Skip to main content

करुण

नकोच ते युद्ध नको

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 02/03/2022 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
नकोच ते युद्ध नको नकोच ते मृत्यू नको सहन न होणार्या वेदना नकोच नको पैशापायी जायी पैसा युद्धापायी भरडते जनता भावनेला घालती गोळी "युद्धच हवे" बोलतो वर नेता रणभुमीवर कुणी मारतो कुणी मरतो बाप, मुलगा, नवरा, भाऊ जातो घर दार कोसळूनी होते सुने नशीबी राही केवळ वाट पहाणे जमावात बातमी युद्धाची ऐकता विरश्री संचारून अंगी हाताच्या मुठी वळतसे परी कुणी एकच घरचा धारातिर्थी पडता युद्ध नको, युद्ध नकोच शब्द वदनी येतसे - पाषाणभेद ०२/०३/२०२२

मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/01/2022 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
मायेचे वस्त्र जिर्ण झाले विरले फाटले अजूनी होते हवे ते परी न आता उरले उबदार किती ते वाटे गारठ्यामधे लेवून अंगी जणू चिलखत ते भासे कितीही संकटे आली जरी घाव वर्मी ते सोसतसे किती निगूतीने वस्त्र निर्माण केले उभे आडवे धागे प्रेमादराने गुंफले शिलाई नाजूक टाके अचूक रंग तयाचे भरदार असले या वस्त्राची मजबूत न तुटणारी विण कुणी न विणकर आता न विणणार भक्कम हाती नक्षीचा ठसा कोरला पुन्हा कधी न उमटे आधार होता किती नाही म्हटले तरी आठव तयाची राहील कायमची उरी न मिळणार कधी मायेचे पांघरूण ते कठोर काळाने हिरावले माझे बाबा देवाघरी गेले - पाषाणभेद ०९/०१/२०२२

चांदणी अन प्रियकर

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 14/10/2021 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी एक चांदणी नवथर खाली आली धरणीवर काय कसले तिला ना ठावे इकडे तिकडे कोठे जावे भूकेलेली रडवेली रडून कोमेजलेली तशात भेटला तिजला प्रियकर अशाच चांदणीसाठी होता आतूर कोण कुठली तू आलीस कशी आपूलकीने त्याने केली चौकशी लांब असते दूरदेशी येथे परदेशी कोण मज पाठवील पुन्हा मजदेशी प्रियकर उदार उमदा चांदणीस आवडला परी स्वगृहाच्या ओढीने जीव खंतावला मी तर तुझा आताचा प्रियकर घर तुझे कधीचे सुखकर नको तू गृह विरह सहू तू अन मी वेगळे होवू प्रियकर त्वरीत निर्णय घेई प्रियेस त्याच्या पोहचवून देई हा राहीला पुन्हा एकला रोज रात्री पाही तिजला चांदणीही विरहात तळपे अंधारअंगणी रात्रीस झळके दोन जिवांची अशी ताटातुट झाली प्रियक
काव्यरस

माझे अन इतरांचे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 19/09/2021 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझेच दु:ख मोठे का? इतरांचे दु:ख छोटे का? हातातले गमावले सारे काही त्यांनी तरी कमावले का? पर्वतासम संकटे आली हादरून मी गेलो, ते नाही का? जे गेले ते माझे होते इतरांचे काहीच नव्हते का? मानले माझे माझे, केले माझे माझे असेच असते इतरांचेही, नव्हे का?

प्रवास कसला? फरफट अवघी!

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 07/09/2021 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी ( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे ) https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA अजुन उजाडत नाही ग! दशकामागून सरली दशके अन् शतकाच्या गाथा ग! ना वाटाचा मोह सुटे वा ना मोहांच्या वाटा ग! पथ चकव्याचा, गोल, सरळ वा कुणास उमगत नाही ग प्रवास कसला? फरफट अवघी! पान जळातून वाही ग... कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे नसते काही असले ग त्यांच्यालेखी रात्र सदाची ज्यांचे डोळे मिटले ग स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग तमातली भेसुर शांतता...
काव्यरस

वडीलांना काव्यसुमनांजली

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2021 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या जाण्याने जग सुने झाले सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे || किती आठव काढावी किती स्मृती जपावी त्या आठवांनी डोळा पाणी आले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१|| रिक्त झाली तुमची नेहमीची जागा तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२|| कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३|| आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही काळाने तुम्हाला असे अकाली का नेले? तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४|| (मा
काव्यरस

(मल-आशय !)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 10/06/2021 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गुर्जींची क्वीता वाचून आमच्याही मलात तरंग उठले

(मल-आशय !)

मलाशयाच्या उदरामध्ये, गूढ कहाणि वसते आहे. नाकात तुमच्या काही का ही?, का म्हणता आत दरवळते आहे. खोल तळाशी मोठा पापलेट, वा अथवा चिकन चा तुकडा. मलसारक हे चूर्ण त्यावरी, का? एरंडेल हा - जुनाच झगडा! असे मलाशय अशी ठिकाणे, गूढ मनाचे रूपक असती. केवळ चित्र तसे पाहता, नाक दाबूनी दूर धावती. अर्थ तसा सहजी अन् सोपा, कोडे सगळे सांगून जातो. सोसू कळ थोडी म्हणता, अवचित प्रोग्राम होऊन जातो.

(फोटू टाकण्याचा मोह आवरला आहे हे कृप्या लक्षात घ्यावे)

पैजारबुवा,

तू जीव माझा- तू प्राण माझा - आलीस तू अवचिता

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/03/2021 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
तू जीव माझा - तू प्राण माझा - घ्यावया नच होतीस आली मालूम होते मला शौच्यालयात घुसता मग सावरून बसता मोबाइलात रमता आलीस तू अवचिता जवळि जवळ येता मग कडकडून डसता मम उष्ण रक्त प्रशिता मेरा चैन-वैन सब लुटिता वाजवून टाळिका मी जीव तुझा - मी प्राण तुझा - हरिला - अल्विदा मच्छरिनी - अल्विदा. .

(सहजच..)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 10/09/2020 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच.. सहजच चूक ती मान्य करोनी, तू निमूट माझ्यासमोर यावे, तुला पाहुनी छद्मीहसूनी मी मग उदारातेने माफ करावे. सहजच मग तू लाचार हसूनी, स्पर्ष मला जरा करु पहावा, शहारुन मी झुरळा सारखा झटकून त्याला दूर करावा. सहजच तुझिया नयनी तेव्हा अंगार क्षणभर फुलूनी यावा, संधी साधुनी तेवढीच मग शब्दांचा तूज मार बसावा . सहजच म्हणूनी बाजाराला, आपण दोघांनी पोचावे, रिक्तहस्ते कैसी परतू मी?

सुशांत

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 25/06/2020 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ... रडलो होतो झगमगताना पायतळीच्या अंधारी... तगमगलो होतो बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो श्रेयस प्रेयस तुंबळात.. सापडलो होतो रुजताना उन्मळलो... का मी किडलो होतो?
काव्यरस