Skip to main content

('वाढ'दिवस)

('वाढ'दिवस)

लेखक चतुरंग
Published on बुधवार, 16/12/2009 प्रकाशित मुखपृष्ठ
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला पळलो किती किती मी, वळलो किती किती मी ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बळाला वजनास उचलताना घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला "रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!! चतुरंग
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 5751
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

हाहाहा.. एकदम सह्ही! बाय द वे, कधी असतो बरं आपला वाढदिवस? - प्राजक्ता http://www.praaju.com/

=)) आगायाया !!
अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला
=)) खपलो =)) वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंगोबा :) - चवरंग

श्री रा रा चतुरंगजीसाहेब आपले विडंबन वजा स्वानुभवाचे वर्णन वाचले. अतिशय चांगल्या रितीने आपण वर्णन केले आहे. परंतु वाचता वाचता अचानक मला आपण लिहिलेल्या एका लेखाची आठवण आली. तो लेख इथे वाचता येईल. तो लेख आणि ही कविता यांचा एकत्र विचार करतांना मनात जे विचार आले त्यांचे यथार्थ वर्णन करण्यास माझी लेखणी असमर्थ आहे, परंतु एकंदर जे चित्र समोर आले ते अतिशय भयावह आहे मी आपणास सांगु इच्छितो. आपण लेखामधुन मांडत असलेले विचार आणि प्रत्यक्षातले आपले आचार यात अंतर असल्याचे प्रथमदर्शनी दृष्टोत्पत्तीस येत असल्याचे निष्पन्न झाल्याने आपण सुद्धा आंतरजालावरील इतर विचारवंताप्रमाणे केवळ दुस-यास नीतीमत्तेचे वा आचरणाचे धडे देत स्वतः सर्व यमनियम धाब्यावर बसवत असल्याचे दिसत आहे. माझ्या आकलनात चुक असल्यास तसा खुलासा ८ (अक्षरी आठ) दिवसांत केल्यास मी आपल्याला मित्र समजुन चुक करत नाही याचा आनंद होईल, अन्यथा आंतरजालीय विचारवंतांशी मैत्री करु नका, मस्तिष्कभ्रमादी रोगांचे शिकार व्हाल असा सल्ला आमच्या राजवैद्यांनी दिला आहे. धन्यवाद ! --अवलिया

In reply to by अवलिया

+१ श्री अवलिया यांचे निरीक्षण वाखणण्यायोग्य. -१ श्री अवलिया यांनी विडंबनास आत्मव्यथा समजल्याबद्दल.

"अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला" रंगाशेठ लै भारी *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) .................................. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

अवलिया पत्रेंशी सहमत

=))

मस्त. अमोल ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

रंगाशेठ, जोरदार.. चलू दे.. (अवळून पट्टा बांधणारा) केशवसुमार

और भी आने दो.

लै भारी रंगराव! -अनामिक

मूळ कविता तिकडे अन् विडंबने आणि चर्चा वगैरे इकडे? बरं बरं! विडंबनाकरता आमच्या शुभेच्छा. परात्या.

व्वाह. विडंबन एकदम झक्कास जमलंय. अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला छानच.

चतुरंग-जी, अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला या ओळी वाचून "बटाट्याची चाळ" मधील "अर्ध्या तुमानीत शर्ट व पोट" खोचणार्‍या स्काऊट मास्तरांची आठवण झाली. विडंबन आवडलं आता मूळ कविता शोधतोय्! ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

छायाताई देसाईंची मूळ कविताही (मायबोलीवरील) सुंदर आहे. ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

In reply to by भानस

सही...काटाकिर्र विडंबन! =))

श्री. चतुरंग :-) विडंबनात आपला आणी श्री. केशवरावांचा हात कुणी पकडणार नाही, पण आता तुम्हाला घरातुनच स्पर्धा आहे : -) --टुकुल

In reply to by टुकुल

आमचा हात कधीचाच पकडलेला आहे! ;) (फार पूर्वीच दोनाचे चार हात झालेला)चतुरंग

जाड झालेल्या माणसास हे विडंबन न वाटता सत्य वाटेल. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

वाह वाह रंगाशेठ छान. असेच लिहीत रहा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984