मधुघट कुणा मिळे भरलेला
शोधते जळकुंभ कुणी ।।धृ ।।
बळ कैसे
येईल अंगा
जळही दुर्मिळ भासतसे
अमृताची जरी हाव नसे
ऐकेना व्याकूळ आर्जवाला ।।१।।
लोळे कुणी
मखमालीवरी
वणवण, हाय! कुणा ललाटी
भलीबुरी, ही जगरहाटी!
कमवेना कुणी त्या गोडीला? ।।२।।
भला जाणता
दीन नेणता
कष्ट करी अमाप जरी
जैसे तैसे रहावे धरी
साखरपाणी तो प्यालेला ।।३।।
- संदीप चांदणे
काव्यरस
वाचने
2089
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
जब्बरदस्त, सुपर की रे
गीत आवडले. याला चाल लावून
मस्त...