रातराणी ? ? ?
अरे बाप रे ! ! !
मोकळ्या केशसंभारांत पाठमोरी उभी ती
मंद चांदण्यांत भासे रातराणी परी ती
वाटे जणू बोलाविते साद देऊन मजला
वाढली धडकन दिलाची पाहुनी एकान्ती तिजला
विचारी मना “ काय आता करावे ” ?
“ मुखचंद्रमा तरी आज पाहून यावे “.
गेलो भेटण्या समीप लोक म्हणतील काय ?
पाहुनी एकांती आम्हा जळतील हाय.
जाऊन समीप हलकेच न्याहाळले,
अन जाहला चंद्र तेजोमय नभीं
s..s..s..s..s..s..s
थरथरली मम काया भीतीने
हाय रे दुर्दैव ! पाठमोरी सासूच् होति उभी
निरंजन वहाळेकर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1790
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरं की काय ?
काय वो?
Simply Great ! !
In reply to काय वो? by पांथस्थ
अग्गायायायायाया......