कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
लेखनविषय:
काव्यरस
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
डवरला होता पारिजात,गंध भिने तनूत
शरद चांदणे जणू ,निथळत होते देहात
मोहरला गौर देह,कळ सुखाची आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
अंगास भिडले अंग,ना दुजाभाव राहिला
कमळात जसा भ्रमर,तसा गात्रात प्रवेशला
वादळी आवेग त्याचा,तनू सुखाने भिजली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
अधरावर दंतव्रण ,वक्षावर नखक्षते कोरली
तनुत स्वर्ग सुखाची लाटे वर लाट आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
वाचने
5158
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
अग आईगं ,, प्रसूती कळा यायला
शृंगार असल्यामुळे टेक्निकली
In reply to शृंगार असल्यामुळे टेक्निकली by माहितगार
आरारा, माहितगारसायेब, त्या
In reply to आरारा, माहितगारसायेब, त्या by गब्रिएल
धनी आणि धन्य धन्य होण्यासाठी शुभेच्छा.
In reply to धनी आणि धन्य धन्य होण्यासाठी शुभेच्छा. by माहितगार
* वाचनात आल्याने
In reply to * वाचनात आल्याने by माहितगार
या ताठर प्रतिसादाचा एखादा
झब्रा!!!
शैली ची मिक्सींग शब्दांची मिक्सींग एकसंघ अनुभव देत नाही