मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
गण: देव गौरीनंदन आधी वंदुया (चाल पारंपरीक)
देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी तुज पुजीतो कलावंत आम्ही मंगल कार्याआधी गणाला गावूया शुभ कार्याची सुरूवात करूया ||२|| देव गौरीनंदन आधी वंदुया शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/०३/२०११

वाचने 1238 वाचनखूण प्रतिक्रिया 3

प्रकाश१११ 09/03/2011 - 20:23
पाशानभेदा -खूप छान - रसीक जमले आम्हांसमोरी तुझेच रूप जणू शेंदरी उशीर नका लावू देवा झडकरी या या शुभ कार्याची सुरूवात करूया ||१|| वा..वा !!

In reply to by प्राजु

पाषाणभेद 10/03/2011 - 09:43
मी अन गावून दाखवू? काय चेष्टा करताय काय माझी. मी गाण्याचा आव आणू शकतो फक्त. तूनळीवर मागे दोन तीन लावण्या गायल्या होत्या मी. आपल्या येथील 'निल्या' नावाचे जे भाऊ आहेत ते चांगले गातात. त्यांनी माझे एक नाट्यगीत अगदी छान गायले होते. तूनळीवरही आहे. त्यांचा आवाज मस्त आहे अन विशेष म्हणजे ते संगीतही स्वत: देतात. (आजकाल ते दिसत नाही पण :-( ) दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अवांतर: बरीच जुनी मंडळीही दिसत नाही येथे आजकाल. कामाचा व्याप की अजून काही कारणे?