...पाहिले म्यां डोळा
लेखनविषय:
काव्यरस
पालथ्या मुठीत घुसवलेली iv ची सुई
जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी.
अँटिव्हायरलच्या ठिबकसिंचनाचा
गिनीपिगी जीवरोपट्यावर विफल अभिषेक.
बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित.
धपापते विद्रोही तप्तश्वास.
PPE आच्छादितांच्या नि:शब्द कवायतींनी कोंदलेले भवताल.
स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्या जाणिवानेणिवांची कण्हणारी कडवट कडवी.
संपतील एकदाची आत्ताच
की,
ध्रुपदत राहतील
व्हेंटिलेटरच्या जागत्या पहार्यात
आज
उद्या
परवा?
वाचने
3431
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
......
माऊली, तो झाला सोहळा
In reply to माऊली, तो झाला सोहळा by अनन्त्_यात्री
अरे वा.. सही सलामत परतल्या बद्दल अभिनंदन
@ अनन्त्_यात्री : अनुभवातून उतरल्यानं