Skip to main content

हास्य

(बलुतं)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 30/10/2009 16:39 या दिवशी प्रकाशित केले.

कौतुक शिरोडकरांची बलुतं वाचुन एक हि & ही प्रयत्न टारझन रावांस अर्पण ;)

तसा अनेकांनी प्रयत्न केला
त्याच्या बालिशपणाला आवर घालण्याचा,
फसलेल्या स्थळांचा पराक्रम करणार्‍या
दादाला सरळ करण्याचा,
षडरिपूंनी चढवलेल्या कल्पनांना
विडंबनरुपी विरजण घालण्याचा,
पण किडे वळवळणारा आणि हो उद्योग
जन्मसिद्ध अधिकार्‍यासारखाच...

या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी
ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही....

दहावीला असंख्य कल्पना पुजुनच
जन्माला आलाय तो...

गटण्यासारखाच...

म्हणून तर ....

काव्यरस

<काहीच्या काही ...> अर्थातच कैच्या कै

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 30/10/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा

आभास कविता
कि पास कविता
*त्यास कविता
मिळालेली |

हे शिडशीडीत
ना फटफटीत
ना धडधडीत
साध्य कसे ?

अर्थ गर्भ पोरी
खिसा कशी जाळी
गूढ कधी काळी
घे जाणोनी |

शब्दांचा कंटाळा
अर्थांचा घोटाळा
नि*धाचा पाचोळा
फार झाला |

तो श्वास, नि: श्वास
लसणाचा वास
सार बाजू त्यांस
आज तूही |

मागणी प्रमाणे
प्रेम प्रसवावे
मूढ प्रेमीस रे
कोणी सांगा |

चलनात नाणे
मद्य आणि खाणे
'बार' ' बार' करणे
एक सत्य |

काव्यरस

(किराणा मालाच्या दुकानाचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक पर्नल नेने मराठे यांनी सोमवार, 26/10/2009 16:20 या दिवशी प्रकाशित केले.

किराणा मालाचे दुकान काढावे असे माझ्या मनात आले, आले गेले मला सल्ला देउ लागले, लागले सवरले काही तर आम्हाला सान्ग म्हणत सर्वजण, सर्वजण मदत करु लागले आणी दुकान सुरु झाले, झाले सुरु दुकान तसे सगळे मिपाकर खरेदीला यायला लागले, लागले यायला बरेच लोक तसा मला स्टाफ़ कमी पडु लागला, लागला तसा नोकरीला दुकानात माझ्या अवलिया व परा, परा मग येइल जाइल ते पाखरु न्याहाळु लागला, लागला मग वाटु मला सिन्सियर एकच अवलिया, अवलिया झाला कालान्तराने मग म्यानेजर, म्यानेजर झाला तसा लागला हा कविता करु नाना, नाना नाना म्हणत पोरी गोन्डा घॊळवु लागल्या, लागल्या हिशोबाची वजा जाता मला घाम फ़ुटु लागला, लागला मला शोध मिच दुकानाची

काव्यरस

(हव्यास तू)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:14 या दिवशी प्रकाशित केले.

(प्राजू यांना अपेक्षित असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती)

घरात अपुल्या भरून उरल्या
मद्यराणीचा सुवास तू
वेगवेगळ्या गचाळ गंधाची
उभी ठाकलेली रास तू

क्षणैक जागेवरी न थांबे
लडखडणारा त्रास तू
मित्रांच्या कुबड्या करुनी
तरंगणारा भकास तू

अखंड रिचवणारा... झरझर
घोट संस्कृतीचा दास तू
चाखण्यावरती पोसलेली
तुंदीलतनू आरास तू

डोळे मिटूनी तुला पहावे..
ग्लास तू ..... ग्लासात तू
तुझ्याविना ते कसे जगावे
मद्यकर्त्याचा श्वास तू

पेगवेड्या त्या जनांना
लागलेला ध्यास तू..
बाटलीतील उत्कटतेचा
झिंगला उल्हास तू

काव्यरस

(रिमोट)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 23:58 या दिवशी प्रकाशित केले.

(क्रांतीजीं क्षमा करतील या अपेक्षेत)

त्याला माझे आरवणे रुचलेच नसावे
त्याना माझे बंड कधी पचलेच नसावे

शब्दांचे ते घाव बोलके, उद्धटवाणी,
नाते भावातील तिथे रुजलेच नसावे

बडव्याने विठठला भजावे, असली माया,
वेडे गण.. त्यांना दैवत पटलेच नसावे !

त्याच्या पाट्या कशा कोरड्या? बहुधा त्यांनी
सेनानींचे सल्ले पण रटलेच नसावे

वर्षांचे साथी सगळे अवचित फुटलेले,
आदेशावर पुन्हा कुणी फिरलेच नसावे

येता जाता भाजप त्यांना डिवचत होता,
त्याचे 'जीना' भाटांना कळलेच नसावे !

काव्यरस

<?!#^&* भरीत *&^#!?>

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 22/10/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा मोडकांचे गणित व नान्याचे प्रतिबिंब

काव्यरस

((गणित))

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/10/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.

अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :?

काव्यरस

आयटीवर बोलू काही..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 22/10/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.

(संदीप - सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची क्षमा मागून)

जरा मजेने, जरा खरोखर बोलू काही
चला दोस्तहो, या आयटीवर बोलू काही

उगाच गाजर ऑनसाईटचे दाखवित रहा तू
गळले नाही प्रोजेक्ट तोवर बोलू काही

पी एम. पाहून चॅटींगवर कुजबुजली पोरे
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही

हवेहवेसे फ्लर्ट तुला जर हवेच आहे
स्मार्ट देखण्या ट्रेनीबरोबर बोलू काही

किती काळजी अप्रेजलची बघ रांगेतुन
एप्रिल नाही तर ऑक्टोबर बोलू काही

स्किल्स असू दे सीवीमध्ये काठी म्हणुनी
रिसेशनचा प्रवास खडतर बोलू काही

मूळ गीत - आयुष्यावर बोलू काही
कवी - संदीप खरे

काव्यरस

(फराळ)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी बुधवार, 21/10/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.

(जयंतरावाची माफी मागून... )

दमले फराळ करता, आता निजेन म्हणते
स्वप्नातल्या दिवाळी, थोडे रमेन म्हणते

चकली जराच चुकली, हा दोष मोहनाचा
आहे जशा सरळ त्या, तैशा तळेन म्हणते

साठ्यातल्या करंज्या, फुटताच होय गोंधळ
पाकातले चिरोटे, केले 'अगेन' म्हणते

अंदाज लाडवाचे, चुकले पुन्हा नव्याने
बेसन रवा मिळोनी, गोळे वळेन म्हणते

पाळीतला उगा का बसला रुसून शंकर ?
समजावण्यास त्याला, पुर्‍या चिरेन म्हणते

शेवेस गाळताना, का हात कंप पावे ?
रचना नव्या दमाच्या, नाना करेन म्हणते

काव्यरस

(चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 20/10/2009 18:32 या दिवशी प्रकाशित केले.

स्रोत- नेस्टेड

चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो
रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो

दूर दर्शनाला हा मी बघणार नाही
फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो

बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का
ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो

कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो?
"समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो

घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा
फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो

ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती
पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो

काव्यरस