मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

((मालवून टाक दीप))

बट्ट्याबोळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
संपवून टाक पेग स्वर्गीय सुरेश भट यांची माफी मागून समस्त मद्यपी मित्र-मैत्रिणीना सप्रेम अर्पण "मालवून टाक दीप" .. चा विडंबन .. संपवून टाक पेग, धडकावून ग्लास संग दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग त्या तिथे चौफुल्यात, रंगते आजून रात हाय तू करू नकोस, एवढ्यात रस-भंग दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग संपवून टाक पेग ... गार गार या हवेत, चकली-नी-शेव सवेत रिचवून टाक सर्व, एकवार सोनं-रंग दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग संपवून टाक पेग ... काय हा तुझा आवाज, घेतलेत दोन लार्ज बोल रे हळू वाटेल, संपलेत पूर्ण खांब दोसता किती दिसात, बांधला निवांत चंग संपवून टाक पेग ... सचित्र अनुभवासाठी ...

वाचने 1324 वाचनखूण प्रतिक्रिया 3

५० फक्त 07/03/2011 - 11:58
बट्ट्याबोळ, नावाप्रमाणेच एका खुप चांगल्या गाण्याचा व्यवस्थित बट्याबोळ केला आहे. विडंबन करु नये असं नाही, गाणं पण छान आहे विडंबनासाठी आणि प्रसंग पण बरा, पण एक सांगु का क ला क आणि ट ला ट लावुन विडंबन होत नाही. ते भाईकाकांचे रावसाहेब मधला एक संदर्भ देतो, बघा पटतंय का ते. ' बदल की रे चाल्, कॉण नाही म्हणतंय का रे, पण कोण तर गुरु गिरु कर की रे, ते दिनानाथ मंगेशकर बदललं नाही कारे चाल, पण त्याचं ते अधिकार होतं की रे,..... - इति रावसाहेब. रागावलात तरी हरकत नाही पण विडंबन असलं तरी ते किमान मुळ गाण्याच्या मिटर मध्ये बसलं पाहिजे, मु़ळ गाण्याच्या चालीत म्हणता यावं ही अपेक्षा. शुद्धलेखन पाळु नका, हरकत नाही पण ते ' दोसता' डोक्यात जातंय. आणि काय आहे कळत्या नकळत्या वयात प्रत्यक्ष मा. सुरेश भटांच्या पायावर डोकं टेकवलं आहे, त्यामुळं हा प्रतिसाद.