Skip to main content

(पुरावा)

लेखक चतुरंग
Published on गुरुवार, 17/12/2009
जयवीताईंची सुंदर कविता दुरावा हीच आमच्या पुराव्यामागील प्रेरणा! ;) "देतोस ना उजाळा त्या कुंद कापडांना? होतोस काय अडवा ओढून चादरींना?" अवरुन घे दुपारी तो ढीग ताटल्यांचा ती खूपशी तपेली, किटली न कपबशांचा "फक्कड चहासवे दे सांजा करून भरभर!" उच्चारवात होती मज सूचना निरंतर "देईन 'चंद्र अर्धा' लग्नात जोडलेला त्या गोधडीत अजूनी तू मुक्त सांडलेला?" "आहे तसा शहाणा!" अर्धांग बोलले? वा! संपूर्ण काम झाले "रंग्यास" रे पुरावा!! चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

वाचन संख्या 2431
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

हे चतुरंगांचे बोल आहेत की रेवतीताईंचे? बाकी बोल उत्तमच. प्रश्नच नाही.

In reply to by श्रावण मोडक

अगदी अगदी! ;)
"देईन 'चंद्र अर्धा' लग्नात जोडलेला त्या गोधडीत अजूनी तू मुक्त सांडलेला?" "आहे तसा शहाणा!" अर्धांग बोलले? वा! संपूर्ण काम झाले "रंग्यास" रे पुरावा!!
व्वा! व्व्वा व्व्व्वा!!! वाचुनच काळजात कळ उठली! शेवटी काय, तर घरोघरी एल.पी.जी.!

श्री रा रा चतुरंगजीसाहेब विडंबन चांगले झाले आहे असे म्हणण्यास वाव आहे. धन्यवाद ! --अवलिया

=)) चुचु

हाहाहा, चतुरंग विडंबन तुमच्या कीर्तीला जागणारं, मस्तच! मस्त कलंदर ताई लग्नाळू मुलांना भांडी घासण्याचं ट्रेनिंग देत होत्या, त्याचं पुढे काय झालं?

खो खो खो , गडाबडा लोळण , वळली मुरकुंडी , *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/