पॅन कार्ड, आधार कार्ड...कशासाठी?
मला एक प्रश्न फार वर्षांपासून पडलेला आहे. कदाचित मिसळपाववरील जाणकार मंडळी त्यावर प्रकाश टाकू शकतील.
(उदाहरणार्थ) गेल्या आठवड्यात मी पंजाब नॅशनल बँकेत गेलो. मला अकाउंटवरचा माझा पत्ता बदलायचा होता. त्या बाई म्हणाल्या, एक अर्ज आणि त्यासोबत तुमच्या नवीन वास्तव्याचा पुरावा द्या. मी विचारलं, माझ्या पासपोर्टची प्रत देतो ती चालेल ना? बाई म्हणाल्या, चालेल, सोबत पासपोर्टही आणा, आणि हो, तुमच्या पॅन कार्ड व आधार कार्डची एकेक प्रतही लागेल.
पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत ह्या requirement बद्दल मला कायमच अचंबा वाटत आला आहे. मी माझा पासपोर्ट दाखवतोय, त्याची प्रत सही करून (self attestation) देतोय, त्या बाईंच्या समोरच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर माझं आधार कार्ड (फोटोसहित) दिसतंय, मग आता पॅन कार्ड व आधार कार्डची प्रत घेऊन बँक त्याचं काय करणार आहे, त्यात काय value addition आहे? शाखेच्या मॅनेजरकडे गेलो हेच प्रश्न घेऊन. त्या बाईंनी इतकी tangential उत्तरं दिली, की ती इथे लिहून वेळ वाया घालवीत नाही. शेवटी त्यांचं उत्तर होतं, ऑडिटर्स विचारतात आणि query काढतात, म्हणून आम्हाला ह्या कॉपीज (पांच वर्षं) ठेवाव्या लागतात.
हे शेवटचं उत्तर मला अन्य दोन बँकेतही मिळालं आहे. बँकांत कोणताही जsरा वेगळा व्यवहार करायला जा, तुम्हाला ह्या दोन गोष्टी द्याव्या लागतात. कशासाठी, माहीत नाही, कुणालाच. बँकेच्या कुणा ऑडिटरला भेटण्याचा योग अजून आला नाही; त्यांना माहीत असेल, कदाचित.
दोन मुद्दे:
(१) देशभरांत असे अब्जावधी कागद व्यर्थ जमा केले जाताहेत. शिवाय ते कागद ठेवण्यासाठी जागा आणि सांभाळण्यासाठी मनुष्यबळ. हा राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय नाही का?
(२) ऑडिट सर्वसामान्यपणे कोणत्यातरी प्रोसेसचं (अथवा प्रॉडक्टचं) असतं. ऑडिट कशाच्या आधारावर करायचं? लिखित स्वरूपात जी documents असतात, ज्यांच्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी काम करावं अशी अपेक्षा असते, त्यांच्या आधारावर. ऑडिटरच्या मनाला वाटेल ती requirement आणि तो म्हणेल ते योग्य वा अयोग्य, असं चालत नाही. अमुक कंपनीत किती छान सिस्टिम्स आहे, तुम्ही ती का फॉलो करीत नाही' असं प्रोजेक्ट मॅनेजरला ऑडिटचा भाग म्हणून विचारलं तर ऑडिटरला ट्रेनिंगची गरज आहे हे खुशाल समजा.
प्रश्न हा, की ऑडिटर विचारील म्हणून आम्ही ही documents मागतो, हे मठ्ठ उत्तर सर्वजण का देतात? ते कधीतरी ऑडिटरला विचारतात का, बाबा, कुठे लिहिलं आहे, अशा अशा ठिकाणी पॅन कार्ड व आधार कार्डच्या प्रती मागायला हव्यात? मी आजवर भिन्न बँकांच्या आठ-नऊ कर्मचाऱ्यांना हा प्रश्न विचारला आहे. मला त्याचं समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. (अर्थात, मला उत्तर द्यायला ते बांधील नाहीत म्हणा.)
तद्वत, माझीच चुकीची समजूत झाली असेल तर सांगा. इथे बँकेत अधिकारपदावर व डोळसपणे काम केलेले कोणीतरी असतीलच.
नाहीतर आमचा एक मित्र म्हणतो तसं, 'अरे, त्यांना पाहिजे ना, मग देऊन टाक सही करून एक कॉपी. तू कशाला नसती उठाठेव करतोस?' हे आहेच.
उठाठेव अशासाठी, की ह्यात आपले खूप रिसोर्सेस फुकट जाताहेत हे खटकतं. बँकांत कर्मचारी सदैव overloaded दिसतात. अशी unproductive कामं केल्यावर दुसरं काय होणार?
म्हणून ही पृच्छा.
धन्यवाद.
रविकिरण फडके
वर्गीकरण
वाचने
8558
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तरं सोपी आहेत.
४) रहिवास पुरावा
In reply to उत्तरं सोपी आहेत. by कंजूस
क्रमांक (४) साठी
देशभरांत असे अब्जावधी कागद
डिजिटल स्टोरेज
सर्वच अनुभव लिहीत नाही....
"सारे प्रवासी घडीचे" जयवंत
In reply to सर्वच अनुभव लिहीत नाही.... by कर्नलतपस्वी
बरोबर..
In reply to "सारे प्रवासी घडीचे" जयवंत by मोदक
ऑटोमेशन?
फडके साहेब,
मनुष्यबळाचा अपव्यय हाच
दुसरा एक मजेशीर किस्सा. SBI
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
नियम
मलाही हाच प्रश्न पडलाय कि
> आधार क्रमांक काढते वेळी
In reply to मलाही हाच प्रश्न पडलाय कि by चौथा कोनाडा
ऑथेंटिकेशन, ऑथोरिझशन आधार
In reply to > आधार क्रमांक काढते वेळी by साहना
अकाऊंट मध्ये ३ लाख रुपये आहेत
ह्याच उत्तर असं आहे.
In reply to अकाऊंट मध्ये ३ लाख रुपये आहेत by चौकस२१२
मी आताच २३ मार्चला एन के जी
बँकेतील एक सुखद अनुभव ( कॅपिटल अकॉउंट ट्रान्सफर )
SBI कर्मचाऱ्यांना नियम माहीत नसतात.
आधार जर सरकारला इतके आवडते तर
आधार हवेच आहे सरकारला.
In reply to आधार जर सरकारला इतके आवडते तर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दर वेळी ओळखपत्राची कॉपी कशाला पाहीजे?
In reply to आधार हवेच आहे सरकारला. by कंजूस
बायोमेट्रिकने रेशन मिळते,
माझ्या माहितीने आधार आणि बायोमेट्रिक वापरुन २० हजार रुपये पर्यंत
In reply to बायोमेट्रिकने रेशन मिळते, by आग्या१९९०
बायोमेट्रिकने रेशन
In reply to बायोमेट्रिकने रेशन मिळते, by आग्या१९९०
अशा अडचणी उद्भवून ज्येष्ठांना
In reply to बायोमेट्रिकने रेशन by कंजूस
बँकांचे वाईट अनुभव
स्टेट बँक ऑफ इंडिया - केवायसी अनुभव
डिमॅट खात्याला नॉमिनी केलेला
काही महिन्यांपूर्वी आलेला
कर्मचारी आणि पोटदुखी
सॉरी. आटोकरेक्ट
विनोदी आणि वैताग आणणारी माहिती
नो युअर कस्टमरचा खरा उद्देश अँटी मनी लॉंडरिंग आहे.
माझे इतर बँकांतले खाते बंद
- - बँकेच्या शाखेच्या च्या ईमेल आयडी वर रितसर रिक्वेस्टचा मेल टाकायचा. (त्याचे उत्तर कधीही येत नाही हे माहित असूनही करायचे.)
- - २-३ दिवसांनी परत एक रिमाइंडर मेल टाकायचा. पण त्यात बँकेच्या रिजनल हेडचा/एजीएम चा ईमेल आयडी सुद्धा सीसी मधे ठेवायचा आणि अर्जाकडे लक्ष देण्याची विनंती करायची. (याचेही उत्तर ९९% वेळा येत नाही.)
- - २-३ दिवसांनी परत एक रिमाइंडर मेल टाकायचा. पण आता तो मेल बँकेच्या रिजनल हेडचा/एजीएम च्या ईमेल आयडीवर पाठवायचा आणि बँकेच्या शाखेचा ईमेल आयडी सीसी मधे ठेवायचा. या मेल मधे सरळ विचारणा करायची एजीएमला की "माझ्या अर्जावर काम होणार आहे किंवा नाही आणि होणार असल्यास कधी."
यानंतर मला तरी २ दिवसात उत्तर आणि मागितलेली माहिती मिळालेली आहे. २. सगळ्या एस बी आयच्या शाखांमधे एक तक्रारपेटी (कंप्लेंट बॉक्स) असते, ज्याकडे आपण सपशेल दुर्लक्ष करतो. पण हा एक खात्रीलायक उपाय आहे. जर कर्मचार्यांनी नीट वागणूक दिली नाही तर रितसर तक्रार कोर्या कागदावर लिहून, लिफाफ्यात घालून, एजीएमच्या नावे त्या तक्रारपेटीत मधे टाकावी. तक्रारपेटीमधली प्रत्येक तक्रार ही एजीएम च्या देखरेखीखाली उघडली जाते आणि त्याचा पाठपुरावा ती तक्रार बंद होईतोवर केला जातो हा माझा अनुभव आहे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे की तक्रार ही केवळ ग्राहकाच्या कन्सेंटनेच बंद होऊ शकते, त्यामुळे गरज पडल्यास बँकेच्या मॅनेजरला देखील ग्राहकाच्या घरी जावे लागते. आता एजीएम / एजीएम ची टीम ही कामे का करतात? तर याची काही कारणे आहेत. - एजीएम कडे दिलेली प्रत्येक रितसर तक्रार, ही त्यांना बँकेच्या सॉफ्टवेअर मधे घालणे आणि त्यावर इलाज करणे हे बँकेच्याच नियमानुसार बंधनकारक आहे. त्याचे अंतर्गत ऑडीट होत असते. आणि ज्या कर्मचार्याच्या विरोधात ही तक्रार असते त्याला खरंच बूच लागू शकते. - या टीमच्या लोकांसाठी "आम्ही किती तक्रारी सोडवल्यात" हे त्यांच्या कामाच्या मापदंडासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा निकष आहे. बाकी केवायसी ही खरंच एक पीडा असल्याचा अनुभव बर्याचदा घेतलाय. अन् त्यावर सगळ्यांनी लिहिलेल्या अनुभवांशी सहमत आहे. निर्बुद्धपणे काम करण्यात काही लोकांना जे सुख मिळतं ना त्याची काही तोड नाही हे अगदीच खरंय. ओळखीच्या एका आजोबांना जिवंत असल्याचा दाखला देण्याच्या वेळेस आलेला एक अनुभवच यासाठी पुरेसा आहे. त्यांना कर्मचारी म्हणाला "आदल्यावर्षी तुम्ही दाखला जमा केला नव्हतात, त्यामुळे यावर्षीच्या दाखल्यासमवेत आदल्यावर्षीचा दाखला देखील नियमानुसार जमा करावा लागेल." यावर "आ" वासून देखील कितीवेळ उभं राहणार? त्यामुळे त्या निर्बुद्ध माणसाला समजवत बसण्यात वेळ न घालवता आजोबांनी बँक मॅनेजरला जाऊन हा किस्सा सांगितला आणि त्यावर त्या मॅनेजरने (स्वत:च्या) डोक्यावर हात मारून स्वतःच त्यांचे काम करून दिले! बादवे, https://www.digilocker.gov.in/ ही सुविधा वापरून त्यात ठेवलेल्या आपल्या कागदपत्रांची लिंक अधिकृत कामांसाठी वापरणे खरंच शक्य आहे. तसं सरकारी धोरणच आहे. एकदा बँकेत यावरून राडा करावा असा मानस आहे. बघुयात! राघवबँकेत अपंगांना काम देणे.