आत्ममग्न

लेखनविषय:
काव्यरस
प्रियकरामागून जातेस नीऑन रंगांच्या दरवाज्यातून बेदरकारपणे - होतेस स्वार - गार वार्‍यावर, मागे उडणारी रंगीत वस्त्रे सावरण्याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? * एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर निर्विकारपणे - शहारतेस - गार वार्‍याने, पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग दिसू नये याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? *

आठवणी ... !!

लेखनविषय:
काव्यरस
आठवणी असतात मनात दडलेल्या येतात अचानक नकळत मनाच्या काठावर अलगद पावलांनी नि येतात समोर अनाहुतपणे..... आठवणी कधीकधी भासाच्या कधीकधी त्रासाच्या मनात रुजलेल्या पिंपळाच्या झाडासारख्या खोल पसरलेल्या घट्ट खोल मुळांच्या काही आठवणी नाजूक प्रेमाच्या अलगद मोरपिसी आठवणीच्या अल्लड पाउस नि तिच्या सोबत चिंब चिंब भीजल्याच्या गरमागरम चहाच्या आठवणी नाही होत कधी शिळ्या नाही उडत त्याचा रंग त्या असतात रंगीत आंबट चिंबट मस्त चवीच्या …! आपले जुने मातिचे घर आठवणीतून अलगद येते वर ती श्रावणातील सकाळ परीक्षेचा पेपर....

दु:ख

लेखनविषय:
काव्यरस
दु:ख माझे देखणे , द्रिष्ट त्या लावू नका एकटा आहे सुखी मी, सोबती होवू नका.. चांदण्यांचा हा पसारा ,चन्द्र तरीही एकटा शल्य घेवूनी फिरे तो, तेजावरी जावू नका.. पापण्यांच्या आड पाणी, सागराला लाजवी हासरा चेहरा बघूनी, गोडवे गावू नका... साद मिटते अन्तरी, शब्द सारे पोरके वेदनेची आग उरली, ती तरी मागू नका.. घाव आहे जीवघेणा , तरी ही जिव्हारी राखतो बेगडी या सान्त्वनाची ,आस मज दावू नका... वाळवंटासारखा -निष्पर्ण मी, निष्प्राण मी मॄगजळाची ओढ माझ्या , अंतरी उजळू नका...

विचित्र मन......

लेखनविषय:
काव्यरस
मन हे असे का विचित्र विचारात गुन्तते, दिवसा ढ्वळा पड्ल्या शुन्य स्वप्नात रमते, ए़़कान्त एकान्त शोधत नुसते स्वतातच रमते, रस्तातल्या गर्दित सुध्दा स्वतालाच शोधते, मन मन करतो पण बरे कुठे हे असते, शरिरातला कुठ्ला कोपरा धरुन हे बसते, काहितरि नुसते नविन सविन शोधत फिरते, जे नाहि अस्तित्वात चुकुन त्यालाच का शोधते, समजावले कितिदा आरे....

स्त्री सूक्त

लेखनविषय:
काव्यरस
राणीच्या राज्यात ब्रिटिशांसारखी आमच्याकडेही एक गोष्ट अगदी सेम असते प्रत्येक घरात एक राणी असते आणि कुटूंबाचे तिच्यावर प्रेम असते *** फुलांसाठी अहंकारांचे भेदक बाण सुटण्यापूर्वीच खुडून टाका नाजूक, सुंदर फुलांसाठी धनुष्य फेकून खाली वाका *** सक्षमीकरण शब्द अवघड वाटला तरी सक्षमीकरणाचा सोपा आहे अर्थ पुरुषातील कोमल स्त्री जागवा आणि स्त्रीमधला पुरुषार्थ ***

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

लेखनविषय:
काव्यरस
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११

((मालवून टाक दीप))

लेखनविषय:
काव्यरस
संपवून टाक पेग स्वर्गीय सुरेश भट यांची माफी मागून समस्त मद्यपी मित्र-मैत्रिणीना सप्रेम अर्पण "मालवून टाक दीप" ..

(कसं काय टार्‍या बरं हाय का?)

लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा - ओळखा की वाईच... कसं काय टार्‍या बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, बाईकवाले तुम्ही न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, बॉडीवाले तुम्ही सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही सायटीवर गेला, कामेंट इडंबन करुन आला खरं काय हो पाटील ? कुनाची खेचली, कळलं का न्हाई, आज तरि परतिसाद देनार का ? काल म्हनं तुम्ही रागावुन गेला, खरडीचा दरवाजा बंदच केला आरंरं केली साठमारी, चावडीच्या दारी, आज काय करायचं ऱ्हायलंय का ? काल म्हनं तुम्ही जाब इचारला, अन्‌ फुकाट शो देऊन बसला आगं बया बया काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, पालिशीप्रमाने समदं चाललंय का

समर्थ रामदासांनी वन-बागा निर्मितीसाठी केलेले काव्य...

लेखनविषय:
काव्यरस
मित्र हो, खालील फोटो पहाण्यात आला. त्यातील संत रामदासांनी परळीच्या मठस्थापने करता बागा व वने निर्माण करण्यासाठी विविध २६० ( प्रत्येक ओवीत सरसकट १० नावे असे धरले तर २६ ओव्यात) झाडांची माहिती देऊन केलेले मार्गदर्शन रंजक वाटले. मिसळपावच्या खाऊभाऊंना हा काव्य-फलाहार आवडेल. त्यातील सध्या ज्ञात नसलेल्या वनस्पतींची माहिती काही मिपाकर देतील तर काहींना त्यातील दुर्मिळ वनस्पतींचे फोटो सादर करायला प्रेरणा मिळेल असे वाटून डॉ.

वेध

लेखनविषय:
काव्यरस
काय मग यंदा लाडु आहेत का जे ते विचरु लागले आई ला म्हंट्ले सगळ्यांनाच कसे एकदम वेड लागले आता कुठे अभ्यास संपला डोके हलके झाले इतक्यातच सगळ्यांना लाडुचे वेध लागले आई फक्त हसली उत्तर नाहि काही मिळाले एके दिवशी फोन आला मुलीला बघायला येतो बाबांचे तयार होण्याचे फर्मान आले आणि डोकेच फिरले तीथे कांदे पोहे तयार झाले इथे साडीत मि अवघडले रागा रगात चहा पोहे घेउन बाहेर गेले नजरानजर होताच जणु विरघळुनच गेले ते काहितरि विचारत होते पण माझे शब्द फुटत नव्ह्ते बैठक संपली पाहुणे गेले पण मी काहि बोलले नाहि म्हणुन बाबा मात्र रागवले मात्र होकार नजरेतुनच समजले होते तरी मन हुरहुरत होते दुसर्‍याच दिवशि फोन आला आणि ह
Subscribe to शांतरस