Skip to main content

प्रेमाची बँक

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 27/08/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमाची बँक
तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? माझे अकाउंट उघडतेस का? माझ्या प्रेमाच्या सेव्हिंग्जवर काही रिटर्न देशील का? ||धृ|| खाते ओपनकरण्यासाठी प्रेमपत्राचा अर्ज लिहीला प्रेमजाणत्या मित्राला ओळखीसाठी तयार केला इनवर्डला पडला अर्ज, आता सहिशिक्का मारशील का? तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||१|| अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का? तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||२|| ऑनलाईन प्रेम, मोबाईल एसएमएस प्रेम सुविधांचे काय? या सोईसार्‍या मिळती इतरांना मलाही मिळतील काय? प्रेम धनाची होम डिलीव्हरी सुविधा मला मिळेल का? ||३|| आता स्नेहाची गुंतवणूक करतो ओव्हरड्राफ्ट प्रितीची इंस्टॉलमेंट मिळवतो तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का? तुझ्या दिलाच्या बँकेमध्ये माझे अकाउंट उघडतेस का? ||४|| - पाषाणभेद (दगडफोड्या) २७/०८/२०१०
काव्यरस

वाचने 1536
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

अकाउंटचे असती करंट, लोन, सेव्हिंग, रिकरींग सगळे नकोच मजला फिक्स खातेच हवे ग त्याच्याशी तुझे अकाउंट जॉईंट करशील का?
वा.. सुंदर कल्पना..!
तान्हूल्याच्या रूपात पोस्ट डेटेड चेक देशील का?
हे तर फारच सुरेख..! आपला, (परत आलेला धनादेश) तात्या.