Skip to main content

मुक्त कविता

कोडगं व्हायचं...

लेखक निओ यांनी मंगळवार, 02/07/2019 या दिवशी प्रकाशित केले.
खुशाल कोडगं व्हायचं कशाला मनाला लावून घ्यायचं मनाला लावून घेण्याने परिस्थिती थोडीच बदलणार आहे अवतीभवतीची माणसं थोडीच बदलणार आहेत कशाला पाहिजे हळवं संवेदनशील मन लहान सहान गोष्टींनी चरे पाडून घ्यायला ओरखडे पडायला काय सुख मिळतं संवेदनशील मनाने चार ओळी लिहिता येतात पानभर खरडता येते...

काॅफी पिऊन आले...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 28/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.
काव्यरस

धागा चालेना, धागा पळेना... धागा संथ चाली, काही केल्या पेटेना

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 23/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
कवी " बी " यांना विनम्र अभिवादन धागा चालेना, धागा पळेना धागा संथ चाली, काही केल्या पेटेना गेलो ट्यार्पीच्या बनी म्हंटली ट्रोलांसवे गाणी आम्ही सुरात सूर मिळवून रे गेलो डू-आयडीच्या बनी डूख धरला मी मनी ट्रोलांसवे गळाले आयडीभान रे चल ये रे, ये रे ट्रोल्या टोचू उचकवू घालु काड्या टाकू पिंका पिंक पोरी पिंक पोरी पिंक हे मिपाचे अंगण अम्हां दिले आहे आंदण ट्रोलिंग करू आपण सर्वजण रे आयडी विषयाचे किडे यांची धाव प्रतिसादाकडे आपण करू शुद्ध "पिंक"पान रे धागा पेटला आला बहरून ट्रोलांनी दिला विषय भरकटून कोण मी - ट्रोल? कोठे डू-आयडी जण रे

दे दे दे दे दे दे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोड

शोधत होतो पुन्हा स्वत:ला

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 17/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
शोधत होतो पुन्हा स्वत:ला उपसत होतो पुन्हा पुन्हा मी पुरातनाची प्रचंड पडझड परंपरांची अपार अडगळ शोधत होतो अथक स्वत:ला ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी वर्तमान हतबल करणाऱ्या भवितव्याचे भीषण पडघम ऐकत होतो अधीरपणाने माझीच अनोळखीशी चाहूल कळून चुकला पुन्हा, स्वतःचा शोध विफल ठरण्याचा संभव
काव्यरस

मी तुझा विचार करते

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

जागरण....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 11/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
काल झोपता झोपता, वेळ बाराची आली. आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली. अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग! बागडू लागलं,खेळू लागलं, माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

अज्ञाताच्या काठावर

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 11/06/2019 या दिवशी प्रकाशित केले.
अज्ञाताच्या काठावर शब्द होताना धूसर अर्थ निरर्थाचे द्वैत कल्लोळून झाले शांत अदृष्टाच्या नजरेला दिठी भिडविण्या आलो अज्ञेयाच्या अनुल्लंघ्य उंबर्‍याशी थबकलो अथांगाच्या डोहावर अनाहताचे तरंग नश्वराच्या ओठावर चिरंतनाचे अभंग
काव्यरस

सोनसंध्या

लेखक इरामयी यांनी रविवार, 12/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
नाजूक, हळूवार गुलाब पाकळ्या संथ, शांत, तरंगत येतात जवळ, हलकेच् माझी सुन्दर रेशमी त्वचा नितळ, मऊशार, निरागस दुधासारखी छोटं का असतं सौदर्य? का बोलावं लटीकं फुकाफुकी? सुन्दर क्षण नाहीत निसटत कधीच गळून पडतात त्या आठवणी आणि ध्यास भाबड्या स्वप्नांचे मी बसूनच असते पाय सोडून पाण्यात, माश्यांशी खेळत ओंजळी ओंजळीने त्याच्या बांसुरीचे स्वर का बरं खुणावतात? आणि काय बरं सांगत असतात... हळूवार - ओठाओठी? मग पाणी होत जातं सोनेरी आणि आकाश होतं वही चित्रकलेची पावलं परतत असतात, वाळू उडत असते मी डुंबत असते, स्तब्ध नि:शब्द आनंदी तंद्रीप्रदेशात लांब कुठूनची मंद वार्‍याची झुळूक सुखावते सर्व जाणिवा मी रहाते तशी
काव्यरस

भयकाल

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 11/05/2019 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू एकेक करत हरवत चालले आहे... ज्याच्याकडे पहात पहात आम्ही आमचे मार्ग शोधायचो तो ताराच आकाशातून नाहीसा झाला आहे आणि तो एकुलता एक चंद्रही... ज्याची स्वप्नं बघत बघत आम्ही निश्चिंत झोपी जायचो... नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी खिडकीतून पहात राहतो आणि मनातल्या मनात चरकतो उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर! आज सकाळी डोळे उघडले तर ते समोरचे हिरवेकंच झाड कुठेच दिसत नव्हते ना ही कुठला पक्षी या पृथ्वीवरून हळूहळू एकेक गोष्टी हरवत चालल्याचे दिसत आहे जो मुलगा मोकळ्या मैदानात खेळायचा तो ही आज कुठे दिसत नाहीये, की त्या मुलाबरोबरच ते खुले मैदानही गायब झाले असेल.... गोष्टी नाहीशा होणे ही सरत्या
काव्यरस