मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हास्य

(घाईची वेळ)

शाहरुख ·
काव्यरस
घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण

(विडंबनी खेळ..)

चतुरंग ·
लेखनविषय:
प्राजुतैंचा 'अनंताचा खेळ..' बघता बघता पूर्वस्मृतीतले अनेक खेळ फसफसून जागे झाले!

(पुरावा)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
जयवीताईंची सुंदर कविता दुरावा हीच आमच्या पुराव्यामागील प्रेरणा! ;) "देतोस ना उजाळा त्या कुंद कापडांना? होतोस काय अडवा ओढून चादरींना?" अवरुन घे दुपारी तो ढीग ताटल्यांचा ती खूपशी तपेली, किटली न कपबशांचा "फक्कड चहासवे दे सांजा करून भरभर!" उच्चारवात होती मज सूचना निरंतर "देईन 'चंद्र अर्धा' लग्नात जोडलेला त्या गोधडीत अजूनी तू मुक्त सांडलेला?" "आहे तसा शहाणा!" अर्धांग बोलले? वा! संपूर्ण काम झाले "रंग्यास" रे पुरावा!! चतुरंग

(दाढदिवस)

रेवती ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;) (सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D ) हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला घासू किती किती मी, चोळू किती किती मी ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बदामा जोरात चावताना तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!! रेवती

('वाढ'दिवस)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला पळलो किती किती मी, वळलो किती किती मी ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बळाला वजनास उचलताना घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला "रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!! चतुरंग

शनिवारचा ऊतारा.. अजुन एक दुविधा

हर्षद आनंदी ·
लेखनविषय:
काव्यरस
हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, एक कोणीतरी जगत असतो कधी नाक मुरडत, कधी शिव्या घालत, कधी तोडफोड करत, माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो, उंबर्याची बंधने झुगारुन, समाजाची चौकट ओलांडुन, नवे नवे पायंडे पाडत राहतो कारण.... हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........

<पुन्हा ती भेटली तेव्हा.>

विजुभाऊ ·
गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे. अगा गा गा गा गा गा गा गा बो बो बो बो बो अशा चालीत वाचावे.) ============== दिसलीस तू.. भेटलीस तू.. थांबल्या रीक्षा, थांबल्या बशा ( बस चे अनेकवचन) थांबला जणू रस्ता तेवढा जाम ट्रॅफीक .. थांबवलीस तू ! भासलीस तू कापरापरी, काजळी जणू.. काळजावरी लखलखती भिंगे ढापणी सांगती तुझी बातमी खरी न स्मित मोजके, न बोलणे कमी नको त्याच चौकश्या, नको त्या बातम्या.. जे मनात ते, बोललो कुठे? होत राहिले हेच नेहमी.. ढोसणे तुझे.. खुंदणे तुझे.. आळसावणे.. डुलकणे तुझे.. त्या कळा कुठे?

(वार्धक्य)

चेतन ·
लेखनविषय:
गिरीश भाउंचं वार्धक्य पाहुन मिपावर काहिजणांना अचानक आलेल्या वार्धक्याबद्दल वाईट वाटलं तरी ते लवक परत तरुण व्हावेत ही संत तात्याबा चरणी प्रार्थना ;) असो.. ************************ ************************ नडलो तुला पिळुन, राजरोस मनुष्या हे तुला विडंबन, आता सोस मनुष्या बुधवारचा अन् शनिवारचा उतारा झाला टंकलेस शब्द किती भरघोस मनुष्या वाचक टवाळ 'बनले', झिंगुन नाचले घातला प्रतिसादांचा ऐसा हैदोस मनुष्या टेकले सगळ्यांनी हात, अन निर्ढावलेही सह्या विडंबयचास, आता नुसतेच +१ मनुष्या आता कुजकेच उरले, मालक ओळखुन आहे सह्यांचे झमेले, झाले रे, ओस मनुष्

(माझाच माज)

llपुण्याचे पेशवेll ·
लेखनविषय:
काव्यरस
अदितीबै, रंगाशेठ, चेतन यासारख्या यशस्वी विडंबकांच्या पावलावर पाऊल टाकून आमचाही लडखडत पावले टाकण्याचा एक प्रयत्न. चालक उडवे , न थांबे धाग्यांचा पाऊस मार खाऊन लिहीतो त्याला फारच हौस तिची प्रतिक्षा मनास, काही सदस्य फितूर +१ फक्त देती प्रतिक्रियांचा ना येई पूर उगाच-टुकार भिकार कौल पाडीतसे सखा चिकटू नको तू कंपूत नाहीस रे मख्खा मिरवितो 'माझ्या रचना' कोणी नवा हो 'पारवा' प्रतिक्रियेस विडंबून टार्‍या पाडी त्या आडवा धारा उडती हास्याच्या टाके परा 'सल्ला'लेख आयडी सारेच थिजती,सल्ले वाचण्या नाजुक लांब राहूनीया पाही, एकला अलिप्त राहून पाडे बुधवारी काव्य राही पेशव्या हसून पुण्या

(हिरवा माज)

चतुरंग ·
लेखनविषय:
काव्यरस
जयश्रीताईंचा असला कचकचीत हाफवॉली पडल्यावर आमच्यातल्या विडंबकाने काय करावं असं अपेक्षित आहे? ;) ग्लेन्फिडिच बरसे सखा डॉलर पाऊस माज लेऊन हिरवा, येतो डॉलर पाऊस तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर पापड्-फर्साण चखणा तिथे पुरवतो सखा खुळावली मैफल माज घेऊन अनोखा मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!! चतुरंग