वार्याने पेटते रान आता हे ..
लेखनविषय:
काव्यरस
घामाच्या चिंब भरलेल्या सदर्याला
ठिगळे अनेक रंगबेरंगी..
पोटाच्या खळगीसाठी उगाच चालली
बेसुमार झीज पायाची ..
वार्याने पेटते रान आता हे
कशास विचार फुका..
होरपळले शेत जरी हे
ढेकळाचा रंग काळा तो काळाच..
ठिंणगी बनलेला विचार तुझा
तू दूर आकाशातील तारा ..
ओसाड ह्या जगण्यावरती
उगा बुजगावण्यांचा पहारा..
दगडाला कुठे फुटतो पाझर ?
कुठे शोधु देवपण त्याच्यात ?
जन्मलो मातीत या
पुन्हा मातीत मिटण्यासाठी...
-- शब्दमेघ
(शीघ्रकाव्य, २१-०२-२०२१)
वाचने
4177
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
खूप दिवसांनी लिहिलंस, एकदम
खूपच छान
छान आहे कविता. आवडली,
In reply to छान आहे कविता. आवडली, by सतिश गावडे
+१
छान
In reply to छान by गोंधळी
कविता शेती वर नाहीये...
In reply to कविता शेती वर नाहीये... by गणेशा
.
आवडली का नाही आवडली ते समजत नाहिये
In reply to आवडली का नाही आवडली ते समजत नाहिये by ज्ञानोबाचे पैजार
यमक आणि लय यांचा कुठे हि वापर
In reply to यमक आणि लय यांचा कुठे हि वापर by गणेशा
अरे नाही रे..