Skip to main content

(घाईची वेळ)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 22/12/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण हे विडंबन वाचून राहवले नाही..
काव्यरस

वाचने 3372
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

छी छी छी ... अतिशय ही&ही विडंबन! आणि हो, शीर्षक वृत्तात बसवण्यासाठी "घाईची वेळ" ऐवजी "घाईची ही वेळ" असं करायला हरकत नाही. अदिती

=)) =)) =)) =)) बाई-बाटली ते डायरेक्ट संडासा पर्यंत विडंबणाची वाढलेली बँडविड्थ पाहून परमसंतोश झाला ... ! जियो शारुक ! - सलमान

दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || हे कडवे काळजाला भिडले. चित्रदर्शी आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by पर्नल नेने मराठे

हॅहॅहॅ .. तेच ना ते .. स्लमडॉग करोडपती मधलं .. जेंव्हा जमाल अमिताभ बच्चन ला भेटण्यासाठी एक जब्बरदस्त स्टंट करतो ते ? =)) - ड्रेनेजवडी

घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || आरा रा रा... हा तर मोठा लोचा !!! ;) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची
|| सज्जन हो आमचा विल्याष्टीकचा आग्रह असतो तो या साठीच. योग्य वेळी गुरुशंकानिरसन झाले कि काय रिलीफ अस्तो. व्हॉट अ रिलिफ ! व्हॉट अ रिलिफ! गावाकड बर आस्तय होल वावर इज अवर! गो अ‍ॅण्ड डु!
केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची ||
मागच्या म्हैन्यात जयपुर ला चोखीदानीला गेल्तो तव्हाच अनुभव घेत्ला ब्वॉ! अवो गुरुशंकानिरसनगृहच सापडानी कुड! यकदाच सापाल्ड बर गर्दी नवती नाई त वांदे! बासरी घेतलेल्या क्रुश्नावानी पोजिशॅन व्हतीय! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

गावाकड बर आस्तय होल वावर इज अवर! डु एनी व्हेअर.. डुडु....डु ना ;-) बासरी घेतलेल्या क्रुश्नावानी पोजिशॅन व्हतीय! जबरा, सालीड, लै आवडल चाळीत लै वर्स आनुभवलया. कविता आवडली हे वेगळ सांगायला हव का? *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/ जयेंद्र पाटील, मुळगाव मु.पो. बेडग ,जि.सांगली सध्या वास्तव्य ठाणे