मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकरूप

रातराणी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी घाटमाथ्यावर पांघरला, शीतल चांदवा चंद्राचा काळ्याशार डोहाशी, एकरूप रंग कातळाचा गाभाऱ्यातून येती बाहेर, दोन सावल्या थकून शांत नीरव तो काळोख, घेती श्वासात भरून

वाचने 4385 वाचनखूण प्रतिक्रिया 22

चांदणे संदीप 14/04/2016 - 12:01
घाटमाथ्यावरला एक दिवस...

प्रचेतस 14/04/2016 - 12:07
वाह...! घाटमाथ्यावर उभं राहून पाताळेवेरी गेलेली दरी निरखण्याचा आनंद आगळाच. उन्हाळ्यात अगदी राकट धाकट पुरुषी दिसणारा घाटमाथा पावसकाळात मात्र नव्या नवरीसारखा हिरवाकंच शालू नेसून येतो.

विजय पुरोहित 16/04/2016 - 06:30
खूप खूप खूप खूप सुंदर काव्य...

ज्ञानोबाचे पैजार 16/04/2016 - 16:48
सुरेख अतिशय सुरेख. डोळ्यासमोर घाटमाथ्याचे चित्र उभे राहिले आवडली कविता. पैजारबुवा,

सस्नेह 17/04/2016 - 14:28
पोचले मी घाटमाथ्यावर ! ते पायरीचा गंध फारच आवडले. अतिशय आवडली अलवार कविता.

टवाळ कार्टा 17/04/2016 - 14:37
खत्रा तांबीय काव्यासाठी कच्चा माल ठासून भरलेला आहे =))