मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

vidamban

होऊंदे खर्च

सुरवंट ·
तांब्याधिपतींना अर्पण.. *|| फक्त तू खचू नकोस ||* रडू नकोस चिडू नकोस टमरेल घेऊन फिरु नकोस गुर्जीनं सांगितलंय म्हणून... बाकी खर्च करु नकोस संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, बिंधास दरवाजा खटकव फक्त तू खचु नकोस... रोज नव्याने लागते (रांग) रोज नव्या तेजाने रांगेतच ऊभा राहा रोज नव्या जोमाने येणे जाणे रितच इथली, हे तू विसरु नकोस ... बिंधास दरवाजा खटकव फक्त तू खचु नकोस... तुझ्या टमरेलकडे वळणारे कितीतरी हात आहेत अरे तेही तुझ्यासारखेच पाणी त्यांना देऊ नकोस उठ आणि डोळे उघड उगाच कुढत तू बसु नकोस सामर्थ्य आहे हातात जर, विजय तुझाच असेल (फक्त मागे वळून बघु नकोस )

मोबाईलच्या देवा तुला.....

विप्लव ·
मोबाईलच्या देवा तुला टचिंग टचिंग होऊ दे नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे जरि लेनं गरिबीचं घेऊ हाती स्मार्टफोनचं असल जरि चायना तरि दिसायला अॅपल किंवा, अँड्रॉयडवानी असु दे मोबाईलच्या बॅटरिची कांडी होई वरखाली स्विचऑफ आता होईल देवा चार्जर मातुर बारिक पिनचा, युनिवर्सल होऊ दे चॅट थोडे कॉल थोडे करतो आम्ही कधीमधी मॅसेज येती मॅसेजवरी वाचायला, पचायला अंगी बळ येऊ दे नेटवर्कची माया तुझी, आम्हावरी राहु दे ------अकस्मात हल्ला विप्लव

(या क्वार्टरवेळी)

चतुरंग ·
मिपावरती कातरवेळा अवतरल्या, प्रतिसादातून कोणीकोणी क्वाटरवेळाचाही उल्लेख केला, मग काय ईर्शाद... साक्षात गदिमांच्या कातरवेळी ला आम्हाला असं 'कातरावं' लागलं!

गेले मोदी कुणीकडे

anilchembur ·
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

<<<माजबुरी है>>>

नाखु ·
लै लै गांजलेल्या मिपाकर वाच्कांनी ह्यो कागुद आमचे टाळक्यात हाणला(आतल्या दगडासकट) (डोक्याव शिरस्त्राण असलेने वाचलो) का? का?

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

माम्लेदारचा पन्खा ·
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

पट पट पट मोजीत नोटा

मूखदूर्बळ ·
पट पट पट पट मोजित नोटा चाले राजा नेता ओठावरती जीन मिसळूनी घेतो रुपेरी सोडा उंची फेरारी स्वतःस छान जनास करी ईंधन दरवाढ भाववाढ ती सामान्यांस अन स्वत: फिरवीतो स्कोडा नेता राजा फार हुषार सत्तेवर तो होता स्वार नुसता त्याला पुरे हवाला स्वीस अकौन्ट काढा सात सदनिका भूखंड सात बळकावितो हा एक दमात आला आला राजा नेता सोडा रस्ता सोडा मूळ कविता: टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा उंच भरारी दोन्ही कान ऐटीत वळवी मान कमान मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा घोडा माझा फार हुशार पाठीवर मी होता स्वार नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढ़ा सात अरण्ये समुद्र सात ओ

आमचे आगोबा [मिपाक्विता]

टवाळ कार्टा ·
कच्चा माल दोन मिंटात पाताळेश्वर गाठी तीन ढेंगात आम्चे आगोबा.. सुकांताचे ताट आमरसही दाट न चुकता प्रत्येक कट्टा.. तैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत ज्ञानाचा तर नित्य धबधबा.. लेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो दर्पणसुंदरीचा सहवास सदानकदा गुरजींकडे जाती घेऊन हाती दहा किलोचा पावभाजीसाठी डबा.. सुकांती आहार सतत (लेणी)विहार आरोग्याचा मंत्र आगोबा.. निरागसतेचा पुतळा जणू हा बुवांना पिडणे हाच मनसुबा .. ......... सालसकुमार दातपाडे

(कूणास ठाऊक ?)

टवाळ कार्टा ·
पेर्ना कूणास ठाऊक ? काय घेण्यासाठी काय वेचण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय चापण्यासाठी काय गिळण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय टापण्यासाठी काय हुंगण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही कूणास ठाऊक ? काय करण्यासाठी का नूसतेच खर्चण्यासाठी या मॉलमध्ये आलोय आम्ही पाकिटशोध (दिव्यसंग्रह)

अशी कबुतरे येती...

अत्रुप्त आत्मा ·
सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे!