मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविकल्पना

Rohini Mansukh · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पंख मिळावे कल्पनांचे आकाश व्हावे कागदांचे भावनेची बनून लेखणी मनपाखरू स्वछंद उडावे शब्द व्हावे जाणिवांचे स्पर्श त्यांना अर्थांचे विचारांची करून मांडणी कवितांनी जन्म घ्यावे ध्यास लागो तालासुरांचे वेड लागो मज बोलांचे त्या बोलांची बनून गाणी रसिकांनी गात रहावे

वाचने 1646 वाचनखूण प्रतिक्रिया 1