Skip to main content

(रुल)

लेखक केसुरंगा यांनी शुक्रवार, 25/06/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांनी टाकलेल्या रुळांवरुन बर्‍याच विडंबन गाड्या गेलेल्या बघितल्या आणि आम्हाला मात्र आमच्या घरातला 'रुल' आठवला! ;) रिमोट हातात घेवून आम्ही भांडायचो ती एका बटणावर हात ठेवायची अन् मी दुस-या बटणावर हात ठेवायचो टिव्ही बघत चरत असतांना बडबडत असतांना असंच संध्याकाळभर भांडायचो एकमेकांना हलकेच धमकावुन सांगायचो एचबीओ चॅनेलवरुन शेवटी 'तसल्या' शोची वेळ निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रिमोटवरुन हवरटासारख्या चकरा... चॅनेल टु चॅनेल. -केसुरंगा
काव्यरस

(रूळ)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 24/06/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
नाव खरं तर तितकंसं योग्य नाही कारण खालच्या रचनेत रूळ कुठेच येत नाहीत. पण प्रेरणा रूळ या कवितेवरून घेतली आहे ना (इतर वीसेक लोकांप्रमाणे!), म्हणून कंसात त्याच कवितेचं नाव दिलंय. काय म्हणता, मूळ रचनेचा दुवा कुठे आहे? बस्स काय, इतक्या विडंबनांत तुम्हाला सापडत नाही का? सालं सगळंच आयतं हवं आजकाल... डोक्याला डोकं लावून आम्ही बसायचो ती माझ्या उवा घ्यायची मी तिच्या उवांनी केस भरायचो डोकं खाजवत गप्पा मारत असताना कधी विचारही करायचो एकमेकांचं डोकं खाजवून द्यायचो लायसॉल लावून कधीतरी तिची केस सुधरून गेली मी मात्र बनलो आहे एकदम अभिजात विचारजंत...डोकं खाजवून खाजवून
काव्यरस

(खूळ)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 24/06/2010 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांचे रूळ आणि गुरू चतुरंग यांचा गूळ पाहून मलाही अंमळ लहानपणची खूळं आठवली. पायात पाय घालून आम्ही पाडायचो तो एका सायकलीवर असायचा अन मी दुसरीवर टांग मारायचे तोल सांभाळत पाडत असताना खोड्या काढताना असंच तासभर खेळायचे सगळेजण मिळून मिसळून पाडायचो आयटीच्या रूळावरून कधीतरी तो मोटर-मन झाला मी मात्र आहे त्याच सायकलीवर पाय मारत... तास न तास
काव्यरस

(गूळ)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 24/06/2010 20:20 या दिवशी प्रकाशित केले.
लई दिसांनी दिसले 'रुळ' मग काय आमची गाडी सुटलीच! ;) धन्यवाद नानासाहेब!! हातात कालथा घेवुन आम्ही ढवळायचो ती एका काहिलीवर लक्ष ठेवायची अन् मी दुस-या चुलाणावर नजर ठेवायचो घाम गाळत ढवळत असतांना बोलत असतांना असंच गुर्‍हाळ आपणही काढायचे एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो मालकाच्या पोराबरोबर रुळावरुन कधीतरी तिची गाडी निघुन गेली मी मात्र काढत आहे त्याच काहिलीतून गूळ पिवळाधम्मक, आरवाळ... सीझन टु सीझन.
काव्यरस

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
काव्यरस

..बावळट ध्यान..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 16/06/2010 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
बावळट ध्यान.. ==================== ढगांच्या छत्रीमागुन डोळा मारुन गेली वीज.. सोसाट्याचे वारे देखील.. सांगुन गेले लेका भीज.. तिच्याकडेच पाहात होतो.. मी मुर्ख बावळट अजुन.. झाडानेही हिंन्ट दिली दोनचार पाने टाकुन... मिठीत घे गधड्या तिला पाऊस धो धो होता सांगत.. मी पेटलेलो आतुन बाहेरुन.. होत नव्हती माझी हिंमत.. सार्या पंचमहाभुतांनी कपाळावर मारला हात.. ह्याच्याने काही होणार नाही.. ध्यान अगदी आहे पुळचाट.. उपाय शेवटचा म्हणुन वीज कडाडली भयानक.. मीच तेव्हा तिच्या मिठीत घाबरुन शिरलो अचानक.. वारा मनसोक्त हसु लागला.. ढगांमागुन वीजही.. झाडानेही घुसळवले अंग.. अन हसु लागली ती ही..
काव्यरस

ड्रायव्हर

लेखक हेरंब यांनी बुधवार, 16/06/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आईच्या तोंडून ही कविता ऐकली होती. पण ती अपूर्ण आठवते. कोणाला जर पूर्ण आठवत असेल तर अवश्य द्यावी. तसेच कवीचे नांव माहित असल्यास ते जरुर द्यावे. ड्रायव्हर मी होणार आता मोटारीत बसणार चहा, बिस्किटे, भजी मजेची सिगार तोंडी धरीन सदा भाजी-भाकरी भिकार खाणे सोडून मी देणार हो s s ड्रायव्हर मी होणार आता मोटारीत बसणार | शेतीभाती उदीम-धंदा नको नोकरी कोणाची जमीनजुमला विकून सारा 'फोर्ड' गाडी घेणार हो s s ड्रायव्हर मी ......
काव्यरस

(नको तेच झाले)

लेखक चेतन यांनी सोमवार, 14/06/2010 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा क्रांतीताईंची सुंदर गझल नको तेच झाले असो... विरझण घाली; असेही, तसेही जरी फोल दावे; असेही, तसेही जरा बोलता तो; विरोधात काही युसलेस बोले; असेही, तसेही किती बरळावे? मुल्य लेखनाचे माकडे टंकती; असेही, तसेही उडे लेखनही, न लावता काड्या पुरावेच देई; असेही, तसेही फुका बोलबाला स्थळपालटाचा, इनो फार झाले; असेही, तसेही कशाला निमित्ते हवी भांडण्याची? कंपुबाज सारे; असेही, तसेही काव्य कर्तनाने पडे फरक का? विडंबन पाडे; असेही, कसेही अवांतर सुचना: व्रुत्त आणी व्याकरण अर्धविराम तपासत बसु नये बसलात तरी मला काही फरक पडत नाही
काव्यरस

(नको तेच झाले)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 12/06/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रान्ति यांची ही कविता आकारबंधासाठी प्रेरणा ठरली. पण खरा दोष आहे इतर अनेक कवितांचा ज्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावरून पदच्युत केलं... पुन्हा काव्य आले; असेही, तसेही नको तेच झाले; असेही, तसेही जरा सोडतो मी; विडंबन नशेला पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही किती जाऊ द्यावे?
काव्यरस