मनाचे श्लोक आणि विवाद
हिंदीत एक म्हण आहे—"बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो होगा!"
नाव + कुप्रसिद्धी = पैसा या गणितीय समीकरणाचा लाभ अनेकांना झालेला आहे. मराठी सिनेमांचे बजेट तसेच कमी असते. त्यामुळे प्रसिद्धी मिळवण्यासाठी डोके वापरावे लागते. या निर्मात्यानेही डोक्याचा वापर केला आणि सिनेमाला प्रसिद्धी मिळवून दिली.
ज्या सिनेमाचा समर्थ रामदास रचित मनाचे श्लोकशी काहीही संबंध नाही, त्या सिनेमाला मनाचे श्लोक हे नाव दिल्यावर जनता भडकली पाहिजे, विरोधात उतरली पाहिजे—अशी निर्मात्याची अपेक्षा होती आणि तसेच घडले. एक पैसा खर्च न करता सिनेमाला प्रसिद्धी मिळाली.
मिसळपाव