Skip to main content

मुक्त कविता

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 18/12/2019 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।

उरलो आता भिंतीवरल्या ...  

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 25/11/2019 05:11 या दिवशी प्रकाशित केले.
तुका म्हणाला  उरलो आता  उपकारापुरता ...  मी म्हणालो उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता. नुरली शक्ती विरली काया  शिथिली गात्रे  आटली माया ... उरलो आता  भिंतीवरल्या फोटोपुरता.

क्लायमेट चेंज रियल आहे

लेखक पुणेरी कार्ट यांनी गुरुवार, 26/09/2019 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून व्हॅट्सऍप, फेसबुक आणि ट्विटरवर 'क्लायमेट चेंज इस रियल' च्या चर्चांना उधाण आले आहे.

चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 25/09/2019 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
चिदंबरमच्या भेटी मनमोहन आला तो झाला सोहळा तिहारात जाहली दोघांची तुरुंगात भेट मनातले थेट मना मध्ये मनो म्हणे, " चिद्या, तुझे घोटाळे थोर अवघाची inx खाऊन टाकला चिदू म्हणे, एक ते राहिले तुवा जे पाहिले, पंतप्रधान पदावरी मनो म्हणे बाबा ते त्वा बरे केले त्याने तडे गेले प्रामाणिकतेला मॅडम अट्टल, त्यांची रीत न्यारी माझी पाटी कोरी राज्य करोनिया चिदू म्हणे गड्या केली वृथा पायपीट प्रत्येकाची कोठडी वेगळाली वेगळीच ताटे वेगळीच वाटी जेवायला भेटे पुन्हा डाळ भात ऐक ऐक वाजे घंटा हि तुरुंगी जेलर बाहेर वाट पाहे दोघे निघोनिया गेले दोन दिशा कौतुक माध्यमा आवरेना #सॉरीविंदा

दोरीवरचे कपडे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 04/09/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोरीवरचे कपडे दोरीवर कपडे कसेही वाळत असतात कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात? शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो (यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.) पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे साडी घालून घडी बसते वाळत वा-याने तिचा पदर असतो हालत किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय त्यात बाई घातली अ

पाय सरावले रस्त्याला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 02/09/2019 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
-: पाय सरावले रस्त्याला :- मी चाललो, चाललो इतका की रस्ता ओळखीचा झाला दुसरी वाट धरावी तर पाय सरावले रस्त्याला ||ध्रू|| खाच खळगे नेहमीचे झाले नवे नव्हते वाटले अडथळे तसेच होते पायात काटे खुपसले काट्यांनी तरी जावे कोठे त्यांना कोण सोबती मिळाला? पाय सरावले रस्त्याला ||१|| अडचणी अनंत आल्या उभ्या राहील्या समोर नेट लावून सामोरी गेलो प्रश्न अनेक पुढे कठोर जंजाळ पसरले समोर असता एक पक्षी अचूक उडाला पाय सरावले रस्त्याला ||२|| "कसा आहेस तू ठिक आहेस ना?" "मदत लागली काही तर मी तयार आहे ना!" ना कुणी अशी उभारी दिली काय करायचे त्या ओळखीला? पाय सरावले रस्त्याला ||३|| मीच माझी केली मदत मग हात केला मलाच

शब्द

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 29/08/2019 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण
काव्यरस

स्वरराधा

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 23/08/2019 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
भैरव वा भटियार पहाट फुलवत येती, स्पर्श जणू कान्ह्याचे राधेला उठवुन जाती. ठाऊक तिला सारंग माध्यान्ही झुलवत येतो, "गंध" न त्यास स्वत:चा तरि वृंदावनी घमघमतो. यमन असा कान्ह्याचा यमुनेचे श्यामल पाणी. निनाद गोघंटांचा सांज करी कल्याणी. मालकंस वा जोग, अमृत बरसे गात्री. कान्ह्याच्या ओठी वेणू तिच्याचसाठी रात्री. कणकणात भिनली आहे मल्हाराची आस, मेघ पेटवून जातो मयूरपंखी प्यास. पण सूर भैरवीचा का राधेला माहीत नाही? युगे उलटली, अजुनी राधा तर वाटच पाही..
काव्यरस

चार थेंब

लेखक मायमराठी यांनी सोमवार, 05/08/2019 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
चार थेंबांत संपेल मग पाऊस तो काय, चार शब्दांत मावेल, मग माणसाचं मन ते काय, संपलाही असता तो, जर प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं, मावलेही असते ते, जर प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं, पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ? -अभिजीत
काव्यरस

इंद्रधनू

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 28/07/2019 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रधनू (आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरकली आहे अन ती मला बोलावते आहे.) आकाशी ते इंद्रधनू आले अहा! चला बाबा बघा ते पहा!