मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शब्द निरर्थाचे भोई शब्द अर्थभार वाही शब्द धूसर सावली शब्द दाहक बिजली शब्द कोरडा व्यापार शब्द अस्तित्वाचे सार शब्द व्योमापार शिडी शब्द गहनडोही बुडी शब्द अटळ कुंपण शब्दापार मुक्तांगण

वाचने 4096 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मायमराठी Sat, 08/31/2019 - 11:24
शब्द अर्थाचे लाचार, शब्द सर्वस्वाचा स्वाहाकार शब्द स्वतःचाच नव्याने स्वीकार । __/\__