मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाय सरावले रस्त्याला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
-: पाय सरावले रस्त्याला :- मी चाललो, चाललो इतका की रस्ता ओळखीचा झाला दुसरी वाट धरावी तर पाय सरावले रस्त्याला ||ध्रू|| खाच खळगे नेहमीचे झाले नवे नव्हते वाटले अडथळे तसेच होते पायात काटे खुपसले काट्यांनी तरी जावे कोठे त्यांना कोण सोबती मिळाला? पाय सरावले रस्त्याला ||१|| अडचणी अनंत आल्या उभ्या राहील्या समोर नेट लावून सामोरी गेलो प्रश्न अनेक पुढे कठोर जंजाळ पसरले समोर असता एक पक्षी अचूक उडाला पाय सरावले रस्त्याला ||२|| "कसा आहेस तू ठिक आहेस ना?" "मदत लागली काही तर मी तयार आहे ना!" ना कुणी अशी उभारी दिली काय करायचे त्या ओळखीला? पाय सरावले रस्त्याला ||३|| मीच माझी केली मदत मग हात केला मलाच पुढे घेतला हातात हात डाव्या हातात उजवा पडे माझाच मी वाटाड्या झालो इतर न कुणी आले सोबतीला पाय सरावले रस्त्याला ||४|| - पाषाणभेद ०१/०९/२०१९

वाचने 3051 वाचनखूण प्रतिक्रिया 4