Skip to main content

भावकविता

तू ग

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 10/09/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ असूनही अबला तू सबल मनाची कोमला तू नभोवनीचा शीतल चंद्र अन्... तप्त सूर्याची आभा तू मनमोकळा निर्झर तू ग हृदयस्थ गंभीर डोह ही तू स्वर गंगेचे आरोह कधी तू कधी दबलेली आर्तता तू सर्वात असूनही.. एकटीच तू ग तुझ्या मनीचा आधार तू
काव्यरस

प्रणयपंचमी

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 10/09/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी, हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी... विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी.. प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी , झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी , धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी, परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी, सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी.. (या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )
काव्यरस

एकांत

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 29/08/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
कोणते हे फूल, वा काय त्याचे नाव? विचारतो ना सांगतो तो स्वतः शी बोलतो! कळी आज लाजते फूल उद्याला हासते पाहतो! ना बोलतो, तो स्वतः शी हासतो! रंग हिचा केशरी गर्द तिचा सोनेरी स्पर्शतो ना तोडतो तो स्वतःशी रंगतो! ...... ..... फूल त्याच्या अंतरीचे किती कसे कळलावे? डोलते ना थांबते वाऱ्यातून हुरहुरते!
काव्यरस

निरोप

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 23/08/2015 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या दोन चरणांवरती हलका झुकला माथा 'सुखी रहा'च्या शब्दांपाशी निरोप अडला साधा! अनुबंधांची कि जन्मांतरीची अशीच असते रेषा परतो, अथवा जावो दिगंता चिवट असते आशा. वाटला तितका सोपा नव्हता वृद्ध अनोळखी धागा जुन्यापान्या झाडांचाच खोल असतो ठिकाणा!

सुखी जग

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 22/08/2015 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
याहूनी सुखी जग ते कोणते? भेटल्याचा आनंद नाही निरोपाचा खेद नाही.... आभासी जगातला फिल कसा गुड गुड व्हेरी गुड! आठवणींचे सेल्फी कुठले? हसल्याचा आवाज नाही मुसमुसल्याचा गंध नाही...... आभासी जगातला टच कसा साॕफ्ट साॕफ्ट मायक्रोसाॕफ्ट! कोण जागतो कोणासाठी? फिकट डोळे दिसत नाहीत उरली रात्र सरत नाही.... आभासी जगातला गुंता कसा क्रेझी क्रेझी काचणारा!
काव्यरस

घर एकटे बागेसह......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/08/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
घर एकटे बागेसह ........... घर एकटे बागेसह वाट श्रावणाची पाहते, एकेक झाडमाड अंतरीचे गुज येथे सांगते. पुसट लाल संकासूर बोलतो न काही उचलूनी फांद्या परी आकाशाकडे पाहतो कोण आले, कोण गेले, राहिले न कोणी तरी दाराशी स्तब्धसा, वाट कुणाची पाहतो? सरताना बहर तसा, कळ्या दोन हासल्या 'मोगराच मी सुगंधी, जरा अजून बहरतो पावसाची वाट पाहण्या, कळ्यांतून झुरतो श्रावणाची झड येता, मी पानांतून मिटतो!' शुभ्र अनंताचे कसे, विरागीच अडसर उचलेना पाऊल पुढे, वा मागेही अधिरे मौनात त्याच्या, प्रश्न किती साधेसुधे! उत्तरे खरीखुरी, तरी का मन बावरे? तुळस एकटी अकारण,रोखुनिया बघते पावलांचे ठसे माझ्या, मोजूनिया पाहते जुन्याखोल ओळख
काव्यरस

.... आभास

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 11/08/2015 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ शब्द भारलेले इकडून तिकडे वाहणारे तिकडून इकडे झरणारे...... कुणाकुणाचे संचित असते क्षणामनाला जाणिव देते प्रत्यक्षाहून, अमूर्त संपन्न! भास नसे हा खास तरीही आभासाच्या जगात फिरते गूज मनाचे मनास वदते. इतक्या रुतल्या गाठी रेशीम व्रणही वाटे जपून ठेवू नशिबाला मग कौलच लावू दिगंताला निघताना तरी, हात खराच हाती घेऊ!
काव्यरस

मैत्र झुलवून बघ

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 05/08/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्र झुलवून बघ

चेहऱ्यावरती खिळू नकोस
आत उतरून बघ
अंतरीच्या झोपाळ्यावर
मैत्र झुलवून बघ

नितळलेल्या तळावरती
विश्वासाचे घर
हाय, हॅलो जाऊ देत
हात घट्ट धर

शर्थ, अटी काही नकोत
खुले-खुले सांग
तेव्हा तुला कळेल माझ्या
हृदयाचा थांग

दिसतो तसा नाही मी
कठोर आणि क्रूर
काळिजाच्या सप्तकाला
अवरोहाचे सूर

देत बसत नाही मित्रा
पुन्हा पुन्हा ग्वाही
पण तू जसा समजतोस
मी तसा नाही

मोजत बसू नकोस मित्रा
स्पंदनाची धग
डोळे मिटून खांद्यावरती

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

शष्पचिंतन

लेखक निराकार गाढव यांनी सोमवार, 27/07/2015 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?