मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हाक आभाळाची येता

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते जुन्या व्रणावर रोज नवी जखम करते अनावर भोवंडून शिणलेल्या प्राणासाठी वाटेवरच्या झाडाची साथ वाटे मला मोठी त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर इवल्याश्या कंठातून काढी तरल लकेरी हाक आभाळाची येता झेपावते दिगंतरी

वाचने 3079 वाचनखूण प्रतिक्रिया 7

Bhakti Mon, 02/01/2021 - 20:51
त्याचा मायाळू विस्तार घाले हिरवी फुंकर एक रंगीत पाखरू झुले उंच फांदीवर .. मस्त रुटीन शब्दाऐवजी दुसरा मराठी शब्द छान वाटेल..रोजचाच ?

रूटीनाचे गंजलेले यंत्र अखंड घुमते कोणते बरे गंजके यंत्र असेल असे जे अखंड घुमत असते? हे समजले की बाकी कविता समजायला कठीण नाही. आवडली, पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्त्_यात्री Tue, 02/02/2021 - 11:38
नित्यक्रम कितीही कंटाळवाणा अन् यांत्रिक (गंजलेला व यंत्रवत) असला तरी तो अखंड चालू ठेवावाच लागतो यातून येणार्‍या वैफल्याला रूटीनाचे अखंड गंजके यंत्र ...