Skip to main content

द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

लेखक जावा फुल स्टॅक यांनी शुक्रवार, 05/05/2023 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा. पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो. चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत. धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते. चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही. --- रेटिंग : ४.२/५
  • चित्रीकरण *****
  • अभिनय *****
  • दिग्दर्शन ****
  • पटकथा ****
  • परिणामकारता ****
--- द केरल स्टोरी चित्रपटाचे युट्यूब टीजर --- हा चित्रपट आणि त्यातील संदेश यांपुरती मर्यादित चर्चा करण्याची; धाग्याला राजकीय वळण लागू न देण्याची मिपाकरांकडून अपेक्षा. - जावा फुल स्टॅक

वाचने 24477
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

या सिनेमाबद्दल एक व्हिडिओ बहुतेक रिजवान अहमद यांचा एका सहकार्याने कायप्पावर पाठवला.केरळ लव्ह जिहाद वर अतिशय मार्मिक भाष्य या सिनेमाच्या निमित्ताने केलं आहे.

चित्रपटाची उत्तम ओळख करुन दिली आहे. -दिलीप बिरुटे

प्रोपोगंडा सिनेमा आहे असे वरकरणी दिसते. काहीच्या काही वाढवून चढवून दाखवले आहे असे रिव्ह्यूज वाचून समजते आहे. खुद्द ट्रेलर मध्ये ३२००० मुलींचा आकडा होता तो बदलावा लागला, सिनेमात मात्र आहे तसे ठेवले आहे.

In reply to by कॉमी

वास्तविकता तर सिनेमात जे दाखविले असेल त्यापेक्षा दहा पट जास्त असेल. कुणी काश्मिरी ब्राम्हण भेटला असेल तर त्याला विचारा. या शिवाय महाराष्ट्रात किती मुली लव जिहादच्या शिकार झाल्या आहेत. या बाबत माहिती घ्या..

In reply to by कॉमी

काहीच्या काही वाढवून चढवून दाखवले आहे असे रिव्ह्यूज वाचून समजते आहे. खुद्द ट्रेलर मध्ये ३२००० मुलींचा आकडा होता तो बदलावा लागला, सिनेमात मात्र आहे तसे ठेवले आहे.
१. अधोरेखित भागाधारित प्रश्न: तुम्ही हा सिनेमा पहिला आहे का? २. मी हा सिनेमा पाहिलाय, त्यात ३२००० हा आकडा मलातरी दिसला नाही / ऐकू आला नाही. (चूभूदेघे)
काहीच्या काही वाढवून चढवून दाखवले आहे
३ अ. तुमच्या माहितीनुसार / समजुतीनुसार किती मुस्लिम / मुस्लिमेतर तरुणी या प्रकारांना बळी पडल्या असतील? ३ आ. तुमच्या मतानुसार किती बळी पडल्यानंतर हा सिनेमा / असा इतर कोणता सिनेमा प्रदर्शित करण्याचे समर्थन करता येईल?

In reply to by वामन देशमुख

१. मी हा सिनेमा पाहिला नाही. २.शेवटी एका ख्रिश्चन मुलीचा मोनोलॉग आहे त्यात ३२००० हा आकडा वापरला आहे. ट्रेलर पोस्ट करताना ३२००० मुलींची गोष्ट असे लिहिले होते, नंतर त्या पोस्ट डिलीट केल्या. (त्या मी पाहिलेल्या.) ३. माझ्या वैयक्तिक मताचा किंवा समजुतीचा इथे प्रश्न नाही असे वाटते. इथे सत्यापित रिपोर्ट वरूनच आकडेवारीचा अंदाज येतो. माझ्या वाचाणाप्रमाने केरळ मधील आयसिस जॉईन केलेल्या ज्ञात लोकांची संख्या २१ आहे. ३आ. मी कधी सिनेमा काढावा ह्यावर एक शब्द सुध्दा लिहिले नाहीये. कधीही काढावा. पण आकडे फुगवून सांगू नयेत.

In reply to by कॉमी

"...पण आकडे फुगवून सांगू नयेत." कदाचित आकडा फुगवून सांगितलं असले पण हे सर्व अनेक वर्षे भारतात आणि इत्रतरी चालले आहे हे लपवावयाचे का? का सतत बजरंगी भाईजान सारखेच चित्रपटाचे ची अफू पाजत बसायची काँगेस काळात आंधी आणि किस्सा कुर्सी का वर आलेली बंदी आठवावी

In reply to by चौकस२१२

तुम्ही माझे अर्धवट कोट केलेले वाक्य आहे खुद्द त्याच वाक्यात मी लिहिले आहे कि कोणी कशावर सिनेमा काढावा आणि का काढू नये ह्याव्रर माझे काहिहि म्हणणे नाही. पण तुम्ही २१ चे ३२००० करणार असाल तर नैसर्गिक आहे कि तुमच्या उद्दिष्टावर शंका घेतली जाईल आणि तुमचा मुद्दा गंभीरपणे घेतला जाणार नाही. जर दिग्दर्शकानेच ह्याची खबरदारी घेतली असती तर ही वेळ आलीच नसती.

In reply to by कॉमी

तथाकथित ३२ हजार हा आकडा नक्की कसला आहे? लव्ह जिहादला बळी पडून धर्मांतरीत झालेल्या मुलींचा आकडा की आयसिसमध्ये सामील होऊन सिरीयाला जायला निघालेल्या/गेलेल्या मुलींचा आकडा? तो दुसरा आकडा आहे असा दावा कोणी केल्याचे ऐकिवात नाही. हा आकडा पहिला (धर्मांतरीत झालेल्या मुलांचा) असाच दावा माझ्या मते आहे. समजा तो आकडा किती आहे असा दावा असता तर तुमच्यासारख्यांना तो पटला असता? २० हजार? १० हजार? ५ हजार? २ हजार? ५००? २००? १००? १०?५? १? काश्मीरमध्ये हिंदूंच्या कत्तली झाल्या, त्यांना विस्थापित व्हावे लागले याविषयी असले काही झालेच नाही पासून काश्मीर फाईल्समध्ये जे काही दाखवले आहे ते फुगवून दाखवले आहे पर्यंत वेगवेगळे दावे झाले होते. त्यामुळे ३२ हजार (असा दावा केला गेला असेल तर) ऐवजी तो आकडा कितीही आहे असा दावा केला असता तरी तो आकडा फुगवलेलाच आहे असे तुमच्यासारख्यांकडून म्हटले गेले असते ही शक्यता सगळ्यात जास्त.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

The Kerala Story' stars Adah Sharma, Yogita Bihani, Siddhi Idnani and Sonia Balani in the lead roles. The trailer of Sen's film 'The Kerala Story' came under fire as it claimed that 32,000 girls from the state went missing and later joined the terrorist group ISIS. In a police station scene, one of the girls rattles off numbers to prove that Kerala is heading for trouble. She claims that more than 30,000 girls have been converted to Islam and weaned away to fight for ISIS. She quotes a former chief minister of the state as saying that Kerala will become an Islamic state in 20 years. The film makes no attempt to tell the audience where the numbers and that fears have emanated from. तो आकडा कितीही आहे असा दावा केला असता तरी तो आकडा फुगवलेलाच आहे असे तुमच्यासारख्यांकडून म्हटले गेले असते ही शक्यता सगळ्यात जास्त. >>> सिनेमामध्ये २२ कोटी आकडा असता आणि आम्ही तक्रार केली असती तरी तुम्ही असेच बोलला असता ह्याची शक्यता सगळ्यात जास्त.

In reply to by कॉमी

उगी उगी. बाकी मार्क्सच्या जन्मदिनाच्या उशीराने शुभेच्छा.

In reply to by कॉमी

In a police station scene, one of the girls rattles off numbers to prove that Kerala is heading for trouble. She claims that more than 30,000 girls have been converted to Islam and weaned away to fight for ISIS.
त्या प्रसंगात ती मुलगी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासमोर ३० कि ५० हजार अशा घटना घडल्या असल्याच चा उल्लेख करते आणि त्यापैकी केवळ ७०३ प्रकरणांची नोंद झाली असून त्यातल्या फक्त २६१ व्हिक्टिम्सची सुटका करण्यात आली आहे असा काहीसा तो संवाद आहे. अत्यंत प्रभावी सादरीकरण असलेला हा चित्रपट पाहावा आकड्यांच्या नादी लागू नये, तो पब्लिसिटी स्टंट असू शकतो असे माझे वैयक्तिक मत! आणि हो, प्रत्यक्ष आकडा कितीही असला तरी त्या मुलींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या तीन मुलींची हि कथा आहे त्यातली फक्त एक मुलगी प्रत्यक्षात isis मध्ये भरती होताना दाखवली आहे, अन्य दोन मुलींच्या आयुष्याची प्रचंड फरफट होते, त्यामुळे लव्ह जिहादला बळी पडलेल्या जेवढ्या मुली असतील त्या सर्व isis मध्ये भरती झाल्या वगैरे मुद्द्यांवर चित्रपट न पहाता चर्चा करणे अगदीच गैरलागू ठरेल असेही नमूद करू इच्छितो (हे कोणा एकाला उद्देशुन नाही) !

In reply to by कॉमी

ते निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकालाच माहित 😀 पण तो आकडा प्रत्यक्षात ३ किंवा ५ जरिअसला तरी त्याने विषयाची दाहकता कमी होत नाही असे चित्रपट पाहिल्यानंतर बनलेले माझे मत आहे!

In reply to by टर्मीनेटर

तुमचे म्हणणे मला अमान्य नाहीच. पण एक किंवा २ किंवा २१ घटना आणि ३२०००/५०००० घटना ह्याने अतिशय वेगवेगळे चित्र निर्माण होते.

In reply to by कॉमी

३२०००/५०००० घटना ह्याने अतिशय वेगवेगळे चित्र निर्माण होते.
+१ त्यासाठीच हा पब्लीसिटी स्टंट असावा असे मला वाटते. आणि तसा तो असल्यास नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा देउन रिलीज केलेल्या चित्रपटाच्या 'टिजर' वरुन अत्ता चित्रपट प्रदर्शित होण्यच्या/झाल्याच्या सुमारास गदारोळ होउन चित्रपटाची एवढी चर्चा होते आहे/प्रसिद्धी मिळत आहे म्हणजे त्यात निर्माता-दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत असेही म्हणण्यास वाव आहे!

In reply to by कॉमी

आकडा गेला चुलीत .. हे असे होतच नाहीये, हिंदूंचा हा कांगावा आहे असे म्हणणे आहे का तुमचे? स्पष्ट हुन जाऊद्या,, हा सूर्य हा जयंद्रथ / बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या म्हणी रमाणे

In reply to by चौकस२१२

यातील "ब्रेकिंग न्युज" हा नेहमीचा आरडाओरडा बाजूल ठेवूया . मुख्य मुद्दा हा कि जगभर हे चाललंय आणि तुमच्या सरकेचे एकदा काय म्हणून असून बसल्यात

In reply to by टर्मीनेटर

अत्यंत प्रभावी सादरीकरण असलेला हा चित्रपट पाहावा आकड्यांच्या नादी लागू नये, तो पब्लिसिटी स्टंट असू शकतो असे माझे वैयक्तिक मत!
सहमत. अवांतर- म्हणूनच तो आकडा किती दाखवला असता तर तो खरा वाटला असता असे विचारले. समजा तो आकडा त्यांचे समाधान होईल इतका कमी असता तर मग दुसर्‍या कोणत्यातरी काल्पनिक मुद्द्यावरून गदारोळ चालू केला असता. जे मागच्या वर्षी काश्मीर फाईल्सच्या वेळेस झाले तेच यावेळेस केरळ स्टोरीच्या निमित्ताने.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

तर मग दुसर्‍या कोणत्यातरी काल्पनिक मुद्द्यावरून गदारोळ चालू केला असता.
ते तर आहेच, आणि तसेही चित्रपटातील कम्युनिस्ट विचारसणीच्या पित्याची मुलगी असलेली पुर्वाश्रमीची 'गितांजली' (गितु) आणि धर्मांतरणानंतर झालेली 'अनिशा' ह्या पात्राच्या तोंडीचा सुरुवातीचा, "Communists are the most Hippocrates" आणि नंतर पश्चातापदग्ध अवस्थेत त्याच पित्याच्या मांडीवर डोके ठेउन रडत त्याला "तुम्ही आम्हाला परकीय कम्युनिस्ट विचारसरणीचे धडे दिलेत, पण आपल्या परंपरा आणि संस्कृती शिकवली असती तर अशी वेळ आली नसती" अशा आशयाचे दोन संवाद मुस्लीम तुष्टीकरणात अग्रेसर आणि ख्रिस्चन धर्मसंस्थेच्या (अर्थात चर्चच्या) पुर्णपणे प्रभावाखाली असलेल्या 'तथाकथीत' कम्युनिस्ट विचारसरणीच्या केरळ सरकार आणि इतर डाव्या मंडळींना मिर्च्या झोंबवण्यास पुरेसे होते त्यामुळे त्यांनी वाट्टेलत्या मुद्द्यावरुन आकांड तांडव केलेच असते हे नक्की 😀

In reply to by टर्मीनेटर

"ख्रिस्चन धर्मसंस्थेच्या (अर्थात चर्चच्या) पुर्णपणे प्रभावाखाली असलेल्या 'तथाकथीत' कम्युनिस्ट विचारसरणीच्या" हे फक्त भारतीय कम्युनिस्टांच्या बाबतीतच होऊ शकते,,, कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या कम्युनिस्टांना धर्म वैगरे आवडत नाही म्हणजे जसे काही शीख ख्रिस्त्री तर बनतात पण शीख धर्मातील मुख्य गोष्टी सोडतच नाहीत ( कन्फयुजन हुता होगा )

In reply to by चौकस२१२

कारण यांना हे हि समजत नाही कि खऱ्या कम्युनिस्टांना धर्म वैगरे आवडत नाही
+१ तोच विरोधाभास अधोरेखीत करायचा होता म्हणुन 'तथाकथीत' कम्युनिस्ट विचारसरणीच्या असे लिहीले! इतर धर्मियांचे तुष्टीकरण आणि हिंदुंचा तीव्र द्वेष एवढाच भारतीय कम्युनिस्टांचा एककलमी कार्यक्रम असतो. सदर चित्रपटातील "Communists are the most Hippocrates" हा गितांजली नामक पात्राच्या तोंडचा संवाद म्हणूनच मला फार फार आवडला 😀 असो... धाग्याला भलतेच वळण लागयला नको म्हणुन आता प्रतिसाद आवरते घेत बऱ्याच दिवसांनी आज मिळालेलया फावल्या वेळेचा सदुपयोग करत वरती एका प्रतिसादात म्हंट्ल्याप्रमाणे हा चित्रपट मला कसा वाटला आणि का आवडला ह्यावर भाष्य करणारा स्वतंत्र लेख लिहायला घेतो!

In reply to by टर्मीनेटर

* 'Hippocrates' ह्या आणि वरच्या काही प्रतिसादांमध्ये 'hypocrites' असे लिहायचे होते पण टंकताना ऑटो कंप्लीट्द्वारे त्याजागी आलेल्या 'Hippocrates' अशा चुकिच्या स्पेलिंगकडे दुर्लक्ष झाले आणि पुढेही तेच वाक्य प्रतिसादांत कॉपी-पेस्ट केल्याने प्रत्येक ठिकाणी त्याच चुकिच्या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे त्याबद्दल क्षमस्व 🙏 ते वाक्य "Communists are the most hypocrites" असे वाचावे!

In reply to by कॉमी

@ कॉमी मी हा सिनेमा पाहिला नाही. मग टिप्पणी करण्याची एवढी घाई कशासाठी? बयरामजी नर्सिंग होम मधून काळ्या कुत्र्याने नवजात बालकाला पळवले या बातमी वर डॉ बयरामजी आक्षेप घेऊन गदारोळ करतात कि हि बातमी साफ खोटी आणि चुकीची आहे. प्रत्यक्ष काय झाले असे विचारता डॉ बयरामजी म्हणतात साफ खोटी बातमी आहे ती काळ्या कुत्र्याने नव्हे तर तांबड्या पाठीच्या कुत्र्याने बालक पळवले. अशा तर्हेचा आपला युक्तिवाद आहे. . धाग्याचे काश्मीर करण्यासाठी छिद्रान्वेषीपणा करण्याची हि वृत्ती अत्यंत खालच्या पातळीची आहे एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by सुखी

Context सोडून वाचले की असेच होणार. खरे सर मला छिद्रान्वेषी म्हणले त्यासंदर्भात भगदाड आणि छिद्र शब्द आहेत.

In reply to by कॉमी

२१ चे ३२००० हे छिद्र नाही, भलेमोठे भगदाड आहे. परत वृत्ती तीच मूळ प्रश्न लव्ह जिहाद आहे कि नाही हे सोडून तपशिलात घोळ घालत बसायचं आणि धागा भरकटवायचा.

In reply to by कॉमी

ज्याच्या घरातल्या मुली अश्या फ्रीज किंवा आयएसआयएस त्यांच्या घरच्यांना पण विचारा, प्रपोगंडा आहे की नाही ते कळेल. बाकी आपलं नेहमीचं दळण चालू द्या

सिनेमाचे दिग्दर्शन बऱ्याच ठिकाणी ढिसाळ आहे पण धाग्यात म्हटल्याप्रमाणे, वेगवान कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवते. माझ्या मते सिनेमा पाहून मते बनवावीत. सिनेमातील तुकड्यातुकड्यांमधून येणारे पागल परिंदे हे गाणे मला आवडले. ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा जिस राह की मंज़िल नहीं वहीं खो गया होके गुमराह --- संपूर्ण गाणे इथे ऐकता येईल: हंगामावरची गाण्याची लिंक

अश्या अनेक घटना प्रत्यक्षात घडलेल्या आहेत. अनेक हिंदू मुलींना फसवून धर्मांतर करून लग्न लावण्यात आले आहे. त्याविषयी उद्या लिहितो.

चित्रपट पाहिल्यावर लक्षात आलं की, धागा लेखकाने अतिशय संयमाने चित्रपटाचं परिक्षण लिहिलंय. जावा फुल स्टॅक यांचं खरंच कौतुक आहे. क्रूर, बटबटीत, भडकपणानं अंगावर येणा-या सिनेमाचं तटस्थपणे, परिक्षण करण्यासाठी जो अलिप्तपणा असावा लागतो, तो परिक्षणात आलाय. दहशतवादी आपलं इप्सित साध्य करण्यासाठी जे काही पर्याय निवडतात, ते भयंकरच असतं. ज्या कुणावर अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं ते तितकंच वेदनादायी. बाकी, ताश्कंद फाईल्स, काश्मीर फाईल्स, द, केरला ष्टोरी, आणि आता पुढे 'लोकसभा २०२४' असा एखादा सिनेमा येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पेड ट्रोल्स, पुरस्कार वापसी गँग आणि मुख्य म्हणजे पैशाच्या लोभाने का आणखी कोणत्या प्रलोभनाने अंतर्जालावर धडधडीत खोटे बोलणार्‍या सो कॉल्ड उच्चशिक्षित लोकांवरती पण असे चित्रपट येऊन यांचे बुरखे टराटरा फाडले पाहिजेत.

In reply to by मोदक

पेड ट्रोल्स, पुरस्कार वापसी गँग आणि मुख्य म्हणजे पैशाच्या लोभाने का आणखी कोणत्या प्रलोभनाने अंतर्जालावर धडधडीत खोटे बोलणार्‍या सो कॉल्ड उच्चशिक्षित लोकांवरती पण असे चित्रपट येऊन यांचे बुरखे टराटरा फाडले पाहिजेत.
१००% सहमत!

In reply to by वामन देशमुख

एकदम सही ! नुसतेच बुरखे फाडणे पुरेसे नाही. खुप हाल हाल केले पाहिजेत.

In reply to by मोदक

'मंद भक्त' 'अंध भक्त' 'प्रचारी भक्त' अशाही विषयांवर सिनेमे आले पाहिजेत. काळाची ती गरज आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by चौकस२१२

"अंध गुलाम १ काँग्रेस २, राष्ट्रवादी ३, सेना हे लोक तर रोजच टीव्हीवर अकलेचे तारे पाजळत असतात. त्यांना बघण्यासाठी पैसे देउन तिकीट कोण विकत घेईल ? अगदी तुमच्या आसपासही ते फिरत असतील. दु:ख हे आहे की त्यंनी कितीही मूर्खपणा केला तरी त्यांना मते देणारे लोक आहेत. वास्तवीक राहुल गांधी, संजय राउत, आप पार्टीचे लोक यांना फक्त आणि फक्त सर्कशीत जोकर म्हणुन काम करायची परवानगी द्यायला पाहिजे. त्यांना मोकळे सोडु नये.दुसरे काही करतांना सापडल्यास त्यांना मिठाच्या पाण्याने भिजवलेल्या चाबकाचे फटके द्यायला पाहिजे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'मंद भक्त' 'अंध भक्त' 'प्रचारी भक्त बिरुटे सर कुठूनही काहीही कारण नसताना श्री मोदी आणि अंधभक्त यांच्यावर विषय आणलाच पाहिजे का? विषय काय आणि आपण कुठे काय करतो आहे हे भान आपल्या सारख्या अतिउच्च शिक्षित माणसाला नसावे हे केवळ द्वेषमूलक विचारसरणीचे लक्षण आहे. माणूस द्वेषाने किती अंध होऊ शकतो याचे आपण एक उत्तम उदाहरण समोर आणत राहता.

In reply to by सुबोध खरे

".....अतिउच्च शिक्षित माणसाला नसावे..." मोदींच्या भाजपच्या एकाद्या धोरणावर यांनी अभ्यासपूरने टीका केली तर समजू शकतो पण ज्यात त्यात मोदी आणणे ... केवळ कलुषित मन /द्वेषमूलक सरांचा हा "हेट जिहाद" दिसतोय पालथ्या घड्यावर पाणी

आता पुढे 'लोकसभा २०२४' असा एखादा सिनेमा येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. भावना नाही पोचल्या,,, इस्कटून इस्कटून सांगावे

चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. प्रेक्षकांना निदान हे कळावे कि अश्या गोष्टी घडत आहेत एवढे घडले तरी पुरे हिंदूंचे विभाजन आणि धार्मिक परिवर्तन होते आहे हे सत्य आहे चित्रपतातून ते कसे दाखवयाचा तो निर्माता आणि दिग र्शकाचा निर्णय असतो हे उदाहरण अनेकांनी पहिले असेल "विभाजन आणि धार्मिक परिवर्तन" नसेल तर बघा https://www.youtube.com/watch?v=MSprAZJWf18&t=72s

एक नंबर चित्रपट! केवळ भारतीयांनीच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीने बघावा असा चित्रपट आहे. जावा फुल स्टॅक तुम्ही परीक्षण थोडक्यात पण छान लिहिले आहे 👍 काल हा चित्रपट पाहिला आणि केवळ प्रतिसादातून ह्या कलाकृतीवर मतप्रदर्शन करणे अवघड असल्याने ह्याच विषयावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याचा विचार करत आहे त्याबद्दल क्षमस्व!

ज्यांना गदारोळ करायचा असतो त्यांनी कशावरूनही गदारोळ केलाच असता, ३२ वरून नाहीतर ७२ वरून! --- बाकी अजूनही, "ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा" या ओळी आणि त्यामागची दाहकता मनातून जात नाहीय. --- "हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत" याचीच हा सिनेमा पाहून प्रचीती येतेय.

बाकी अजूनही, "ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा" या ओळी आणि त्यामागची दाहकता मनातून जात नाहीय.
अगदी...अगदी... काल हा चित्रपट पाहील्याला आता १५ तास उलटुन गेलेत पण ह्या गाण्याचा हँगओव्हर काही अजुन उतरत नहीये! ह्यावर कुठला उतारा घ्यावा अशा विचारात पडलोय 😀

मागे काही महीन्यांआगोदर मालवणचे 'ते' प्रसिध्द आमदार ह्या विषयाबाबत बोलत होते. तेव्हा त्यांनी उल्लेख केला की अशा 'कामा'साठी काही मुले पैसे घेतात. ब्राम्हण मुलीचे वेगळे पैसे, मराठा असेल तर वेगळे, गुजराती असेल तर वेगले असे पैसे दीले जातात. हे ऐकुन मला थक्क व्हायला झाले व खुप रागही आला. असे करण्याचे कारण, उद्देश हा हींदु लोकसंख्या कमी करणे असतो. मुलगी कुठे काय करतेय ह्याकडे बारीक लक्श असणे फार गरजेचे आहे असे वाटते.

In reply to by शानबा५१२

झालेल्या जन जागृतीमुळे ब्राम्हण आदि लोक काळजी घ्यायला लागले आहेत. आणि उगीचच त्रास नको म्हणुन या लव्ह-जिहाद वाल्या लोकांनी आपली स्ट्र्टेजी बदलली आहे. हल्ली ते आंबेडकरी आणि तत्सम मुलींवर ( आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातल्या ) निशाणा साधतात. त्यांना जाळ्यात पकडणे त्या मानाने सोपे असते. परत थोडे बहुत मारहाण, त्रास दिलेले ही चालते कारण आसपास त्या तेच पहात असतात. अजुन दहा वर्षात त्यांची संख्या बदलली असेल. मग हेही लोक जागे होतील

इसिस बरोबर लग्न https://www.youtube.com/watch?v=Q_GIUbyyuRw हे पहा आणि आता काय येथे मजूर सरकार आल्यामुळे त्यांचे रिहदय पिळवटून निघाले आहे आणि या महिलांना परत आणण्याचा प्रयत्न चालू आहे also love how EVERY one of the brides has an excuse. I was tricked. I was on vacation. I was trying to help. I made a wrong turn.

गेल्या ९ वर्षात महामानव मोदीजी आणि लोहपुरुष शाहजी ,सुपरस्पाय डोवाल जी यांच्या नेतृत्वाखालच्या बलशाली भारतामध्ये ३०००० मुलीच धर्मांतर किंवा देशाबाहेर अपहरण झालं आणि त्या जोडगोळीला ज्याचा पत्ता लागला नाही आणि याकिश्चित सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे या प्रकरणाची इत्यंभूत माहिती आहे हे म्हणजे हि वरची लोक अकार्यक्षम ठरलेत असा स्पष्ट आरोप होतोय आणि याचा तीव्र णिशेध अध्यक्ष महोदय !!इथे लोकांच्या फ्रिज मध्ये काय आहे हे अख्खा देशाला मीडिया वाले बोंबलून दाखवत असतात आणि एवढा मोठा प्रकार होऊन ९ वर्षांनी सिनेमा मधून सांगावं लागतंय . आणि ३ कि ३०००० याने काय फरक पडतो म्हणणार्यांना एकच प्रश्न आहे ,ज्याला सत्य दाखवायचं आहे तो जेव्हा खोटेपणाचा आधार घेतोय तेव्हा त्याच्या हेतूंबद्दल शंका घेतली जाणारच , NCRB report: Maharashtra in top three in crimes against women, Delhi most unsafe metro city In the abetment to suicide of women cases, Maharashtra tops the list with 927 cases, followed by Madhya Pradesh (758) and West Bengal (456). August 30, 2022, त्या ३ मुलीबद्दल कळवळा आहे हे स्वागतार्ह पण जेव्हा हिंदू नवरा किंवा पुरुषांकडून हिंदू महिलांचं शोषण ,फसवणूक,बलात्कार किंवा हत्या होते तेव्हा तो नॅशनल चिंतेचा विषय कसा नसतो तिथे ब्रिजभूषण ,सेनेगार सारख्या लोकावर आरोप झाले कि मात्र पुरावे कुठे आहेत?कोर्ट चौकशी करेल ,संविधान वगैरे सोयीस्कररीत्या आठवत ! मुस्लिम रिलेटेड काही आलं कि तिथे रेटून अजेन्डा ढकलायचा ,इस्लामिक राष्टफळांना ढिकाना !महाराष्ट्रात रेप चे आरोपी मंत्री आहेत मंत्री मंडळात आणि बार पीडित पण हिंदूच तिथे नाही पूजा चव्हाण स्टोरी ,हाथरस स्टोरी ,उन्नाव स्टोरी ..

In reply to by स्वप्निल रेडकर

हो, तो आलाच पाहिजे. म्हणजे कोणापासून सावध राहायचे हे देखील सगळ्यांना कळेल. गेला बाजार डॉक्युमेंटरी तरी.

चला, चांगल्या सिनेमाचं, संयमित आणि चांगलं परीक्षण करणाऱ्या, चांगल्या धाग्याचं, काश्मीर केरळ होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणायचं!

In reply to by कॉमी

कॉमीराव, तसं नाही हो पण चर्चा - हा सिनेमा बघण्यालायक आहे की नाही, सिनेमातल्या कोणत्या बाबी चांगल्या वाईट, दिग्दर्शन अभिनय कथानक संगीत या बाजू... अशी न होता वेगळाच अंगाने जात आहे म्हणून धाग्याचे काश्मीर केरळ असं म्हटलं.

In reply to by वामन देशमुख

बरोबर. शेवटी मोदी-शहांना आणलंच आणि चित्रपट लांबच राहिला. पुन्हा एकदा यशस्वीपणे धाग्याचा मूळ विषय कचऱ्यात फेकून अत्यंत चतुराईने धागा मोदी-शहांकडे वळविल्याबद्दल नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना त्रिवार मुजरा!

In reply to by श्रीगुरुजी

इथे आकडेवारीवर तावातावाने प्रतिसाद द्यायला वेळ आहे, मूळ फूस लावून आणि धाक वापरून हिंदूंचे धर्मातर होते हे मात्र या उदारमतवादी लोकांना दिसत नाही किंवा त्यावर बोलायला वेळ नाही... दुर्दैव काँग्रेस काळात सेन्सर सरकार विरुद्ध काही टीका करणारे केलं तर जी बंदी आणत होते ते दिवस ज्यांनी सहन केलेत त्यांनी आता हे हि दिवस गपगुमान सहन करावे कुरतडत कुरतडत हे दोन अब्राहमीक धर्म हिंदूंचे दमन करणार ... आणि आपण असेच मारामाऱ्या करीत राहणार इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा