(विडंबनी खेळ..)
प्राजुतैंचा 'अनंताचा खेळ..' बघता बघता पूर्वस्मृतीतले अनेक खेळ फसफसून जागे झाले! ;)
चला रे बसूया | कातर सांजेला |
पहिल्या धारेला | आम्ही बद्ध ||
तळले पापड | चखणाही खात |
सोडुनिया साथ | शुद्ध गेली ||
तोंडी एकेकाच्या | इमले सहस्र |
ढोसती एकत्र | समदु:खी ||
काचबिंब नेत्री | ढापण देखणे |
ग्लास चाचपणे | इथेतिथे ||
चंदेरी हा बार | सावळा वेटर |
बाटल्यांच्या पार | दिसे शेट्टी ||
वितळला बर्फ | सोडा फसफसे |
व्हिस्कीचे रे पिसे | लागे मला ||
भिजली पहाट | अशी दारवांत |
चला पटापट | घराकडे ||
बेवडे येऊनी | ढेरलास झाले |
घोरणे रंगले | बिछान्यात ||
कवितेची ओळ | वारंवार छळ |
विडंबनी खेळ | म्हणे "रंगा" ||
चतुरंग
वाचने
5730
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
चंदेरी हा
गुरुदेव
धन्य
ही हा हा हा
कुठे असता
ढेरलास
In reply to ढेरलास by श्रावण मोडक
ढेर
In reply to ढेर by चतुरंग
बाकी
दारू,
In reply to दारू, by रेवती
हम्म्म्म...
In reply to हम्म्म्म... by चतुरंग
हॅहॅहॅ ..
In reply to दारू, by रेवती
मान्य आहे,
छान.. -----------------
....
In reply to .... by sneharani
शब्ददारवा
पुर्वरंग