विसंगती सदा घडो...
लोकांना आपल्याच वागण्यातली विसंगती कळते का कधी..? दोन अॅक्टीवास्वार, एक युवती व एक म्हातारे काका वीसफुटी रस्त्याचा डावा अर्धा भाग आवरून गप्पा हाणित उभे.. मी सरळ त्येंच्या अंगावर फोर-वीलर घातली. बाकी रस्ता मोकळा असूनही वळसा घातला नाही. ते हटेपर्यंत शांतपणे कार त्यांच्यासमोर उभी ठेवली. त्यांच्या आरामाच्या गप्पांमधे खंड पाडल्याने माझ्या कडे भयंकर क्रुद्ध नजरेने पाहत होते. जणू मीच मोठ्या गाडीची मस्ती दाखवत होतो. हे आपल्या भारताचे सुशिक्षित सुसंस्कृत मध्यमवर्गीय नागरिक, जे जाता-येता 'इस देश का कुच नै हो सकता' आळवत असतात, दुसरे कसे चुकीचे वागतात यावर धीर-गंभीर चर्चा झाडत असतात.
मिसळपाव