Skip to main content

मुक्त कविता

प्रेम..

लेखक मन्या ऽ यांनी सोमवार, 01/06/2020 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम.. प्रेम म्हणजे अथांग सागर प्रेम म्हणजे वाळवंटातील मृगजळ ज्याने तहानलेल्याची तहान काहीकेल्या भागत नाही प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे आपुलकी जो वेळप्रसंगी माणुसकीला जागलेच असे नाही प्रेम म्हणजे अटी प्रेम म्हणजे बंधन जे माणसाला एक माणुस म्हणुन वागवत नाहीत मुक्तपणे जगु देत नाही तरीही हे प्रेम वाटे मजला हवेहवेसे ते प्रेम जे एकमेकांच्या अबोल गोड शब्दांचे एकमेंकाच्या साथीचे समोरच्याच्या मंद गुढ हास्यातले ते प्रेम जे आयुष्यात देवघरातल्या नंदादिपाप्रमाणे अखंड तेवणारे स्वतः जळून काळोख मिटवणारे -दिप्ती भगत (२०जून,२०१९)
काव्यरस

"सद्गुरू"वाचोनी सापडली सोय

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 30/05/2020 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असे जरि कुणी म्हणती काळ-काम-वेगाच्या गणिते तेव्हा छळिले किती ! मात्र अता "सद्गुरू" म्हणती की "काळ असे हो भास" ऐकुनी अमृतवाणी, सोडिला सुटकेचा निश्वास झंझट "काळा"चे गेले की "काम-वेग" मग उरे गणित गहन त्याचे सोडविण्या अहोरात्र मी झुरे काम-वेग गणिताची चर्चा कशी सदगुरूपाशी? (अध्यात्माच्या शिखरावर ते! का भ्रष्टावे त्यांसी?) अध्यात्मातील पेच नवा हा रोज अम्हाला छळतो रजनीशांचे ग्रंथ उशाशी घेऊनी सध्या निजतो!

आणि अश्या वेळी

लेखक कौस्तुभ भोसले यांनी मंगळवार, 26/05/2020 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
आणि अश्या वेळी, चंद्राने लपायला हवं ढगांआड... अन लपेटून घ्यायला हवं आपण, भोवतालचं गुलाबी धुकं... एकमेकांच्या श्वासांमधून उधळायला हवीत, प्रितीची गंधफुले... घट्ट मिटायला हवीत, डोळ्यांची नक्षत्रं... टेकवायला हवेत गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे, ओठ एकमेकांवर... आणि मग पहावं, श्वास रोखले जातात की; हृदय धडधडायचं थांबतं..? -कौस्तुभ

पाऊसवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 22/05/2020 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
अस्थीर घरांच्या ओळी नदीच्या हिरव्या काठी. कुणी धरून बसते ओंजळ पाऊस पडण्यासाठी. पाऊस प्राचीन इथला आकांत केवढा करतो. नदीच्या पैलतीरावर काळ जसा गहीवरतो. काळ उभारून गेला घरांच्या उदिग्न भिंती. अशात पाऊसवेळा आधार कुणाचा स्मरती? -कौस्तुभ

मागे वळुन पाहताना..

लेखक मन्या ऽ यांनी बुधवार, 20/05/2020 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
मागे वळून पाहताना.. मागे वळुन पाहताना एक निरागस चेहरा दिसतो मज मनसोक्त खळखळुन हसताना मागे वळुन पाहताना तोच चेहरा दिसतो मज भेदरलेल्या डोळ्यांनी आसपास पाहताना मागे वळुन पाहताना लोकांचे चेहेरे न्याहाळताना तो चेहरा दिसे मज ओंगळवाण्या नजरा सहन करताना मागे वळुन पाहताना ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे पाहिले मी मुखवटे एकावर एक चढवताना मागे वळुन पाहताना स्वतःला आरशात बघताना पाहिले आहे मी स्वतःचीच किळस करताना मागे वळुन पाहताना ते स्पर्श सहन करताना पाहिले आहे मी स्वतःलाच तीळ तीळ तुटताना मागे वळुन पाहताना रोज रोज मरताना पाहिले आहे मी स्वतःलाच नैराश्याच्या खाईत झोकताना मागे वळुन पाहताना आज

प्राक्तनवेळा

लेखक कौस्तुभ भोसले यांनी बुधवार, 20/05/2020 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
क्षितिजाच्या पुसती रेषा अंधार जसा दरवळतो. काळीज कुणाचे रडते चंद्र कुणाचा विव्हळतो. काळाकडे घ्याव्या मागून त्या हळव्या प्राक्तनवेळा. विस्मृतीस कराव्या अर्पण सुगंधी दुःखांच्या माळा. रंगीत करावे डोळे श्वासांना यावी भरती. उगवून पुन्हा जन्मावे पाऊस पडल्यावरती. -कौस्तुभ

ती अन् पाऊस..

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 19/05/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
ती अन् पाऊस.. खूप दिवस झाले आता पावसात चिंब चिंब भिजून भरलेलं सावळ ते आभाळ नजरेत सामावणारी ती भिजावं का थोडतरी? ह्या येत्या पावसात चिंब चिंब घेऊ न्हाऊन असा विचार करणारी ती गेले कित्येक दिवस दिवस? छे!
काव्यरस
Taxonomy upgrade extras

गणितं..

लेखक मन्या ऽ यांनी शनिवार, 16/05/2020 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
गणितं.. आयुष्याच्या पाटीवरची गणितं माझी चुकली चुका लपवण्यासाठी मी ती पटापट पुसली मनाचा शिक्षक आहे थोर कडक शिस्तीचा पुसलेली गणितं परत परत विचारली उत्तर देता येईनात झाली पळता भुई थोडी माझे मनच होऊनी मैत्र आता माझी शिकवणी घेई शिकवणी झाली चांगली मास्तरांनी सांगितला एक जालिम उपाय जुनी शिदोरी पाठीला नवे अनुभव बांध गाठीला निर्धास्त होऊन जग मी आहेच तुझ्या सोबतीला उपाय कामी आला अन् आनंदीआनंद झाला नवे लोक नवी आव्हानं असतील रोज रोज कशाला दडायचे आता थेट भिडायचे मनसोक्त जगायचे पण ह्यावेळी गणितं सोडवताना भान मात्र ठेवायचे! -दिप्ती भगत (६ डिसेंबर, २०१९)
काव्यरस
Taxonomy upgrade extras

डाग

लेखक कौस्तुभ भोसले यांनी शुक्रवार, 15/05/2020 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्या रात्री त्याला चंद्रावरचा डाग स्पष्ट दिसला. आणि मग त्यानं घट्ट मिटून घेतली खिडक्यांची दार... सताड उघडी ठेवली भयाण काळोखात नयनांची कवाडं... त्या स्मशान शांततेत निर्दयीपणे ओढल्या त्याने रक्ताळलेल्या रेघा आपल्याच हातावर आणि मग पुन्हा पहाटच झाली नाही... -कौस्तुभ