Skip to main content

हास्य

युगलगीतः मला वाजतीया थंडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/12/2010 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः मला वाजतीया थंडी तो: ए, मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल अग मला वाजतीया थंडी ||धृ|| ती: आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: गारगार वारं सुटलया मरनाचं हुडहुडी भरलीया माझ्या अंगात असला गारठा नाय पाहिला जल्मात कधी अग मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||१|| आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: कराकरा दात माझं वाजतया हातावर हात माझं चोळतोया जवळ ये, अशी दवडू नको संधी अग मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||२|| आथरून बिथरून उगा काय नको, तुमच्या अंगात हाय उबदार बंडी तो: अशी ग तू काय करते
काव्यरस

(एक बाई ठेवावी म्हणतोय!)

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 15/12/2010 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विडंबनासाठी वापरलेला कच्चा माल :) एक बाई ठेवावी म्हणतोय.... एक बाई ठेवावी म्हणतोय, करायला गरमागरम भाकरी मटण्-मुर्गीच्या रश्श्याबरोबर, जोडी जुळत नाही हो दुसरी!! शुभ्र दळलेली जवार बनवी होऊनि तदाकार अस्सल मर्‍हाटी भाकर सुबक, पातळ, गोलाकार एक बाई ठेवावी म्हणतोय दिसायला असु द्या कशीतरी नसो अंगी बाकी काही गुण फक्त भाकरी मिळो ऊनऊन तर एक बाई ठेवावी म्हणतोय! (मित्रहो, तुमचा काय सल्ला?) :)
काव्यरस

तो कवी..ती कवियित्री..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 09/12/2010 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
तो कवी..ती कवियित्री.. ------------------------------------- तो कवी थोर बंडखोर..ती हळवी कवियित्री.. हात एकमेका हाती देवुन हसली मग नियती..
काव्यरस

(पोट मागते ते - चरण्या अजून काही...)

लेखक नगरीनिरंजन यांनी मंगळवार, 30/11/2010 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: मयुरेश साने यांची शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई... ही सुंदर गझल. तोडून बंध कटीचा - केली जरी जागा ही हळूच निघून गेला - तरी शब्द दर्पवाही तोडून नळीबिळीला - मी मगज तो खाई पुन्हा कसे मिळेना - मागतो ज्याला त्यालाही चाटून ही ताटाला - आले न पोटी काही भूक अजून मजला - देतो हीच ग्वाही सांगून ही कितीदा - धुतले न हात माझे आतून भांड्यांचा ही - कितीदा आवाज होई उठवून ही मला - मी उठलो कधीच नाही पाच भाकर्‍या अन - वडे पाच खाई लाजून ही स्वतःला - उरले काहीच नाही पोट मागते ते - चरण्या अजून काही टाळून ही मला तू - मी टळलोच नाही जरी ज
काव्यरस

नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) (Nasates Ghari Tu Tevha...)

लेखक बोलघेवडा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत. नसतेस घरी तू तेव्हा... नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो, गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो. दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो, हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो.
काव्यरस

माझिया केसानो!!

लेखक रमणरमा यांनी बुधवार, 24/11/2010 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
"माझिया मना" या अप्रतिम कवितेचे कवी सौमीत्र यांची माफी मागून निर्लज्जपने माझी पाण्च्ट कविता येथे टाकत आहे. अत्यंत चांगल्या कवितेची वाट लावली आहे ( ती पण नीट लावता नाही आलेली ) कविता वाचून डोके आपटून घ्यावेसे वाटल्यास दगड किवा भिंतीची सोय आम्ही करणार नाही. ते आपले आपन बघून घ्यावे. माझिया केसानो सरळ व्हा ना, माझिया मस्तकी तुमचा धिंगाणा... तुमचा गुंता अन मला वेदना.... माझिया केसानो || माझिया केसां जरा चमक ना, माझिया केसां जरा चमक ना, घालवु कशी मी ही तुझी रूक्षता... टकलि न मी वाढतोस तू आवरू कशी मी ही तुझी दुर्दशा!...

खाजकविता २ - दाढी , झुरळ आणि कविता...

लेखक कानडाऊ योगेशु यांनी सोमवार, 22/11/2010 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
झुरळाने मिशा फेंदारुन एकदा कविता करायचे ठरवले.. बिळात बिळात मिशा टाकुन. नुसते विषय हुडकले.. त्याला विषय मिळाले खुप पण सुचली नाही कविता.. अहो,कविता फक्त करता येते.. दाढी खाजवता खाजवता.. एकदा झुरळाला कशीबशी एक कविता सुचली.. मिशामिशा फेंदारुन त्याने झुरळीसमोर वाचली.. झुरळी म्हणाली त्याला.. काय पण हुरळलाय गडी.. अहो...जरा सबुरीने... कविता केलीये..आता तुम्हाला फुटेल दाढी.. दाढीवालं झुरळ..म्हणताच.. झुरळ दचकलं जाम .. आपल्या मिशाच बर्या बुवा.. कविता करणे आपले नाही काम..
काव्यरस

म्हातारपणीची प्रार्थना

लेखक अरुंधती यांनी रविवार, 21/11/2010 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
परवा ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. कदाचित इतरांना जाणवणार नाही. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए.