांनी शुक्रवार, 07/02/2025 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि निवड्णुकपूर्व जाहीरनाम्यात जी वचने दिली होती, त्यांची पुर्ती करण्याची सुरुवात केली.अवैधरीत्या अमेरिकेत वास्त्वय करुन असणार्या परदेशी लोकाना परत पाठवणार हे एक वचन. अमेरिकेत एकंदर एक कोटीहुन अधिक परदेशी लोक बेकाय्देशीर वास्त्वव्य करून आहेत. ह्यात साधारण सात लाख भारतिय आहेत. ह्यातील १०४ लोकांची पहिली बॅच अमेरिकेच्या मिलिटरी विमानाने अम्रुतसर येथे उतरली.
"We thought we were being taken to another camp. Then a police officer told us that we were being taken to India. We were handcuffed, and our legs were chained.