कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड

पाषाणभेद जे न देखे रवी...
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड
या धाग्यातील प्रतिसादांमध्ये मंदार व प्रसाद जोशींनी म्हटले होते: ">कोथरुड थोडं सं रुड वाटटं नाई ?!! खत्रूड शी यमक जुळतं नै, कोथरूडचं >>>> ह्यावर एक मस्त कविता लिहिता येईल !!१ चला यमकं जमवुया" मंग काय? आसली भारी सिच्यूएशन दिल्यावर लगेच लिहून काढली कविता. वाचा तर मग:
कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड म्या जवा भेटाया जातो काशीला.... तवा... तवा... तवा निसती ताठ करी मिसूरडं ||धृ|| हातात काठी अंगात डगला दारापाशी तो राखणदार बसला येळ काढ थोडा उगा नग रडारड कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||१|| तुझी अन माझी जोडी जमली नाही कोनीही भिती घातली मग तुझाच बाप का घालं खोडं? कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||२|| न्हाई भित मी तुझ्या बा ला वर्‍हाड घेवून येईल सांग त्याला जावई आहे त्याचा मी मागंपुढं कोथरूडच्या काशीचा बाप लई खत्रूड ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २८/०८/२०१०
वर्गीकरण

3 टिप्पण्या 1,728 दृश्ये

Comments

प्रकाश घाटपांडे नवीन

मी कोथरुडलाच र्‍हातोय . तिचा पत्ता कुडय? तिच्या बापाला यक क्वार्टर पाजू वला! होउन जाईन तुमच काम!