हनुमंताची व्यथा !
त्या दिवशीच्या पेपरात
कूठल्याशा गावची खबर होती
खबर जरी लहान असली
तरी तिची मजा जबर होती..
गाव म्हणे आकारानं
तसं जरा छोटं होतं
गावकुसाच्या शिवेवर
हनुमानाचं मंदिर मोठं होतं..
जेव्हा कधी गावात
लग्नाची वरात यायची
व-हाडी मंडळी मंदिराच्या
सावलीला आडोशाला हायची..
वरातीतल्या बायका मात्र
कधीमधी मंदिरात जायच्या
हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल
अंगावरच्या साड्या बदलायच्या..
सालोसाल असंच घडुन
अखेर ती एक रीत झाली
मात्र शेवटी हनुमंताच्या
ब्रम्हचर्याची जीत झाली..
एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं
मुर्तीनं डोळे मिटले होते
कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे
आता पारणे फिटले होते...!
काव्यरस
मिसळपाव