Skip to main content

शांतरस

अन्तर्यात्रा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 04/02/2011 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
ओवीबद्ध अनुवाद: हृदयकुहरीच्या| गाभार्यात साच| ब्रह्म एकलेच| प्रकाशते|| आत्मस्फुरणेने | सनातन सत्य| 'मी' 'मी' असे नित्य| प्रत्यया ये|| कोहम शोध घेता| मन हो विलीन| ईशपदी लीन| हृदयांतरी|| रोधुनिया प्राण| होई आत्मनिष्ठ| बाकी इष्टानिष्ट| नसे काही|| मूळ श्लोक: हृदयकुहरमध्ये केवलं ब्रह्ममात्रं ह्यहमहमिती साक्षादात्मरूपेण भाती हृदिविशमनसा स्वम चिन्वता मज्जता वा पवनचलनरोधात आत्मनिष्ठो भवत्वं - भगवान रमण महर्षी
काव्यरस

कसा घट्ट आपलेपणा ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 29/01/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
कसा घट्ट आपलेपणा निर्माण होत असतो ह्या शब्दातून ह्या पत्रातून काही घेणेदेणे नसते काही मागणे नसते निव्वळ आनंद वाहत असतो झुळझुळ शब्दाशब्दातून कसे तारुण्य असते निळ्या निळ्या आभाळासारखे मन पाखरू नि मस्त उडत असते गोजिरवाणे पंख उभारून मी कोण कुठला काय करतोय ..? खूप उत्सुकता असते ना..? जाणून घेण्याची आंबा कापला तर मस्त वाटते तोंडाला चळकण पाणी सुटते पण कोंबडी..? मी तर दूर उभां राहून आभाळ बघत बसतो पण मी नाही विचारणार तुम्ही कोठल्या ... काय करता..,,?
काव्यरस

ते गाणे ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी शुक्रवार, 21/01/2011 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ते गाणे तिन्हीसांजेला मन माझे फुलवून गेले दूर मला माझ्या गावी मज अलगद घेऊन गेले त्या नदी किनारी झाडांची हिरवी गर्दी वळणारी पाउलवाट किती वाटत होती आपुली ती हवा मस्त होती होती गाभुळलेली मज आठवूनी गेले ती तिन्हीसांजेची गाणी तिन्हीसांजेच्या डोंगर रांगा तो नाद अनामिक येई घंटीचा किणकिणनारा....!!
काव्यरस

रजनीकांत

लेखक महेश काळे यांनी बुधवार, 19/01/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
१. संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल. २. एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात. ३. अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’ ४. एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल? ५. रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला. ६. एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं..
काव्यरस

आपले शब्द छान मित्र झाले आहेत ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 19/01/2011 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुमचे नाव ऐकून आहे तुम्हीपण मला नुकत्या नुकत्या नावाने ओळखू लागला आहात आपले शब्द मात्र एकमेकाचे छान मित्र झाले आहेत कोण हो तुम्ही.? कोण हो मी ..? हा आपण प्रश्न नाही विचारायचा कधीसुद्धा ..!! कारण आपले शब्द छान मित्र झाले आहेत आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या मुठभर उधळलेल्या .... आपापल्या परीनं चमकत राहतील चांगले मित्र होऊन मस्ती करतील करुद्या...! खेळूद्या ...!! आपण त्यांची मैत्री बघू कधीतरी मनात येते माझ्या: शब्दाचा मित्र जो आहे , जी आहे किती छान आहेत ....! मित्र जर ईतका छान तर त्याचे आई बाबा किती असतील .छान ...?
काव्यरस

आवर्तन.....

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 18/01/2011 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नमस्कार. राधेची व्यक्तीरेखा मला नेहमीच भुरळ घालत आलेली आहे. जरी काव्य समजल तरी या व्यक्तीरेखेला त्या काव्यातही कुठेच पुर्णत्व वा 'न्याय' म्हणता येइल तो नाही मिळालेला अस मला मनापासुन वाटत. इतक जीव ओवाळुन टाकुन , सर्वस्वाला विसरुन केलेल्या प्रेमाला, पुढे कृष्णाच्या वाढत्या सामाजिक,राजकिय महत्वात अगदी नामोनिशाणी न राखता अनुल्लेखात विलीन व्हाव लागण हे एक दुर्दैवच नाही का? नुकताच प्राजुचा 'वनराणी....' वाचला. या शबरीच्या भोळ्या भक्तीवर भाळुन तिला पुढील जन्मी पुन्हा भेटण्याच आश्वासन श्रीरामानी दिले, तीच ही राधा! या वचनावर आधारित ही कविता.
काव्यरस

काव्यक्षण (कविता संग्रह)

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 16/01/2011 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत मिसळपाव वर प्रकाशीत झालेल्या सर्व कविता एकत्रीत स्वरूपात येथे देत आहे. - निमिष न.

' नववर्षी-संकल्प ' जाणता ...

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 14/01/2011 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
तिळगुळ देता-घेता नेते गोड-गोड बोलणार , सर्वच पक्षांचे नेते ना तोडफोड करणार शहरामधले मंत्री आता खेडयातच राहणार वाढदिवस ना आता कुणाचे फलकावर दिसणार - देशामध्ये ना कसलाही घोटाळा करणार शासन भ्रष्टाचार-प्रदूषणमुक्त अम्हा दिसणार - आमदार नि खासदार ते भत्ते ना घेणार ! सूत्रसंचालिका अंगभर कपडयातुन दिसणार 'अभिनयाच्या अंगा'स्तव 'तो' 'स्त्री-वेषी' न होणार 'जज्ज ' मराठी 'चॅनल'चे मराठीत बोलणार निकाल 'एसेमेस' विना ते स्पर्धेचे ठरणार 'नववर्षी-संकल्प'जाणता करमणूक होणार !!
काव्यरस

नाती

लेखक अभिसरिका यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
नाती नाती नाती नाती........... जुळ्लेली, जोडलेली, लादलेली...... खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ? वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....! नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही, दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...! नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला..... मग वह
काव्यरस

चल बाळा आपण पतंग घेवू

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 12/01/2011 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
चल बाळा आपण पतंग घेवू
चल बाळा आपण पतंग घेवू बघ कितीतरी पतंग आहेत येथे कितीतरी आकाराचे पांढरे, निळे, पिवळे, हिरवे काही दुरंगी आहेत तर काही तिरंगी पट्याचे बरेचसे कागदी अन काही प्लास्टीकचे काही पतंगांवर सचिन तेंडूलकर आहे तर काहींवर दबंग सलमान काहींवर हिरॉयनी आहेत तू कोणताही पतंग निवड बाळा घोबी घे, कन्नी घे, डायमंड घे अन मांजाही घे, बरेली आहे, साधा आहे, नायलॉनही आहे. चल लवकर आटप.
काव्यरस