Skip to main content

गीत: कसं जगावं या असल्या दिवसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/06/2010 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: कसं जगावं या असल्या दिवसात
देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ|| जिथं बघावं तिथं चालते लाच अन लुटमार नव्याणवाचा आकडा येई शेवटी वस्तूच्या किंमतीवर फसवणूक करूनी धंदा करता, गिर्‍हाइकांचं कोन ऐकेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||१|| झाली भाजी महाग, गेली कुठं किफायत? प्रवास नाही स्वस्त, रिक्षावाले लुटतात मस्त अन्नधान्यात भेसळ होवोनी, वरणासाठी डाळं मिळेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||२|| कामावर राबराबूनी, येई घरी परतूनी टिव्ही ची कटकट असत
काव्यरस

बरे नाही

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 31/05/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
गझल सम्राट सुरेश भट ह्यांची एक अतिसुंदर गझल.
काव्यरस

त्याचे तिचे प्रश्नोत्तरे

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 29/05/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे तिचे प्रश्नोत्तरे सिच्यूएशन: हिरो हिरवीनीची छेडाछेडी चाल: थोडीशी सवाल जबाबासारखी
तो: गोरा गोरा रंग अंगी चोळीही तंग पदर कमरेला विळखा घाली असती आपल्यातच दंग चाल तुझी मोरावानी हरणापरी चपळ अंग कुठं जाशी कुठून येशी सांग सांग सांग पोरी सांग सांग सांग
ती: गोरा गोरा रंग माझा नाही गर्वाने धुंद शिंप्याची चुक झाली केली चोळी त्याने तंग मोर हरणावानी चाल चपळ न्हाई तुझ्यागत फोपशी अंग नसत्या चौकशा करू
काव्यरस

रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 26/05/2010 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
रातराणी ? ? ? अरे बाप रे ! ! ! मोकळ्या केशसंभारांत पाठमोरी उभी ती मंद चांदण्यांत भासे रातराणी परी ती वाटे जणू बोलाविते साद देऊन मजला वाढली धडकन दिलाची पाहुनी एकान्ती तिजला विचारी मना “ काय आता करावे ” ? “ मुखचंद्रमा तरी आज पाहून यावे “. गेलो भेटण्या समीप लोक म्हणतील काय ? पाहुनी एकांती आम्हा जळतील हाय. जाऊन समीप हलकेच न्याहाळले, अन जाहला चंद्र तेजोमय नभीं s..s..s..s..s..s..s थरथरली मम काया भीतीने हाय रे दुर्दैव ! पाठमोरी सासूच् होति उभी निरंजन वहाळेकर
काव्यरस

<>आपलं कसं जमणार<>

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 25/05/2010 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुला नेहमीच अवांतर आवडणार, आणि मी वांझोट्या चर्चांचा दिवाणा … माझ्या मनात सविताभाभीचे वेड.., तुझ्या मॉनिटरवर मुर्च्छा उघडणार, ......... आपलं कसं जमणार? तु कायम परदेशी अनिवासी माझे जगणे सदैव निवासी तु सारखा फोन करणार… मी मात्र नंबर बदलणार… .......... आपलं कसं जमणार? आज ना उद्या जमेल मला तुझ्या प्रतिसादावर संपादन आणण… तोपर्यंत मात्र मी असाच असणार… तुझ्याशी बोलताना "+१" स्मरणार… .......... आपलं कसं जमणार? चल, आपण एक करार करू या? तू माझ्या खोड्या काढायच्या नाहीस आणि मी तुझ्या! मी काही शांततेत रमणार नाही… बघू…! हा करार कितपत निभावणार…? ............आपलं कसं जमणार?
काव्यरस

(न्हाउन ओले केस घेवून)

लेखक मनिष यांनी रविवार, 23/05/2010 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
हेहे....आमची प्रेरणा पाषाणभेद यांची ही कविता आणि पाचवीला पुजलेली रविवारची कामे आणि त्यात होरपळणार्‍या उल्हसित चित्त्ववृत्ती तथा आमची (हरवलेली) अगाध प्रतिभा! ;) न्हाउन ओले केस घेवून सर्दी होईल की तुला शिंकानी मग बेजार होशील, त्रास नुसता मला| जा पटकन टॉवेल घेऊन, केस सत्वर कोरडे कर तेल लावून, भांग पाडून चहा पिऊन घे की कपभर| घरात झालाय नुसता पसारा, त्याचे आहे का काही तुला? सुट्टीची आहेत कामे ढिगभर, त्रास नुसता मला| - मनिष शीघ्रक(ड)वी ;)
काव्यरस

विचारू नका..! (नवीन)

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 22/05/2010 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबनाचा प्रथमच प्रयत्न. प्रेरणा श्री. विशाल कुलकर्णी यांची अतिशय सुंदर "विचारू नका " ही कविता.श्री. कुलकर्णी साहेबांची मनापासून माफी मागून विचारू नका..!
काव्यरस

अंगाई

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 18/05/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा {जगातल्या सगळ्या आया आणि त्यांच्या लेकरांची माफी मागून} अलिकडे निंबोणीचे झाड राहिलेच नाही चंद्र वेडा मोबाइलच्या टॉवरमागे झोपी जाई! गाय पदपथावर, चिमणीला घरटे नाही परस ना वेली, कुठे झोपतील जाई-जुई? शाकीरा, मॅडोना, जॅक्सन यांनी गिळली अंगाई! देवकी, यशोदा नाही, आई हवी पैसेवाली हट्ट पुरविता तिची झोळी रिकामीही झाली! नको रडगाणे, हवी जाहिरातीमधली आई!

शब्दखेळ

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 18/05/2010 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ् प्रभात!! मंडळी काल अंमळ वजनदार नाश्त्यान दिवसाची सुरवात झाली. त्यावर उतारा म्हणून जातीन स्वैपाक घरात राबून मी; ही साधी झुणक्याची वडी, आणि ज्वारीची भाकरी आजच्या न्याहरी साठी तयार केलीय. (कवितेची थोडीशी हिस्ट्री सांगण जरुरी आहे. म्हंटल पावसावर कविता करावी. बाहेर छान सरी वर सरी कोसळत होत्या. थोडे तुषार अंगावर घेत, घेत 'लाइव्ह' कविता लिहावी असा विचार करून; जरा दारांत बसले. झालं. असं मोकळ वातावरण बघून आमचा कवितेचा मूळ शब्द "सर " मोकाट सुटला!! उनाडक्या करत खेळत सुटला. कोणीही ऐकेना . एका वाक्या नंतर ओळीत उभे राहीना!!

(खांदे दुखले!!!!)

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 17/05/2010 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
थकलेल्या जीवावर ओझ्यांची लादणी विसाव्यासाठी आतुरलेले सारे शरीर अन् कांती आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||१|| आठवड्यांच्या बाजारातून विक्रेत्यांची दाटी आणि म्हणुनी "हे घ्या ताई" लागतात ते पाठी आता संपेल, झाला शेवट, वेडी आशा खोटी तोवर पाह्ती आणखी दुकाने, या पुन्हा उचकण्यासाठी आयुष्यभर बहिणींच्या उचलुनी पिशव्या खांदे दुखले...||२|| व्हावी खरेदी.. चुटकीसरशी!!!
काव्यरस